Do Patti Movie Review : या चित्रपटात काजोलच्या दोन भूमिका आहेत. एक काजोल आहे, जी पोलिस इंस्पेक्टर आहे जी आरोपीला पकडते आणि दुसरी काजोल वकील असून आरोपींना शिक्षा देते. आता यामध्ये काजोलचं टॅलेंट म्हणावं की, निर्मात्याचा पैसे वाचवण्याचा प्रयत्न, ज्यामुळे हे दोन्ही भूमिका काजोलला देण्यात आल्या, हे तुम्ही चित्रपट पाहिल्यानंतरच ठरवा. यामध्ये दोन क्रिती सेनन आहेत, पण सीता आणि गीतासारखा त्यांचा वापर केला गेलेला नाही. डबल रोलमुळे जे कन्फ्युजन तयार होण्याची अपेक्षा होती, ते साध्य झालेलं दिसत नाही. चांगले कलाकार असूनही हा चित्रपट स्वस्त टाइमपास आहे.


कहाणी


या चित्रपटाची कहाणी सौम्या आणि शैली दोन जुळ्या बहिणींची आहे, जी कृति सेननने साकारली आहे. या बहिणी लहानपणापासूनच एकमेकांचा तिरस्कार करतात. फार लहान वयात आईवडिल साथ सोडतात. यानंतर या दोन्ही बहिणी मोठ्या झाल्यावर त्यांना ध्रुव सूद म्हणजेच शहीर शेख याच्यावर प्रेम जडतं. पण, ध्रुवचं लग्न एकीसोबत होतं आणि दुसरी बहीण बदला घेते. यानंतर एक अपघात होतो, एकाची हत्या करण्याचा प्रयत्न होतो, ज्यामध्ये काजोल म्हणजे विद्या आरोपीला पकडते आणि कोर्टात वकील बनून काजोल म्हणजेच विद्या खरा आरोपी कोण आहे, हे शोधण्याचा प्रयत्न करते. हा चित्रपट तुम्हाला नेटफ्लिक्सवर पाहता येईल.  


कसा आहे चित्रपट?


आजच्या जमान्यात कंटेंट खूप बदलला आहे, एकापेक्षा एक मर्डर मिस्ट्री, क्राईम थ्रिलर कंटेट ओटीटीवर उपलब्ध आहे, इंटरनॅशनल कंटेंट पण खूप आहे. या सर्वांसमोर हा चित्रपट तितका खास वाटत नाही. यामध्ये ट्विस्ट नाही आणि कथेला वळण नाही, ज्यामुळे तुम्हाला आश्चर्य वाटेल. हा चित्रपट सुंदर पर्वतरागांमध्ये चित्रित झाला आहे, पण यामध्ये पर्वतांचे सौंदर्य योग्यरित्या टिपता आलेलं नाही. कृति सेननच्या दुहेरी भूमिका योग्यरित्या मांडता किंवा दाखवता आल्या नाहीत. यामुळे चांगले कलाकारांचं टॅलेंट एक प्रकारे वाया गेलं आहे. दो पत्ती नावाचा हा चित्रपट मोबाईलवरील तीन पत्ती गेमसारखं मनोरंजन देखील देऊ शकत नाही, कनिका ढिल्लनची कथा खूपच कमकुवत आहे, तिने विषय चांगला निवडला आहे, पण तो नीट लिहिता आला नाही आणि ही या चित्रपटाची सर्वात मोठी कमतरता आहे. जर तुम्ही क्रिती सेनन, काजोल आणि शाहीर शेख यांचे चाहते आहेत, तर हा चित्रपट पाहा नाहीतर चित्रपट म्हणून हा सिनेमा फारच खूपच कमकुवत आहे.


अभिनय


काजोलने चांगलं काम केलं आहे, ती पोलीस आणि वकील या दोन्ही भूमिकेत चांगली दिसतेय. क्रितीने डबल रोलमध्ये चांगला अभिनय केला आहे, ती दिसायलाही खूप सुंदर आहे. शाहीर शेखचं काम सगळ्यात छान आहे. तन्वी आझमी आणि ब्रिजेंद्र काला यांचा अभिनयही चांगला आहे, पण कमकुवत कथेसमोर त्यांचा अभिनय फिका पडतो.


दिग्दर्शन आणि लेखन


कनिका ढिल्लनची कथा ही या चित्रपटाची सर्वात मोठी विलन आहे, तिने कथेत काहीतरी वेगळं करायला हवं होतं, जेणेकरून ती आजच्या चित्रपटांशी स्पर्धा करू शकेल. आज ओटीटी प्लॅटफॉर्मवर जी स्पर्धा फक्त हिंदी चित्रपटांमध्येच नाही, तर दाक्षिणात्य चित्रपट आणि आंतरराष्ट्रीय कंटेच यामध्येही आहे. यामध्ये शशांक चतुर्वेदीचे दिग्दर्शन ठीक आहे, पण कमकुवत कहाणीसमोर तो आणखी काय करू शकला असता, असा प्रश्न आहे. क्रिती सेनन या चित्रपटाची निर्माती देखील आहे, पण पुढच्या वेळी क्रितीने चित्रपटाच्या निर्मितीपूर्वी जास्तीत जास्त लक्ष कथेवर द्यायला हवं, कारण आजकाल कंटेटचं खरा 'किंग' आहे.


एकूणच हा चित्रपट मोठ्या कष्टाने तुमचा टाइमपास करेल.