Raj Thackeray ED Inquiry LIVE | साडेआठ तासांच्या चौकशीनंतर राज ठाकरे ईडी कार्यालयाबाहेर

कायदा-सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न उपस्थित होऊ नये आणि कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी मनसेच्या कार्यकर्त्यांना नोटीस पाठवल्या आहेत. राज ठाकरे यांच्या कृष्णकुंज निवासस्थानाबाहेर आणि दक्षिण मुंबईत मोठा पोलीस बंदोबस्त पाहायला मिळत आहेत.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 22 Aug 2019 08:20 PM
साडेआठ तासांच्या चौकशीनंतर राज ठाकरे ईडी कार्यालयाबाहेर,
कुटुंबासह राज ठाकरे कृष्णकुंजकडे रवाना
साडेआठ तासांच्या चौकशीनंतर राज ठाकरे ईडी कार्यालयाबाहेर,
कुटुंबासह राज ठाकरे कृष्णकुंजकडे रवाना
#BREAKING
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची चौकशी संपली
साडेआठ तासांच्या चौकशीनंतर राज ठाकरे ईडी कार्यालयाबाहेर
राज ठाकरे काही क्षणात ईडी कार्यालयाबाहेर येण्याची शक्यता,
ईडी कार्यालयाबाहेर कडक बंदोबस्त
बीड : राज ठाकरे समर्थक रस्त्यावर, सरकारविरोधात घोषणाबाजी करत मुख्यमंत्र्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करुन निषेध नोंदवला, बीड-अंबेजोगाई महामार्गावर रास्ता रोको
सरकार असंवेदनशील आहे, सुप्रिया सुळेंची टीका, सरकारच्या विरोधात राज ठाकरे बोलत आहेत म्हणून त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सरकार करत आहे, सुप्रिया सुळेंचा आरोप
ILFS घोटाळ्याप्रकरणी चौकशीसाठी ईडी कार्यालयात हजर होण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आपल्या कृष्णकुंज या निवासस्थानाहून रवाना झाले आहे. त्यांच्यासोबत आई, पत्नी शर्मिला, मुलगी उर्वशी, पुत्र अमित, सून मितालीही आहेत. ईडी कार्यालयाच्या जवळपास चहूबाजूंनी पोलिसांनी बॅरिकेटिंग केली आहे. मनसेचा विरोध पाहता, मुंबईतील प्रत्येक चौकात आणि मुख्य रस्त्यांवर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त आहे.
मनसे ठाणे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांना नौपाडा पोलिसांनी घेतलं ताब्यात, सोबत मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्तेही ताब्यात
मनसे ठाणे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांना नौपाडा पोलिसांनी घेतलं ताब्यात, सोबत मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्तेही ताब्यात
दादर, आझाद मैदान, मरिन ड्राईव्ह आणि एमआरए मार्ग पोलिस स्टेशन अंतर्गत भागात कलम जमावबंदी लागू, चारपेक्षा जास्त लोक जमण्यास मनाई
शर्मिला ठाकरे आणि अमित ठाकरे राज ठाकरेंसोबत ईडी कार्यालयात जाणार, अमित ठाकरेंची पत्नी मितालीही ईडी कार्यालयात जाण्याची शक्यता
मनसे ठाणे शहर अध्यक्ष रवी मोरे यांना कोपरी पोलिसांनी घेतले ताब्यात
मनसे कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड, बेस्ट बसेसना खबरदारी म्हणून जाळ्या बसवल्या
मुंबई : ईडी कार्यालयाला छावणीचं स्वरूप, ईडी कार्यालयाबाहेर
पोलिसांचा चोख बंदोबस्त
मुंबई : ईडी कार्यालयाला छावणीचं स्वरूप, ईडी कार्यालयाबाहेर
पोलिसांचा चोख बंदोबस्त
मनसे प्रवक्ते संदीप देशपांडे पोलिसांच्या ताब्यात, सरकार आणि ईडीचा निषेध म्हणून देशपांडे यांनी काळ्या रंगाचं 'EDiot Hitler' लिहिलेलं टी-शर्ट परिधान केलं होतं

पार्श्वभूमी

मुंबई : कोहिनूर मिलप्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज सकाळी 10.30 वाजता ईडीकडून चौकशी होणार आहे. दरम्यान कोहिनूरप्रकरणी माजी मुख्यमंत्री मनोहर जोशींची पुत्र उन्मेष जोशी आणि राजन शिरोडकरांची देखील गेल्या तीन दिवसांपासून चौकशी सुरु आहे.


राज ठाकरे यांना नोटीस मिळाल्यापासून मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. या पार्श्वभूमीवर कायदा-सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न उपस्थित होऊ नये आणि कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी मनसेच्या कार्यकर्त्यांना नोटीस पाठवल्या आहेत. राज ठाकरे यांच्या कृष्णकुंज निवासस्थानाबाहेर आणि दक्षिण मुंबईत मोठा पोलीस बंदोबस्त पाहायला मिळत आहेत.


राज ठाकरे यांनीही कार्यकर्त्यांना शांततेचं आवाहन केलं आहे. तसेच कुणीही ईडी कार्यालयाबाहेर जमा होऊ नये अशी विनंती त्यांनी कार्यकर्त्यांना केली आहे.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.