Milind Gawali:  छोट्या पडद्यावरील आई कुठे काय करते (Aai Kuthe Kay Karte) या मालिकेला प्रेक्षकांची पसंती मिळाली. या मालिकेमध्ये अभिनेते मिलिंद गवळी (Milind Gawali) हे अनुरुद्ध ही भूमिका साकारतात. मिलिंद हे सोशल मीडियावर आई कुठे काय करते या मालिकेच्या सेटवरील फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असतात. तसेच ते वेगवेगळ्या विषयांवरील पोस्ट देखील सोशल मीडियावर शेअर करतात. नुकत्याच एका पोस्टच्या माध्यमातून मिलिंद गवळी यांनी त्यांच्या बालपणीची आठवण चाहत्यांना सांगितली. त्यांच्या या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले. 


मिलिंद गवळी यांनी या पोस्टच्या माध्यमातून त्यांच्या बालपणीच्या आठवणी चाहत्यांना सांगितल्या. त्यांनी पोस्टमध्ये लिहिलं, 'मी लहानपणी बघितलेल्या माणसांमधील  बहुतेक सगळीच माणसं मला आवडायची, फक्त आमच्या घरी एक राजकारणी (politician) यायचे, ते आमचे नातेवाईक होते, ते आले की घरामधले वातावरणच बदलून जायचं  सगळ्यांनची धावप, सगळे आपलं काम सोडून त्यांची वाट बघत बसायचे. ते आले की त्यांना खूप भाव मिळायचा, पण त्यांना भेटलं की मला एक खूप माज असलेला अहंकारी माणूस त्यांच्यामध्ये दिसायचा, तेव्हाच मी ठरवलं होतं की, आयुष्यामध्ये कधीही असं राजकारणी व्हायचं नाही.'


मिलिंद गवळी यांनी त्यांच्या “हम बच्चे हिंदुस्तान के” या त्यांच्या पहिल्या चित्रपटाचा उल्लेख देखील या पोस्टमध्ये केला आहे. तसेच त्यांनी अमिताभ बच्चन, विनोद खन्ना या अभिनेत्यांचा देखील उल्लेख या पोस्टमध्ये केला. 






 मिलिंद गवळी यांनी पालखी, आधार आणि वैभव लक्ष्मी या चित्रपटांमध्ये काम केले आहे. ते सध्या आई कुठे काय करते या मालिकेमधून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत.  या मालिकेच्या कथानकाला आणि कलाकारांच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. या मालिकेमध्ये  रूपाली भोसले,मधुराणी प्रभुलकर यांनी देखील प्रमुख भूमिका साकारली आहे. आई कुठे काय करते या मालिकेत संजना ही भूमिका अभिनेत्री रूपाली भोसले ही साकारते तर अरुंधती ही भूमिका मधुराणी प्रभुलकर या साकारतात.


वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 


Aai Kuthe Kay Karte : 'मी असंख्य लोकांच्या शिव्या खातो'; 'आई कुठे काय करते' मालिकेतील अनिरूद्धची पोस्ट