Rocket Gang Review: लहान मुलं हा टार्गेट ऑडियन्स ठेवून अनेक चित्रपटांची निर्मिती केली जाते. कारण जर लहान मुलांसाठी चित्रपटाची निर्मिती केली तर तो चित्रपट संपूर्ण कुटुंबाला थिएटरमध्ये जाऊन पाहावा लागतो. पण लहान मुलांसोबतच संपूर्ण कुटुंबाला देखील आवडेल असा रॉकेट गँग (Rocket Gang) हा चित्रपट नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. यंदा बालदिनाला (14 नोव्हेंबर) तुम्ही कुटुंबासोबत हा चित्रपट पाहू शकता.
चित्रपटाची कथा
ही कथा आहे रॉकेट गँगची. अशा 5 मुलांची जी, काही कारणांमुळे हे जग सोडून जातात. त्यामुळे त्यांचे डान्स इंडिया डान्स ट्रॉफी जिंकण्याचे स्वप्न अधुरेच राहते. या मुलांचा आत्मा हा एका बंगाल्यामध्ये कैद होतो. याच बंगल्यामध्ये पाच तरुण राहायला येतात. त्यानंतर सुरू होते डान्स हॉरर आणि कॉमेडीचे असे कॉकटेल जे तुमचे भरपूर मनोरंजन करते.
कलाकारांचा अभिनय
चित्रपटाची स्टार कास्ट तगडी आहे. आदित्य सील, निकिता दत्ता, सहज सिंग, मोक्षदा जेलखानी आणि जेसन थाम यांनी या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली आहे. आदित्य सीलचा या चित्रपटात हटके अंदाज बघायला मिळतो. तो या चित्रपटात डान्स देखील काम करत आहे तसेच कॉमेडी देखील करत आहे. निकिता दत्तानं देखील चित्रपटात चांगलं काम केलं आहे. चित्रपटातील प्रत्येक कलाकाराने चांगला अभिनय केला आहे.
कोरिओग्राफर बॉस्को लेस्ली मार्टिसने या चित्रपटाच्या माध्यमातून दिग्दर्शनात पदार्पण केले आहे. बॉस्कोने अपेक्षेपेक्षा जास्त चांगले काम केले आहे. चित्रपटाची सुरुवात रणबीर कपूरच्या आवाजाने होते आणि त्यातील पात्रांची ओळख खूप छान पद्धतीने केली जाते. त्यानंतर कथा वेगाने पुढे सरकते. तुम्हाला हा चित्रपट बघताना कंटाळा येत नाही. हा चित्रपट एका कोरिओग्राफरने बनवला आहे, त्यामुळे साहजिकच चित्रपटात जबरदस्त नृत्य आणि संगीत आहे. अमित त्रिवेदी यांनी या चित्रपटाला चांगले संगीत दिले आहे. उड गया रॉकेट आणि नाचोगे तो बचोगे ही चित्रपटातील गाणी प्रेक्षकांना आवडतील. हा चित्रपट लहान मुलांबरोबरच संपूर्ण कुटुंबाचे देखील मनोरंजन करेल.
वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या: