House Arrest movie review: अनेकांना रोजच्या धकाधकीच्या जीवनाचा कंटाळा येतो. सर्व काम सोडून एकटच घरात बसायला अनेकांना आवडतं. पण एकाच घरात बरेच दिवस एकटं राहायला अनेकांना आवडत नाही. सध्या समाजात दोन प्रकारचे व्यक्ती अढळतात. एक- इट्रोव्हर्ट तर दुसरे एक्स्ट्रोव्हर्ट. यातील इट्रोव्हर्ट असणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतीये, असे अनेकांना वाटते. हे इट्रोव्हर्ट लोक फार कमी लोकांसोबत बोलतात तसेच या लोकांना सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये जायला देखील फारसं आवडत नाही. या लोकांना एकटं रहायला आवडतं. अशाच एका इट्रोव्हर्ट तरुणाची गोष्ट हाऊस अरेस्ट या चित्रपटात दाखवण्यात आली आहे. जपानमध्ये हिकिकोमोरी नावाचा प्रकार काही लोक पाळतात. यामध्ये लोक घराबाहेर पडत नाहीत. हाच प्रकार हाऊस अरेस्ट चित्रपटातील करण नावाचा तरुण फॉलो करत असतो. तो सहा महिने घराच्या बाहेर गेलेला नसतो. 


करणच्या घरात बरेच चित्र, खेळणी असतात. करण जेवण तयार करणे, कपडे धुणे या रोजच्या ठरलेल्या कामांमध्ये वेळ घालवत असतो. करणचा एक मित्र त्याला रोज फोन करत असतो. तोच मित्र करणची ओळख सायरा नावाच्या पत्रकारासोबत करुन देतो. सायराला करणबाबत एक आर्टिकल लिहायचं असते. त्यामुळे तिला करणची मुलाखत घ्यायची असते. करण सहा महिने घराच्या बाहेर गेलेला नसतो. तो वॉचमनसोडून कोणालाच भेटत नसतो. बिल्डिंगचा वॉचमन त्याला फळ, भाज्या तसेच इतर वस्तू आणून देत असतो. त्यामुळे करणला सायराला भेटण्याची इच्छा नसते. एकेदिवशी सायरा करणला फोन करते. त्यावेळी करण तिला भेटण्यास नकार देतो. पण सायरा करणला खूप विनवण्या करते. त्यामुळे करण मुलाखत देण्यासाठी सायराला तिच्या घरी बोलावतो. 


सायरा करणच्या घरी येण्याआधी करणच्या घराच्या शेजारी राहणारी पिंकी एक बॅग घेऊन करणच्या घरी येते. पिंकी ही एका डॉनची मुलगी असते. या बॅगमध्ये एका तरुणाला बांधून ठेवलेलं असतं, हे जेव्हा करणला कळतं तेव्हा करण घाबरतो. सायरा घरी येणार म्हणून करण त्या बॅगला एका खोलीमध्ये ठेवतो. सायरा करणच्या घरी येते. त्यानंतर सायराला करणची मुलाखत घेत असतानाच अचानक बॅगमधील मुलगा बॅगच्या बाहेर येण्याचा प्रयत्न करतो. नंतर काय होते? तो तरुण बॅग बाहेर येतो का? करण घराबाहेर जातो का? हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला हाऊस अरेस्ट हा चित्रपट पाहायला लागेल. हा चित्रपट तुम्ही नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहू शकता. 


स्टार कास्ट


हाऊस अरेस्ट या चित्रपटामध्ये करण ही भूमिका अभिनेता अली फजलनं साकारली आहे. तर सायरा ही भूमिका श्रिया पिळगावकर असून पिंकी ही भूमिका बरखा सिंहनं साकारली आहे.