Tiger 3 Review: चित्रपटांचे तीन प्रकार असतात, असं मला वाटतं. एक चांगले चित्रपट, दुसरा वाईट चित्रपट आणि सलमान खानचा चित्रपट- टायगर-3 (Tiger 3) हा तिसऱ्या प्रकारचा चित्रपट आहे, असं मला वाटतं. तुम्ही काहीही म्हणा किंवा काहीही करा चाहते तर चित्रपट बघतीलच. दिल्लीत मी सकाळी सात वाजता चित्रपटाचा पहिला शो पाहिला. मी पहिला शो सकाळी सात वाजता पाहिला कारण त्याआधी कोणताही शो नव्हता. ज्या चित्रपटात सलमान खान (Salman Khan), कतरिना कैफ (Katrina Kaif) आहेत आणि शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) कॅमिओ आहे तर तो चित्रपट पाहण्याची कारणे शोधण्याची गरज भासत नाही. कारण शोधण्याची गरज भासत नाही. जाणून घ्या सलमानच्या टायगर-3 चित्रपटाच्या कथानकाबद्दल आणि चित्रपटामधील कलाकारांच्या अभिनयाबद्दल...
चित्रपटाची कथा
टायगर-3 चित्रपटाच्या कथेत टायगरचा मुलगा मोठा झाला आहे, असं दाखवण्यात आलं आहे. टायगरला एक मिशन पूर्ण करायचे आहे पण यावेळी हे मिशन भारतासाठी नाही. तर दुसऱ्या देशासाठी आहे. हे मिशन पूर्ण करताना सलमानला कोणत्या समस्या येतात हे चित्रपटात दाखवण्यात आलं आहे. स्पाय युनिवर्समधील बहुतेक कथा अशाच आहेत. चित्रपटात ट्विस्ट आणि टर्न आहेत, हे तुम्हाला चित्रपटातच बघावं लागेल.
कसा आहे चित्रपट?
टायगर-3 या चित्रपटाकडून अपेक्षा जास्त होत्या. जेव्हा चित्रपट सुरू होतो, तेव्हा हा चित्रपट अपेक्षा पूर्ण करणार नाहीये, असे वाटते. सलमान सुप्त वाटतो. कतरिना स्ट्राँग वाटत नाही. पण इमरान हाश्मी नक्कीच प्रभावित करतो. पहिल्या हाफच्या शेवटी, टायगर अडचणीत असल्याचे दिसते. पण स्फोट दुसऱ्या हाफमध्ये होतो. चित्रपटाच्या सेकंड हाफमध्ये जबरदस्त अॅक्शन सीन्स आहेत. चित्रपटात ट्विस्ट आणि टर्न येतात आणि मग पठाण येत, तोही पठाणच्या टायटल साँगसह. शाहरुख खानचा कॅमिओ हा चित्रपटाचा जीव आहे.
कलाकारांचा अभिनय
चित्रपटात सलमान खानने ठिक अभिनय केला आहे. चित्रपटात बर्याच ठिकाणी सलमान खान हा अॅक्टिंग करुन उपकार करतोय, असे वाटले होते. पण त्याचा स्टारडम असा आहे की, तो चित्रपट खेचतो. कतरिनानं देखील चांगलं काम केलं आहे. तिची चित्रपटामधील टॉवेल फाईट अप्रतिम आहे. असे म्हणतात की, नायकाची वीरता तेव्हाच समोर येते जेव्हा खलनायक मजबूत असतो. या चित्रपटात इमराननं अतिशय चांगल्या पद्धतीने काम केलं आहे. चित्रपटाच्या दुसऱ्या हाफमध्ये मनोरंजनाचा जबरदस्त डोस आहे.
चित्रपटाचे दिग्दर्शन
मनीष शर्मा ऐवजी हा चित्रपट दुसर्याने दिग्दर्शित केला असता तर हा चित्रपट एक उत्तम चित्रपट ठरला असता. त्याचे दिग्दर्शन सरासरी आहे. सलमान, कतरिना, शाहरुख आणि इमरान अशा स्टार्समुळे हा चित्रपट पाहण्यासारखा झाला आहे.
शाहरुखचा कॅमिओ -
शाहरुखचा कॅमिओ हा चित्रपटाचा जीव आहे. पठाणमधला सलमानचा कॅमिओ देखील अप्रतिम होता. शाहरुख आणि सलमानला मोठ्या पडद्यावर एकत्र पाहणं, हा सीनचं एका पूर्ण चित्रपटासारखा आहे. चित्रपटात शाहरुखचा कॅमिओ नसता तर कदाचित हा चित्रपट पूर्ण झाला नसता.
संगीत
या चित्रपटाचे संगीत ठिक आहे. प्रीतमच्या संगीतात विशेष ताकद नाहीये. असे एकही गाणे नाही जे थिएटरबाहेर जाताना तुमच्या लक्षात राहिल.
दिवाळीत सलमान आणि शाहरुखला एकत्र बघायला मिळत असेल, तर सिनेप्रेमींना हा धमाका चुकवू नये.