Amitabh Bachchan Abhishek Bachchan 10 Apartments : बच्चन कुटुंब बॉलिवूडमधील चर्चित कुटुंबापैकी एक आहे. गेल्या काही काळापासून या कुटुंबात सर्व काही आलबेल नसल्याच्या बातम्या समोर येत आहे. अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्या नात्यात दुरावा आल्याचं बोललं जात आहे. अभिषेक-ऐश्वर्याच्या घटस्फोटाच्या चर्चादेखील मागील बऱ्याच महिन्यांपासून सुरु आहेत. एकीकडे बच्चन कुटुंबातील नात्यांमध्ये दुरावा आल्याचं बोललं जात असताना दुसरीकडे बच्चन कुटुंबाने मोठी गुंतवणूक केली आहे. अभिषेक बच्चन आणि अमिताभ बच्चन यांनी एक किंवा दोन नाही, तर 10 फ्लॅट विकत घेतले आहेत. 


बच्चन कुटुंबाची रिअल इस्टेटमध्ये मोठी गुंतवणूक


बॉलिवूडचे मेगास्टार अमिताभ बच्चन यांची देशविदेशात मालमत्ताआहे. मुंबईतही त्यांचा बंगला आणि ऑफिस आहे. यातच आता अमिताभ-अभिषेकने पुन्हा मोठी गुंतवणूक केल्याची बातमी समोर आली आहे. महानायक आणि ज्युनियर बच्चनने कोट्यवधींची गुंतवणूक करत सर्वांचं लक्ष वेधलं आहे. 


अमिताभ-अभिषेकने 10 फ्लॅट विकत घेतले


काही दिवसांपूर्वी केबीसीमध्ये अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसानिमित्त कुटुंबाचा व्हिडीओ दाखवण्यात आला, त्यामध्ये ऐश्वर्या दिसली नाही. अलीकडेच, जेव्हा ऐश्वर्याच्या चुलत भावाच्या वाढदिवसाच्या पार्टीत अभिषेक दिसला नाही, तेव्हा पुन्हा या कपलच्या घटस्फोटाच्या चर्चांना उधाण आलं. यादरम्यान एक मोठी बातमी समोर येत आहे. अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांनी दिवाळीपूर्वी रिअल इस्टेट मार्केटमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. बच्चन कुटुंबाने एक-दोन नव्हे तर 10 फ्लॅट्स खरेदी केले आहेत, ज्यांची किंमत कोट्यवधींमध्ये आहे.


मुंबईत कोट्यवधींची मालमत्ता खरेदी 


मीडिया रिपोर्टनुसार, अभिषेक बच्चन आणि त्याचे वडील महानायक अमिताभ बच्चन यांनी मुंबईत 24.95 कोटी रुपयांची प्रॉपर्टी खरेदी केली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, अभिषेक बच्चनने अलीकडेच मुलुंड पश्चिम, मुंबई येथे 24.95 कोटी रुपयांची मालमत्ता खरेदी केली आहे. अभिषेक बच्चनच्या या रिअल इस्टेटमधील गुंतवणूकीत अमिताभ बच्चन  सह-गुंतवणूकदार आहेत. या दोघांनी मिळून 10 फ्लॅट खरेदी केले आहेत.


अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांनी मुंबईच्या मुलुंड पश्चिम येथे ही नवीन मालमत्ता खरेदी केली आहे. या मालमत्तेची किंमत 24.95 कोटी रुपये असल्याचं सांगितलं जात आहे. अहवालानुसार, हे नुकतेच बांधलेले अपार्टमेंट्स ओबेरॉय रियल्टीच्या इटरनियाच्या प्रीमियम निवासी प्रोजेक्टचा भाग आहेत, यामध्ये 3 BHK आणि 4 BHK रेडी-टू-मूव्ह-इन फ्लॅट्स आहेत.


1.50 कोटी स्टॅम्प ड्युटी


मीडिया रिपोर्ट्सनुसार, बच्चन कुटुंबाने येथे एकूण 10 अपार्टमेंट खरेदी केले आहेत. या डीलमध्ये प्रत्येक अपार्टमेंटसाठी दोन कार पार्किंगची जागा देखील समाविष्ट आहे. या प्रोजेक्टसाठी एकूण 1.50 कोटी रुपयांचे मुद्रांक शुल्क लावण्यात आलं आहे. या 10 फ्लॅटचे क्षेत्रफळ 10,216 स्क्वेअर फूट असल्याचं सांगितलं जातं आहे.


बच्चन कुटुंबाने रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक वाढवली


बच्चन कुटुंबाने घेतलेल्या 10 फ्लॅट्सपैकी सहा अपार्टमेंट्स अभिषेक बच्चनने खरेदी केल्याचं सांगण्यात येत आहे, ज्याची किंमत सुमारे 14.77 कोटी रुपये आहे, तर अमिताभ बच्चन यांनी इतर चार अपार्टमेंट खरेदी केले आहेत. या गुंतवणुकीमुळे बच्चन कुटुंबाने रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक वाढली आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


अखेर घटस्फोट होणार? अभिषेक-निम्रतच्या अफेअरची चर्चांना उधाण, लग्नाबद्दल विचारताच अभिनेत्री म्हणाली...