Mission Majnu Review : देशभक्तीवर आधारित चित्रपट हे सिनेसृष्टीत अनेक वर्षानुवर्षांपासून बनवले जात आहेत. जर या देशभक्तीपर चित्रपटांना योग्य न्याय दिला तर ते चित्रपट प्रेक्षकांच्या थेट हृदयाला भिडतात. भारतीय प्रेक्षक हे थोडेसे भावनिक असतात. मिशन मजनू हा चित्रपटदेखील अशाच प्रकारे तुमच्या हृदयाला स्पर्श करणारा आहे.       


कथा


चित्रपटाच्या नावावरुनच कळतं की चित्रपटात हिरोचं एक मिशन असणार आहे आणि हे मिशन काय असणार आहे हे चित्रपटाचा ट्रेलर पाहूनच कळतं. 1971 चं युद्ध हरल्यानंतर पाकिस्तान अणुबॉम्ब बनवत आहे आणि भारताला पाकिस्तानचं हे मिशन अयशस्वी करायचं आहे. साहजिकच हे मिशन मोडून काढण्याचं काम चित्रपटाच्या हिरोचंच असणार आहे. त्यामुळे ही जबाबदारी पाकिस्तानात शिंपी म्हणून राहणाऱ्या सिद्धार्थ मल्होत्रावर (Siddharth Malhotra) येऊन पडते, ती साहजिकच तो व्यवस्थितपणे पार पाडतो. सिद्धार्थ मल्होत्रा पाकिस्तानातील एका नेत्रहीन मुलीशी लग्न करतो. या नेत्रहीन मुलीची भूमिका अभिनेत्री रश्मिका मंदाना साकारतेय. हे मिशन कसं पूर्ण होतं आणि रश्मिकाचं नंतर काय होतं हे जाणून घेण्यासाठी तुम्ही नेटफ्लिक्सवर हा चित्रपट पाहू शकता.   


अभिनय


सिद्धार्थ मल्होत्राने शेरशाह चित्रपटापासून आपलं अभिनय कौशल्य सिद्ध केलं आहे. इथे सुद्धा सिद्धार्थने आपल्या अप्रतिम अभिनय कौशल्याचा ठसा उमटवला आहे. शिंपी आणि एजंटच्या भूमिकेत सिद्धार्थने भूमिका अगदी चोखपणे पार पाडली आहे. कॉमेडीपासून अॅक्शन आणि इमोशनपर्यंत सिद्धार्थ परफेक्ट आहे. रश्मिकाने नेत्रहीन मुलीची भूमिका साकारली आहे. या भूमिकेत रश्मिका फारच सुंदर दिसतेय. इतकंच नाही तर रश्मिकाची भूमिकादेखील तिने चांगली साकारली आहे. त्याचबरोबर कुमुद मिश्रासुद्धा एजंटच्या भूमिकेत आहे आणि तिचा अभिनयही जबरदस्त आहे. शारीब हाश्मीने देखील उत्तम अभिनय साकारला आहे.  


शांतनु बागची यांचं दिग्दर्शन चांगलं आहे. चित्रपट कुठेही न भरकटता थेट मुद्द्यावर येतो आणि कुठेही कंटाळवाणा वाटत नाही. 
    
हा चित्रपट 26 जानेवारीच्या जवळपास प्रदर्शित होणार आहे. याचाच फायदा चित्रपटाला होणार आहे. या चित्रपटात ज्या प्रकारे देशभक्तीचा रंग उधळण्यात आला आहे, त्याचा चित्रपटाला नक्कीच फायदा होणार आहे. चित्रपटाचे संगीतही चांगले आहे. केतन सोढा यांचं संगीत हृदयाला भिडते...रब्बा जानदा आणि माटी को माँ कहते है चित्रपटातील गाणी हृदयाला थेट भिडणारी आहेत. 


जर तुम्ही सिद्धार्थ आणि रश्मिकाचे चाहते असाल तर तुम्हाला हा चित्रपट नक्कीच आवडेल आणि जर तुम्हाला देशभक्तीशी संबंधित चित्रपट आवडत असतील तर हा चित्रपट नक्की पाहावा. 


VIDEO : Sidharth Malhotra Mission Majnu : मिशन मजनूच्या निमित्ताने सिद्धार्थ मल्होत्राशी गप्पा



वाचा इतर रिव्ह्यू : 


Kuttey Movie Review : अर्जुन कपूरचा 'कुत्ते' कसा आहे? जाणून घ्या...