Diwali 2023: देशभरात उत्साहात दिवळी (Diwali 2023) साजरी केली जात आहे. दिवळीमध्ये अनेक चित्रपट थिएटरमध्ये रिलीज होत असतात. अशातच दिवाळीमध्ये काही मराठी गाणी श्रोते आवडीनं ऐकतात. दिवळीमध्ये तुम्ही ही मराठी गाणी (Marathi Song) ऐकू शकता.
आली माझ्या घरी ही दिवाळी (Aali Majhya Ghari Hi Diwali)
आली माझ्या घरी ही दिवाळी हे गाणं अनुराधा पौडवाल यांनी गायलं आहे. 1977 मध्ये रिलीज झालेल्या अष्टविनायक या चित्रपटातील हे गाणं आहे. यंदा दिवाळीत तुम्ही हे गाणं ऐकू शकता.
आली दिवाळी (Aali Diwali )
2022 मध्ये आली दिवाळी हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं. हे गाणं युक्ता पाटील, सत्यम पाटील, सानी भोईर, स्पर्श पाटील यांनी गायलं आहे. अस्मिता सुर्वे, प्राजक्ता ढेरे आणि प्रणय केणी या कलाकारांनी आली दिवाळी या गाण्यात अभिनय केला आहे. या गाण्यात दिवाळीमध्य घरात सुरु असणारी लगबग दाखवण्यात आली आहे.
ऊजळून आली दिवाळी (Ujalun Aali Diwali )
गायिका वैशाली सामंतचे (Vaishali Samant) ऊजळून आली दिवाळी हे गाणे नुकतेच प्रेक्षकांच्या भेटीस आलं आहे. श्रीपाद जोशी यांनी हे गाणं गायलं आहे. या गाण्याचे संगीतकार नीलेश मोहरीर हे आहेत.
लख लख चंदेरी (Lakh Lakh Chanderi)
1941 मध्ये रिलीज झालेल्या शेजारी या चित्रपटातील लख लाख चंदेरी हे गाणं मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर यांनी गायलं आहे. शांताराम आठवले हे या गाण्याचे संगीतकार आहेत.लख लाख चंदेरी हे गाणं अनेक जण आवडीनं ऐकतात.
हर्षाचा दिवाळी सण आला ( Harshacha Diwali San Aala)
शिकलेली बायको या 1981 मध्ये रिलीज झालेल्या चित्रपटातील हर्षाचा दिवाळी सण आला या गाण्यात दिवळी सणात लोकांमध्ये असलेला उत्साह दाखवण्यात आला आहे. हे गाणं लता मंगेशकर, उषा मंगेशकर, हृदयनाथ मंगेशकर यांनी गायलं आहे. शिकलेली बायको या चित्रपटात उषा किरण, सूर्यकांत, इधीरा चिटणीस, सुधा आपटे, नीलम, आशा या कालाकारांनी प्रमुख भूमिका साकारली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या:
Team India : टीम इंडियाचं दिवाळी सेलिब्रेशन! खेळाडूंनी साजरी अशी साजरी केली दिवाळी