LIVE BLOG : पावसाचा जोर असल्याने रविवारच्या काही एक्सप्रेस रद्द

राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एका क्लिकवर

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 27 Jul 2019 08:46 PM

पार्श्वभूमी

मुंबई शहर आणि उपनगरात मुसळधार पाऊस पडत आहे. ठाणे, नवी मुंबई परिसरातही पहाटेपासून पावसाची संततधार सुरु आहे. त्यामुळे अनेक सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. रस्ते वाहतुकीवरही यामुळे परिणाम...More

मध्य रेल्वे मुंबई विभागामध्ये भरपूर पाऊस असल्यामुळे दिनांक 28.07.19 ला काही एक्सप्रेस रद्द केल्या आहेत.
गाडी क्रमांक 12118 अप आणि 12117 डाऊन मनमाड लोकमान्य टिळक टर्मिलन्स गोदावरी एक्सप्रेस दिनांक 28.07.19 ला रद्द करण्यात केलीली आहेत.
गाडी क्रमांक 22102 अप आणि 22101 मनमाड मुंबई राज्यराणी एक्सप्रेस दिनांक 28.07.19 ला रद्द करण्यात आलेली आहे .
गाडी क्रमांक 51153 डाऊन मुंबई भुसावळ पैसेजर गाडी दिनांक 28.07.19 ला रद्द करण्यात आलेली आहे