Sania Mirza,Shoaib Malik: भारतीय टेनिसपटू (Indian Tennis Player) सानिया मिर्झा (Sania Mirza) आणि पाकिस्तानी क्रिकेटपटू (Pakistan Cricketer) शोएब मलिक (Shoaib Malik) यांचा घटस्फोट झाला आहे, अशी चर्चा सध्या सोशल मीडियावर होत आहेत. याबाबत सानिया आणि शोएब यांनी कोणतीही माहिती दिलेली नाही. पण सध्या शोएबचे पाकिस्तानी अभिनेत्री आणि मॉडेल आयशा उमरसोबतचे (Ayesha Omar) काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. आयशाचं नाव शोएबसोबत जोडलं जात आहे. त्यामुळे आयशा आणि शोएब यांच्या नात्याची चर्चा ही सानिया आणि शोएबच्या घटस्फोटाचं कारण आहे का? असा प्रश्न सध्या नेटकऱ्यांना पडत आहे.
कोण आहे आयशा?
12 ऑक्टोबर 1981 रोजी पाकिस्तानमधील लाहोर येथे जन्मलेली आयशा उमर ही एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. आयशाला 'जिंदगी गुलजार है' या मालिकेमुळे विशेष लोकप्रियता मिळाली. 2017 मध्ये प्रदर्शित झालेल्या यलगार या चित्रपटामध्ये आयशानं काम केलं. नोव्हेंबर 2021 मध्ये आयशा आणि शोएब यांनी एक फोटोशूट केले होते. हे फोटोशूट त्यांनी एका मासिकासाठी केले होते. आता शोएब आणि सानिया यांच्या घटस्फोटाची चर्चा सुरु असतानच आयशासोबतचे शोएबचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
पाहा आयशा आणि शोएबचे व्हायरल फोटो
सानिया आणि शोएब यांनी 12 एप्रिल 2010 रोजी विवाह केला होता. 2018 मध्ये सानियाला मुलगा झाला. या मुलाचं नाव इजहान आहे. सानिया सध्या 35 वर्षांची आहे, तर शोएब मलिक 40 वर्षांचा आहे.
वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या: