ट्रेंडिंग
LIVE BLOG : पुन्हा पक्ष कसा उभा करायचा याची आम्हाला काळजी : शरद पवार
LIVE
Background
राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एका क्लिकवर
1. मुंबईत पहाटेपासून पावसाची संततधार, आजही मुंबईत मुसळधार पावसाची शक्यता, हवामान खात्याचा अंदाज
2. ठाण्यात सलग दोन दिवसात 3 जण उघड्या मॅनहोल आणि गटारात पडले, ठाणेकरांच्या जीवाला धोका असूनही महापालिका धृतराष्ट्राच्या भूमिकेत
3. सचिन अहिरांपाठोपाठ चित्रा वाघांचीही राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी, 30 जुलैला भाजपात प्रवेश करण्याची शक्यता, युतीत जाण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीचे 8 आमदारही रांगेत
4. शिवसेना आणि भाजपकडून विधानसभेसाठी स्वबळाची चाचपणी, युती झाल्यास शिवसेनेला तर वेगवेगळे लढल्यास भाजपला फायदा, युती धोक्यात
5. ममता बॅनर्जींना भेटण्यासाठी राज ठाकरे गुरुवारी कोलकाता दौऱ्यावर, ईव्हीएमविरोधात मोर्चेबांधणी करणार
6. झुंडशाहीच्या मुद्यावरून देशातल्या कलाकरांमध्ये उभी फूट, पत्र पाठवून मोदींना जाब विचारणाऱ्या 49 कलाकारांना 61 कलाकारांचं उत्तर