LIVE : मराठवाडा, विदर्भात पावसाचं कमबॅक, बळीराजाला दिलासा

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 01 Jan 1970 05:30 AM
नंदुरबार : धडगाव, तोरणमाळ, मोलगी परिसरात मुसळधार पावसाला सुरुवात, तापीसह नर्मदेच्या काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा
नाशिक : त्र्यंबकेश्वरमध्येही रात्रीपासून पावसाची दमदार बँटिंग, सकाळपर्यंत 65 मिमी पावसाची नोंद, अनेक भागात जनजीवन विस्कळीत
मुंबईत मुसळधार पाऊस, पवई तलाव भरला
यंदाच्या पावसाळ्यात पहिल्यांदाच बीडमधील सौताडा धबधबा ओसंडून वाहू लागला, पावसाची आतुरतेने वाट पाहणारे सुखावले
नांदेडमध्ये होत असलेल्या मुसळधार पावसामुळे 12 वर्षीय मुलाचा नाल्यात पडून मृत्यू, शहरातील पांडुरंग नगरमधील घटना
नांदेडमध्ये होत असलेल्या मुसळधार पावसामुळे 12 वर्षीय मुलाचा नाल्यात पडून मृत्यू, शहरातील पांडुरंग नगरमधील घटना
नांदेडमध्ये होत असलेल्या मुसळधार पावसामुळे 12 वर्षीय मुलाचा नाल्यात पडून मृत्यू, शहरातील पांडुरंग नगरमधील घटना
बीड जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या तुलनेत 49.15 टक्के पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील 11 तालुक्यातील 63 पैकी 35 महसूल मंडळात अतिवृष्टी झाली. यात बीड तालुक्यातील म्हाळसजवळा वगळता सर्वच ठिकाणी अतिवृष्टी झाली आहे. पावसामुळे ग्रामीण भागात नद्यांना पाणी वाढलं आहे. बीड, पाटोदा, गेवराई, शिरूर, अंबाजोगाई आणि केज या 6 तालुक्यात अतिवृष्टी झाली. माना टाकलेल्या खरीपाच्या पिकांना या पावसाचा मोठा फायदा होईल.
अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर नाशकात पावसाचं आगमन, काल रात्रीपासून संततधार सुरु, धरण क्षेत्रातही पावसाची दमदार हजेरी, गंगापूर धरणातून 11 वाजता 2 हजार क्यूसेकने पाण्याचा विसर्ग होणार, तर दारणा धरणातूनही 1100 क्यूसेकने पाण्याचा विसर्ग
नांदेड जिल्ह्यात 16 पैकी 12 तालुक्यात अतिवृष्टी, जिल्ह्यात 24 तासात सरासरी 100 मिमी, तर शहरात विक्रमी 144 मिमी पावसाची नोंद. महापालिका आयुक्त, अतिरिक्त जिल्हाधिकारी यांच्या घरात पाणी घुसलं, निम्मं शहर जलमय
अहमदनगरला जिल्ह्यातील चौदाही तालुक्यात दमदार पाऊस पडला. जिल्ह्यात सरासरी 40 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. जामखेडला सर्वाधिक 87 मिमी पावसाची नोंद झाली. तर पारनेरला 82 मिमी आणि पाथर्डी, कर्जतला 63 मिमी पाऊस पडला. त्याखालोखाल शेवगाव 53, श्रीगोंदा 45 मिमी, नगर 43, नेवासा 37, राहुरी 29 मिमी पावसाची नोंद झाली. श्रीरामपूर 19, अकोले 15, संगमनेर 10 आणि कोपरगावला 7 मिमी पाऊस पडला. यामुळे धरणसाठ्यात वाढ होण्यास मदत होणार आहे. पावसाने खरीप पिकांना दिलासा मिळाला आहे.
वाशिम जिल्ह्यात सकाळी 4 ते 5.30 वाजेपर्यंत जोरदार पाऊस
अकोला जिल्ह्यात रात्रभरात सरासरी १७.४३ मिमी पावसाची नोंद
नांदेड - पावसाची रिमझिम सुरूच, अनेक सखल भागात पाणी साचलं, लातूर फाटा चौकात मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याने वाहतूक बंद
पालघर जिल्ह्यात कालपासून सुरु असलेल्या पावसामुळे सूर्या प्रकल्पाच्या धामणी धरणात 91 टक्के पाणीसाठा, धरण क्षेत्रात 110 मिमी पावसाची नोंद, सूर्या आणि वैतरणा नदिला पूर
कल्याण-डोंबिवलीत रात्रभर पावसाची रिपरिप सुरू, अधून-मधून पावसाच्या जोरदार सरी, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर पट्ट्यातही रात्रभर पाऊस, कुठेही पाणी साचण्याची घटना नाही, रेल्वे सेवा अद्याप सुरळीत, रस्ते वाहतुकीलाही काही फटका नाही
नांदेड जिल्ह्यात रात्रभर जोरदार पाऊस
सोलापूर शहरासह जिल्ह्यात काल रात्रीपासून वरुणराजा पुनरागमन
परभणी, जालना, बीड, उस्मानाबाद, नांदेड, औरंगाबाद, हिंगोलीत जोरदार पाऊस
बीडमध्ये सर्वदूर रात्रभर संततधार
पुणे,सातारा,महाबळेश्वर परिसरात रात्रभर मुसळधार पाऊस सुरू
विदर्भासह मराठवाड्यात अनेक ठिकाणी पावसाची दमदार हजेरी
मुंबई - शहर आणि उपनगरांत सकाळपासून मुसळधार पावसाची हजेरी..
नवी मुंबई,डोंबिवली,ठाणे परिसरात रात्रभर पावसाची संततधार
पुण्यात मध्यरात्रीपासून जोरदार पाऊस सुरु
वसई विरार आणि मिरा भाईंदर शहरात पावसाची रिप रिप सुरु
अहमदनगरला तब्बल एक महिन्याच्या विश्रांतीनंतर पावसाला सुरुवात झाली. जिल्ह्यातील चौदाही तालुक्यात कमी अधीक प्रमाणात पाऊस पडला. शेवगाव, पाथर्डी, जामखेड, कर्जत,श्रीगोंद्यात पावसाची संततधार सुरु होती. त्याचबरोबर बेलवंडी, पारनेर राहुरीतही रात्रभर पावसाच्या सरी पडत होत्या.
या पावसाने खरीप पिकांना दिलासा मिळालाय. कपाशी, बाजरी मका, कांद्यासह खरीप पिकांना याचा फायदा होईल. पावसाला सुरुवात झाल्याने ज्वारीच्या पेरण्यांना वेग येणार आहे. मोठ्या खंडानंतर पावसाला सुरुवात झाल्याने बळीराजा सुखावला आहे. या पावसाने धरणसाठ्यांतही वाढ होण्यास मदत होईल.
मात्र खरिपाच्या पेरणीनंतर महिनाभर पावसाने दडी मारल्याने पिकांच्या वाढीवर परिणाम झाला. वाढीच्या अवस्थेत पाणी नसल्याने उत्पादन मोठ्या प्रमाणात घटण्याची शक्यता आहे.

पार्श्वभूमी

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.