72 Hoorain Review : राष्ट्रीय पुरस्कार विजेते संजय पूरण सिंह (Sanjay Puran Singh Chauhan) यांनी '72 हुरें' (72 Hoorain) या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. या सिनेमासाठीही त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. पाच वर्षांपूर्वी गोव्यात या सिनेमाचा प्रीमियर झाला होता. हा सिनेमा दहशतवाद्याला बळी पडणाऱ्या तरुणाची गोष्ट मांडणारा आहे. निष्पाप तरुणांचं ब्रेन वॉश करुन त्यांना दहशतवादी संघटनेत कसं सामील केलं जातं याचं चित्रण या सिनेमात करण्यात आलं आहे. 


'72 हुरें'चं कथानक काय? 


'72 हुरें' या सिनेमाच्या सुरुवातीला मौलाना तरुण मुलांचं ब्रेनवॉश करताना दिसत आहे. त्यानुसार हाकिम आणि बिलाल हे दोन तरुण मुंबईतील गेट वे ऑफ इंडियावर दहशतवादी हल्ला करण्याचं ठरवतात. धर्माच्या नावाखाली बलिदान दिल्याने त्यांना जन्नत मिळेल आणि '72 हुरें' मिळतील असं त्यांना सांगण्यात येतं. हाकिम आणि बिलाल यांच्या आयुष्यावर आधारित असलेला '72 हुरें' हा सिनेमा आहे. 


धर्माच्या नवाखाली लोकांना फसवून त्यांचं ब्रेनवॉश करुन मौलाने स्वत:चा फायदा करुन घेतलं आहे हे पुढे हमीद आणि बिलालला कळतं. आजही इतर देशांप्रमाणे भारतातील अनेक मंडळी दहशतवादी संघटनेत सामील होत आहे. निष्पाप लोकांचं कसं ब्रेनवॉश केलं जातं? धर्माच्या नावाखाली तरुणांची कशी फसवणूक होते आणि पुढे मृत्यूनंतर त्यांचं काय होतं, अशा सर्व गोष्टींवर सिनेमात प्रकाश टाकण्यात आला आहे. 


'72 हुरें' हा सिनेमा सत्य घटनेवर आधारित असल्याचा दावा दिग्दर्शक संजय पूरन सिंह चौहान यांनी केला आहे. समाजातील सत्य घटना लोकांसमोर आणण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. हा सिनेमा माहितीपटासारखा आहे. थोडे-फार रंगीत शॉट वगळता ब्लॅक अॅन्ड व्हाइटमध्येच हा सिनेमा जवळपास दहा भाषांमध्ये प्रदर्शित करण्यात आला आहे. या सिनेमाचं संगीत चांगलं आहे. लाल रंगाचं विमान, गेटवे ऑफ इंडियाचा ड्रोन शॉट रुपेरी पडद्यावर पाहताना मजा येते. संजय पूरण सिंह चौहान यांनी कोणत्याही जाती-धर्मावर थेट बोलणं टाळलं आहे.


'72 हुरें' या सिनेमात पवन मल्होत्रा आणि आमिर बशीर यांनी आपल्या भूमिकेला पूर्णपणे न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. पवन मल्होत्राने पंजाबी भाषेतील संवाद चांगले म्हटले आहेत. क्लायमॅक्समधील पवनचा मोनोलॉग ऐकताना अंगावर शहारे येतात.'72 हुरें'  माहितीपटासारखा असल्याने मनोरंजनाच्या बाबतीत हा सिनेमा कमी पडला आहे. 


72 Hoorain Box Office Collection : रिलीजच्या पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर आपटला '72 हुरैन'; जाणून घ्या कलेक्शन...