Maharashtra Breaking LIVE Updates: सर्वसामान्यांसह शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! मान्सून लवकरच केरळात दाखल होणार
Maharashtra Breaking LIVE Updates: देश-विदेशासह राज्यातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा फक्त एका क्लिकवर...
पार्श्वभूमी
Maharashtra Breaking LIVE Updates: राज्याच्या राजकारणासाठी एक मोठी बातमी समोर आलंय. राष्ट्रवादी नेते छगन भुजबळ आज सकाळी 10 वाजता मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.मुंबईच्या राजभवनात मंगळवारी सकाळी शपथविधीचा कार्यक्रम पार पडणार...More
किरण रिजीजू यांनी केला उद्धव ठाकरे यांना फोन, सर्वपक्षीय शिष्टमंडळात संदर्भात दिली माहिती
विविध देशांना भेट देणारे भारतीय शिष्टमंडळ आणि शिवसेना युबीटी सहभाग-
केंद्रीय मंत्री श्री. किरेन रिजिजू जी यांनी काल पक्षाध्यक्ष श्री. उद्धव ठाकरे जी यांच्याशी या शिष्टमंडळासंदर्भात दूरध्वनीवरून संवाद साधला.
हे शिष्टमंडळ दहशतवादाविरुद्ध आहे आणि याची खात्री मिळाल्यावर, आम्ही सरकारला आश्वासन दिले आहे की आम्ही या शिष्टमंडळाद्वारे आपल्या देशासाठी जे योग्य आणि आवश्यक आहे ते करू.
खासदार श्रीमती प्रियंका चतुर्वेदी जी देशभरातील इतर खासदारांसह शिष्टमंडळाचा भाग असतील.
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर, सर्व राजकीय पक्षांनी दहशतवादाविरुद्धच्या लढाईत, विशेषतः पाक-आधारित दहशतवादाविरुद्ध आणि त्यांचे तळ नष्ट करण्यासाठी पंतप्रधानांना पाठिंबा दर्शविला आहे.
दहशतवादाविरुद्ध कारवाई करणाऱ्या सशस्त्र दलांमध्ये आपण सर्वजण एक आहोत, याबद्दल कोणतेही दुटप्पी मत असू नये.
पहलगामवरील राजनैतिक परिस्थिती आणि अयशस्वी गुप्तचर/सुरक्षा यंत्रणेबद्दल आपले मत आहे आणि आम्ही आपल्या देशाच्या, आपल्या देशाच्या हितासाठी प्रश्न विचारत राहू.
तथापि, पाकिस्तान आधारित दहशतवादाला एकाकी पाडण्यासाठी आणि नष्ट करण्यासाठी आपण जागतिक स्तरावर एकत्र आले पाहिजे.
आम्ही केंद्र सरकारला असेही कळवले आहे की या कारणासाठी आम्ही एकत्र असलो तरी, गैरव्यवस्थापन टाळण्यासाठी या प्रतिनिधीमंडळांबद्दल पक्षांना चांगल्या प्रकारे माहिती देण्याचा एक नियम पाळला जाऊ शकतो.
कालच कॉलद्वारे आम्ही राष्ट्रीय हिताच्या अशा कोणत्याही कृतीला आमचा पाठिंबा पुन्हा जाहीर केला आहे.
पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली पहलगाम ते ऑपरेशन सिंदूर या विषयावर लवकरात लवकर चर्चा करण्यासाठी आणि यावर आवाज उठवण्यासाठी आम्ही सर्वपक्षीय बैठक बोलावण्याची विनंती केली आहे.
दहशतवादाविरुद्धच्या लढाईत आम्ही एकजूट आहोत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी 22 मे रोजी राजस्थानला भेट देणार
पाकिस्तानच्या ड्रोन हल्ल्यात राजस्थानला करण्यात आले होते लक्ष्य
नरेंद्र मोदी २२ मे रोजी राजस्थान दौऱ्यावर
बिकानेर - मुंबई एक्सप्रेस रेल्वेगाडीला हिरवा कंदील दाखवणार
सकाळी 11:30 वाजण्याच्या सुमाराला पंतप्रधानाच्या हस्ते अमृत भारत स्थानक योजनेअंतर्गत पुनर्विकसित केलेल्या देशनोक रेल्वे स्थानकाचे उद्घाटन होणार आहे. यावेळी पंतप्रधान बिकानेर - मुंबई एक्सप्रेस रेल्वेगाडीला हिरवा झेंडाही दाखवतील. त्यानंतर, ते 26,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या अनेक विकास प्रकल्पांची पायाभरणी, उद्घाटन आणि राष्ट्रार्पण करणार आहेत . यानिमित्ताने पंतप्रधान देशनोक इथे एका जाहीर कार्यक्रमाला संबोधितही करतील.
रायगड जिल्ह्यात पुन्हा मुसळधार
जिल्ह्यात माणगाव, तळा,रोहा,महाड तालुक्यात पुन्हा अवकाळी पावसाची दमदार हजेरी
जोरदार वाऱ्यासह अवकाळी पावसाची तुफान बॅटिंग
रायगड जिल्ह्याला आज हवामान विभागाकडून यलो अलर्ट
गडचिरोलीत बिनागुंडा परिसरात पाच नक्षलवाद्यांना अटक... पोलिसांवर हल्ला करण्याच्या उद्दिष्टाने छत्तीसगड मधून गडचिरोलीत शिरले होते नक्षलवादी...
36 लाख रुपयांचे बक्षीस असलेल्या पाच जहाल नक्षलवाद्यांना गडचिरोलीत अटक करण्यात आली आहे.. गडचिरोली पोलीसांच्या सी 60 पथक आणि सीआरपीएफ संयुक्त कारवाईत लाहेरी पोलीस स्टेशन अंतर्गत बिनागुंडा परिसरात केलेल्या कारवाईत हे 5 जहाल नक्षलवादी यांना अटक करण्याचे यश आले आहे..
अटक करण्यात आलेल्या नक्षलवाद्यांकडून मोठ्या प्रमाणावर हत्यार व इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे...
विशेष म्हणजे जानेवारी 2022 पासून आतापर्यंत 103 नक्षलवाद्यांना अटक करण्यात आली असून गेल्या साडेतीन वर्षात अटक करण्यात आलेल्या नक्षलवाद्यांची संख्या शंभर पार गेली आहे.
सर्वसामान्य आणि शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी
मान्सून लवकरच केरळात दाखल होणार
पुढील ४-५ दिवसांत केरळमध्ये मान्सून दाखल होण्यासाठी अनुकूल वातावरण
लक्षद्वीप क्षेत्राचा काही भाग, केरळ, तामिळनाडूचा काही भाग; दक्षिण आणि मध्य बंगालचा उपसागर, ईशान्य बंगालचा उपसागर आणि ईशान्येकडील राज्यांच्या काही भागांमध्ये नैऋत्य मान्सून दाखल होण्यास परिस्थिती अनुकूल
भारतीय हवामान विभागाची माहिती
२७ मे पर्यंत मान्सून केरळमध्ये दाखल होण्याचा भारतीय हवामान विभागाने वर्तवला होता अंदाज
पुणे: पुरंदर तालुक्यातून जाणाऱ्या पुणे पंढरपूर महामार्गावर सासवड नजीक खळद येथील रासकरमळा येथे पहाटेच्या वेळी एक टेम्पो प्राथमिक शाळेच्या इमारतीला जाऊन धडकला आहे. यामध्ये शाळेच्या एका वर्ग खोलीच पूर्ण नुकसान झाले आहे. सुदैवाने यामध्ये कोणीही गंभीर जखमी झाले नाही. मात्र यामध्ये शाळेचे इमारतीचं नुकसान झाल्याचं खळद येथील सरपंच संदीप यादव यांनी सांगितलय. विशेष म्हणजे या उन्हाळ्याच्या सुट्टीतच या इमारतीच्या बोलक्या भिंती रंगवण्याचे काम करण्यात आलं होतं आणि आता जूनमध्ये विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी ही शाळा तयार करण्यात आली होती. पुणे पंढरपूर महामार्गाचे रुंदीकरण केल्यानंतर रस्ता आता शाळेच्या इमारती पर्यंत गेला आहे.त्यामुळे भरधाव वाहनांच नियंत्रण सुटल्यानंतर मोठा अपघात या ठिकाणी घडू शकतो. हा अपघात सुट्टीच्या दिवसात आणि रात्रीच्या वेळी घडल्याने कोणतीही मोठी जीवित हानी झाली नाही. मात्र अशा प्रकारचे अपघात घडू नयेत म्हणून बांधकाम विभागाने योग्य ती खबरदारी घ्यावी अशी मागणी आता खळद येथील ग्रामस्थ करत आहेत. याबाबत संबंधित टेम्पो चालकावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सासवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अधिकारी यांनी सांगितल आहे..
पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झालेला आरोपी पोलिसांच्या तावडीतून पसार
संशयिताला ताब्यात घेतल्यानंतर वैद्यकीय तपासणी घेऊन आलेल्या आरोपीची पोलिसांच्या हातावर तुरी
लघुशंकेचे कारण देत संशयित निसटला
रोहित नंदिवाले असे संशयित आरोपीचे नाव
अल्पवयीन मुलीवर लैंगिक शोषण केल्याचा आरोप
१५ मे रोजीची घटना, पोलिसांकडून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न
धनंजय मुंडेंचा मंत्रालयातील कक्ष २ महिन्यांनी उघडला
छगन भुजबळांना मंत्रालयातील २०४ क्रमांकाचा कक्ष मिळण्याची शक्यता
मंत्रालयातील २०४ क्रमांकाच्या कक्षात साफसफाईचं काम सुरु
Tuljapur Drugs Case : तुळजापूर येथील बहुचर्चित ड्रग्स प्रकरणात आणखी दोन आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले. आबासाहेब गणराज पवार आणि नानासाहेब अण्णासाहेब खुराडे या दोन आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले. त्यामुळे अटकेत असलेल्या आरोपींची संख्या 18 वर पोहचली. ड्रग्ज प्रकरणात मुंबईतील आरोपींसह एकूण 36 आरोपींचा सहभाग आहे. प्रकरणातील 50 टक्के म्हणजेच 18 आरोपी अजूनही फरार आहेत.
सातारा: साताऱ्यातील शाहू कला मंदिर या नाट्यगृहाची दुरावस्था झाली आहे. सातारा नगरपालिका याकडे दुर्लक्ष करत असल्याने अभिनेते,नाट्य कलाकार,नागरिकांना त्रास सहन करावा लागतो आहे.ज्येष्ठ अभिनेते सयाजी शिंदे यांनी देखील या नाट्यगृहा बाबत नाराजी व्यक्त केली आहे.या नाट्यगृहाचे AC अनेक वेळा बंद पडतात,तर मेकअप रूम आणि स्वच्छतागृह देखील खराब असतात.अडगळीचे साहित्य देखील उघड्यावर टाकण्यात आलं आहे.
मेहनतीने जगावलेली केळीची लाखो रुपयांची बाग मे महिन्यातील वळवाच्या पावसामुळे उध्वस्त झाल्या असून यवतमाळच्या दिग्रस तालुक्यातील ईसापुर आणि उमरखेड तालुक्यातील माणकेश्वर शेत शिवारात झालेल्या या प्रकाराने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. ईसापुर शिवारात वर्षा बदुकले व संगीता बदुकले या अल्पभूधारक महिला शेतकऱ्यांनी चार एकरामध्ये साडेचार हजार केळीच्या झाडांची लागवड केली होती. माणकेश्वर येथील विकास पतंगे यांनी 43 डिग्री तापमानातही पाण्याचे नियोजन करून बाग वाचवली। मात्र पीक हाती येण्याच्या मार्गावर असताना वळवाच्या वादळी वारा वपावसाच्या तडाख्याने संपूर्ण बाग जमीनदोस्त झाली यामुळे मोठे फ्लबागेचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.
उजनी धरणातून कुरुलच्या डाव्या कालव्याच्या माध्यमातून सीना नदीत पोहोचलं पाणी
दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, मोहोळ तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी उजनीतून सीना नदीत तिसरा आवर्तन सोडण्यात आलंय
शेती आणि जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी शेतकऱ्यांनी पाटबंधारे विभागाकडे केली होती मागणी
तर भाजप आमदार सुभाष देशमुख यांनी सीना नदीत उजनीतून पाणी सोडावे या मागणीसाठी सिंचन भवन येथे केलं होतं आंदोलन
शेतकरी आणि आमदारांच्या आंदोलनानंतर पाणी सोडण्याचे आश्वासन प्रशासनाने दिले होते
या पाण्यामुळे दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर आणि मोहोळ तालुक्यातील सीना नदीवरील बंधारे m भरले जाणार
Jayant Naralikar Passed Away: ज्येष्ठ खगोल शास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचं पुण्यातील राहत्या घरी निधन झालंय . ते 86 वर्षांचे होते. आंतररष्ट्रीय स्तरावर ज्यांचा खगोल शास्त्रातील अधिकार मान्य झाला होता असे जयंत नारळीकर तेवढ्याच रसाळ भाषेत मराठी विज्ञनकथा लिहीण्यासाठी देखील लोकप्रीय होते. केंब्रीज विद्यापीठात उन शिक्षण घेतल्यावर ते भारतात परतले . आधी टाटा मुलभुत संशोधन संस्थेत त्यांनी काम केले. त्यानंतर आयुका संस्थेच्या उभारणीत त्यांचा सिंहाचा वाटा राहीला. 2021 मधे नाशिकमध्ये झालेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते . पहाटे झोपेतच त्यांची प्राणज्योत मालवली.
Amit Shah Maharashtra Visit: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पुढील आठवड्यात महाराष्ट्र दौऱ्यावर
भारत-पाक युद्धानंतर शाहांचा पहिलाच महाराष्ट्र दौरा
अमित शाहा 26 मे रोजी नांदेडमध्ये घेणार जाहीर सभा
मंत्री अतुल सावेंकडून जाहीर सभेच्या तयारीचा आढावा
सभेच्या यशस्वीतेसाठी सावेंकडून नियोजन
जबाबदाऱ्या आणि कार्यभार निश्चितीवर सविस्तर चर्चा झाल्याची माहिती
Beed Crime: अल्पवयीन पुतणीवर अत्याचार करणाऱ्या चुलत्याला बीडच्या जिल्हा आणि सत्र न्यायालयानं आजीवन कारावासाची शिक्षा सुनावलीय. या प्रकरणात 18 साक्षीदार तपासण्यात आले. ऑगस्ट 2023 मध्ये पीडीतेच्या पोटदुखीच्या आजारावरून तपासणी केली असता ही बाब उघड झाली होती.
या प्रकरणात आरोपी असलेल्या चुलत्या विरोधात गुन्हा सिद्ध करण्यासाठी पीडितेची फिर्याद, डॉक्टर न्यायवैद्यक प्रयोगशाळेचे तज्ञ आणि इतर एकूण 18 साक्षीदार तपासले गेले. या प्रकरणात पीडितेचा पुरावा तसेच वैद्यकीय पुरावा आणि डीएनए तपासणी अहवाल साक्षीदारांचा पुरावा ग्राह्य धरून न्यायालयाने ही शिक्षा सुनावली आहे.
Thane Water Cut: ठाण्याच्या काही भागात 21 मे रोजी सकाळी 9 ते रात्री 9 वाजेपर्यंत दुरुस्तीच्या कामामुळे पाणीपुरवठा बंद राहणार आहे. ठाणे महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा योजनेतील पिसे उदंचन केंद्र आणि टेमघर जलशुद्धीकरण केंद्रात उच्च दाब, उप केंद्रातील पावसाळापूर्व आवश्यक देखभाल-दुरुस्ती, कंट्रोल पॅनलची दुरुस्ती, ट्रान्सफॉर्मर ऑईल फिल्ट्रेशन आदी अत्यावश्यक कामे करण्यात येणार आहेत. त्यामुळे आवश्यक पाणीसाठा करून ते पाणी काटकसरीनं वापरण्याचं आवाहन ठाणे महापालिकेतर्फे करण्यात आले आहे.
11th Admission: अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला आजपासून सुरुवात झालीये. पहिले दोन दिवस सरावासाठी असणार आहेत. त्यानंतर 21 मे पासून प्रत्यक्ष ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे. 21 मे ते 28 मे दरम्यान पहिल्या फेरीसाठी अर्ज भरण्यासाठी विद्यार्थ्यांना वेळ देण्यात आला आहे. अकरावीला प्रवेश घेताना विद्यार्थ्यांला ऑनलाईन अर्ज दाखल करणे अनिवार्य असणार आहे. अर्ज करताना प्रवेशासाठी विद्यार्थ्यांनी शैक्षणिक दाखले आणि कागदपत्रे तयार ठेवावीत, असे आवाहन माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
India Pakistan Tension: भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर तुर्कीने पाकला समर्थन दिलं. यामुळे आयआयटी मुंबईने तुर्कीतील शैक्षणिक संस्थांशी असलेले करार स्थगित केलेत. टाटा समाज विज्ञान संस्थेनंतर आता मुंबईतील दुसऱ्या मोठ्या शिक्षण संस्थेनं हा निर्णय जाहीर आहे. आयआयटी-मुंबईच्या काही विभागांचे तुर्कीतील विद्यापीठांबरोबर प्राध्यापक देवाण-घेवाण कार्यक्रम सुरू आहेत. हे करार स्थगित झाल्यानं आता दोन्ही देशांतील प्राध्यापकांना शैक्षणिक उपक्रम आणि अन्य कामांसाठी सहकार्य करता येणार नाही. जवाहरलाल नेहरू विद्यापीठ, जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठ आणि आयआयटी- रुरकी यांनीही या पूर्वी करार स्थगित केले आहे.
Pune Crime: नांदेड सिटीकडून शहरात येताना अचानक तुटलेली केबल दुचाकी स्वराच्या मानेला घासून अपघात झाल्याची घटना नुकतीच घडली आहे. या दुचाकी स्वराच्या गळ्याला गंभीर जखम झाली आहे. ही केबल कुणाची आणि ती तिथे कशी आली? याचं उत्तर नसल्याचा दावा महापालिका प्रशासनानं केला आहे.
या बेकायदा केबल शहरातील सर्वच रस्त्यावर असलेले दूध चाकी स्वारांसाठी पतंगाच्या मांज्यासारखा धोकादायक झाले आहेत.
विश्व परदेशी असे जखमी झालेल्या दुचाकी स्वराचे नाव आहे या अपघातानंतर दुचाकीस्वार परदेशी यांनी महापालिकेच्या पोर्टलवर ऑनलाईन तक्रार नोंदवली.
Kalyan Accident: कल्याण पश्चिम येथील गांधारी ब्रिजवर सकाळी भीषण अपघात झाला. रिक्षाला धडक देऊन डप्पर थेट ब्रिजचे तोडून नदीमध्ये पडल्याची घटना घडली आहे. हा अपघात इतका भीषण होता की यामध्ये रिक्षाचा चक्काचूर झाला आहे. अपघात नेमका कसा झाला याबाबत अद्याप माहिती मिळू शकली नाही. पोलीस घटना स्थळी दाखल झाले आहेत.
Pune News: इंदापूर तालुक्यातील छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीकडे संपूर्ण पुणे जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष लागलं होतं. अखेर पुन्हा एकदा या निवडणुकीत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एक हाती सत्ता राखत निर्विवाद वर्चस्व मिळवल आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार राज्याचे क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे आणि राज्य साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांच्या नेतृत्वातील श्री जय भवानी माता पॅनेलचे 21 पैकी 21 उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी झाले आहेत. संघर्षमय झालेल्या या लढतीमध्ये श्री जय भवानी माता पॅनलने श्री छत्रपती बचाव पॅनल चा सुपडा साफ केला आहे.
Pune News: पुण्यात कापडी कचऱ्यावर प्रक्रिया आता करण्यात येणार आहे त्यासाठी पुणे महापालिकेचा 75 टन क्षमतेचा प्रकल्प उभारणार आहे
पुणे शहरात दररोज मोठ्या प्रमाणात गाद्या, उशा, चिंध्या यांसारखा कापडी कचरा जमा होतो. सध्या या कचऱ्यावर कोणतीही प्रक्रिया होत नसल्याने तो साठवून ठेवावा लागतो, ज्यामुळे आग लागण्याचा व प्रदूषणाचा धोका वाढतो.
या पार्श्वभूमीवर महापालिकेकडून 75 टन क्षमतेचा कापडी कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
शहराच्या विविध भागांतील महापालिकेच्या आरक्षित जागांची पाहणी सुरू असून, लवकरच ठिकाण निश्चित करण्यात येणार आहे. या प्रकल्पातून कापडाचा पुनर्वापर करून कमी दर्जाचे मॅटरेसेस तयार केले जाणार आहेत.
Pune News: पावसामुळे कोथिंबिरीची आवक घटल्याने मार्केट यार्डातील घाऊक बाजारात तिच्या दरात जुडीमागे 5 रुपयांनी वाढ झाली आहे
कोथिंबीर जुडीसाठी 15 ते 20 रुपये (किरकोळ बाजारात 20–30 रुपये) दर मिळतो आहे.
दुसरीकडे, मेथीची आवक मागील आठवड्याच्या तुलनेत दुप्पट म्हणजे 30 हजारांवरून 60 हजार जुडींवर गेली आहे. त्यामुळे मेथीच्या भावात 10 रुपयांची घट झाली असून, घाऊक बाजारात मेथी 12 ते 15 रुपयांना मिळते.
अंबाडी व चुकाही किंचित महागल्या असून, पुदिना व चवळईच्या भावात जुडीमागे 1 रुपयांनी घट झाली आहे
Mumbai Metro: मेट्रो मार्ग दोन वरील एक्सर मेट्रो स्थानकाजवळील रस्त्यावर भलामोठा खड्डा पडल्याची घटना घडलीये. बोरिवली आणि एक्सर मेट्रो स्थानकादरम्यानच्या रस्त्यावर हा खड्डा पडलाय. रस्त्यावर अचानक खड्डा पडल्याने वाहनचालकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. याच रस्त्याखाली भूगर्भात महापालिकेच्या माध्यमातून विविध कामे सुरू आहे. या खड्ड्यामुळे पालिकेच्या कामावर शंका उपस्थित केली जातेय. सध्या महापालिकेकडून खड्ड्याभोवती बॅरिगेटिंग करून वाहतुकीचा मार्ग मोकळा केलाय.
Thane News: ठाणे शहरात सिद्धेश्वर तलावात 24 दिवसांत सलग तिसऱ्यांदा शेकडो माशांचा मृत्यू झाला, यामुळे महापालिकेचे प्रदूषणमुक्तीचे प्रयत्न फोल ठरल्याचं स्पष्ट झालं आहे. या प्रकाराबद्दल भाजपाचे माजी गटनेते नारायण पवार यांनी संताप व्यक्त केला आहे. मोठ्या प्रमाणात सिद्धेश्वर तलावामध्ये जलपर्णी दिसून येत आहे. आजूबाजूच्या नागरिक वस्ती मध्ये राहणारे लोकांचे सांडपाणी, कचरा आणि कमी ऑक्सिजनमुळे माशांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात महानगरपालिका कशाप्रकारे तलाव सुशोभीकरण करणार हे देखील पाहणं गरजेच राहणार आहे.
Vasai-Virar News: वसई-विरार शहर महापालिकेतील नगररचना विभागातील वादग्रस्त आणि भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली असलेले उपायुक्त वाय. एस. रेड्डी यांना अखेर निलंबित करण्यात आलं आहे. महापालिका आयुक्त अनिलकुमार पवार यांनी ही कारवाई केली असून, संबंधित पदासाठी नव्या अधिकाऱ्याची नियुक्ती करण्याची मागणी महाराष्ट्र शासनाकडे करण्यात आली आहे.. ही कारवाई 14 मे रोजी सक्तवसुली संचालनालयाने केलेल्या मोठ्या छापेमारीनंतर करण्यात आली. नालासोपारातील 41 अनधिकृत इमारतींच्या प्रकरणी, ईडीने एकाचवेळी 13 ठिकाणी छापे टाकले होते. या मोहिमेतील सर्वात मोठा खुलासा वाय. एस. रेड्डी यांच्या हैदराबादमधील घरातून झाला. छाप्यात 8.6 कोटींची रोख रक्कम, 23.25 कोटींचे हिरेजडित दागिने, तसेच सोने व चांदी जप्त करण्यात आले होते.
Mumbai News: घाटकोपरमध्ये नाल्यात पडलेल्या मुलीला तरुणाने वाचवले मात्र वाचवताना तो स्वतः बुडून त्याचा मृत्यू झालाय. मुंबईतील घाटकोपर परिसरातील रमाबाई कॉलनीमध्ये ही घटना घडलीये. नाल्यात पडलेल्या मुलीला वाचवण्यासाठी गेलेल्या दोन तरुणांपैकी एकाचा बुडून मृत्यू झाला. आहेशहजाद शेख असं मयत तरुणाचे नाव आहे. काल दुपारी सात वर्षाची सोनाली बंजारा ही नाल्याजवळ खेळत असताना तिचा चेंडू नाल्यात गेल्याने तिने नाल्यात उडी मारली आणि ती नाल्यात बुडू लागली.या वेळी आरडा ओरडा ऐकून शहजाद शेख आणि संदीप सुतार या मुलीला वाचविण्यासाठी नाल्यात उतरले.शहजाद् ने संदीप च्या मदतीने मुलीला वाचवले. मात्र तो नाल्यातील गाळामध्ये अडकला आणि बुडाला. घटनास्थळी पोलिस आणि अग्निशमन दलाच्या मदतीने शहजादचा मृतदेह नाल्यातून बाहेर काढण्यात आला. या घटनेमुळे या परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील तळवली गावात एका 14 वर्षीय मुलाचा खड्यातील पाण्यात पडून दुर्देवी मृत्यू झाला आहे. 14 वर्षीय परशुराम लंकेश्वर खेळत होता, त्यावेळी बाजूला असलेल्या खड्यात साचलेल्या पाण्यात त्याचा चेंडू गेला होता. बांधकामासाठी खोदलेल्या खड्यात पाणी साचलं होतं. पाण्यात गेलेला चेंडू काढण्यासाठी गेलेल्या परशुरामचा पाय घसरला आणि तो खड्यात पडला. पोहता न आल्यानं त्याचा बुडून यात दुर्देवी मृत्यू झाला. बांधकामासाठी खोदलेला हा खड्डा तात्काळ बुजवून टाकण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
APMC Navi Mumbai Market: नवी मुंबईत एपीएमसी मार्केट आवारात अंमली पदार्थांची विक्री करण्यासाठी आलेल्या दोघांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून 4 लाख रुपये किंमतीचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले. वाशीतील एपीएमसी मार्केटमधील पुनित कॉर्नर जवळच्या पार्कींगमध्ये 37 वर्षाचा दिनेश रमेश सालीयन आणि 26 वर्षाचा शिवम दयाशंकर सिंह सुमारे 4 लाख रुपये किंमतीचे एमडी, चरस आणि हायब्रिड गांजा विकण्यासाठी आले होते. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी या दोघांना अटक केली असून त्यांनी हे अंमली पदार्थ कुठून आणले याबाबत अधिक चौकशी करण्यात येत आहे.
Mumbai Natyagruha Updates: मुंबई महापालिकेचे नाट्यगृहांमध्ये महापालिकेने ठरवून दिलेल्या वेळेत कार्यक्रम संपला नाही, तर दर अर्ध्या तासाला 1 हजारांचा दंड आकारण्याचा नवा नियम लागू करण्यात आला. पालिकेच्या या आदेशाला जागतिक मराठी नाट्यधर्मी निर्माता संघानं विरोध केला आहे.
पालिकेच्या दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात नवीन व्यवस्थापकांनी नाट्यगृहात ठरवून दिलेल्या वेळेत कार्यक्रम संपला नाही, तर पुढील प्रत्येक अर्ध्या तासासाठी 1 हजारांचा दंड आकारण्यास सुरूवात केली आहे. या दंड मोहीमेविरोधात जागतिक मराठी नाट्यधर्मी निर्माता संघाचे सहकार्यवाह दिलीप जाधव यांनी मुंबई महापालिकेचे उपायुक्त अजितकुमार अंबी यांच्याकडे दाद मागितली आहे.
Aaditya Thackeray On BDD: वरळी आणि ना. म. जोशी बीडीडीच्या कामाची आमदार आदित्य ठाकरेंकडून पाहणी करण्यात आलीये.. बीडीडीची तयार झालेली घर ही बीडीडी वासियांना लवकर मिळतील अशी आशा असताना वारंवार तारीख हुकतेय यावरुन आदित्य ठाकरेंनी निशाणा साधलाय. महाविकास आघाडीच्या काळात सुरू झालेला हा प्रकल्प उत्तमरित्या पूर्णत्वास गेला असून ह्यावेळी बीडीडी येथील रहिवाशांसोबत प्रकल्पाविषयी चर्चा केली.
Ashish Shelar On Mumbai Road: मुंबईचे पालकमंत्री आशिष शेलारांकडून रस्त्यांच्या कामांची पाहणी कऱण्यात आली, यावेळी रस्त्यांची कामं पूर्ण झालेली नसल्याचं सांगितलं. 31 मेच्या डेडलाईनपर्यंत मुंबईतील रस्तेकामे पूर्ण होणं अशक्य असल्याचं शेलार म्हणाले. आतापर्यंत केवळ 65 किमी च्या रस्त्यांची सिमेंट कॉक्रीटीकरणाचं काम पूर्ण झालं असून ज्या कंत्राटदारांनी निकृष्ट दर्जाचं आणि अर्धवट काम केलंय त्यांच्यावर कारवाई होणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला. जूनपर्यंत रस्ते 100 टक्के वाहतूकीला योग्य करण्याचे प्रयत्न असल्याचं आश्वासन शेलारांनी दिलं
MNS On IND PAK Tensions: युद्धाचा निकाल स्पष्ट नसताना तिरंगा यात्रा काढणं योग्य नसल्याची भूमिका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं घेतलीय. याविषयी अमित ठाकरेंनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिलंय. या निमित्तानं मनसेच्या तळ्यात-मळ्यात भूमिकेची चर्चा पुन्हा नव्यानं सुरु झालीय. गेल्या पंधरा वर्षात मनसेनं बदललेल्या राजकीय भूमिकांचीच छबी ऑपरेशन सिंदूरबाबतच्या भूमिकेत झळकत असल्याचं बोललं जातंय.
Covid-19: २०२० साली चीनमधून आलेल्या कोरोना विषाणूनं जगभरात धुमाकूळ घातला. लाखो लोकांनी जीव गमावला. मात्र त्यानंतर अख्खं जग यातून हळूहळू सावरलं. पण आता हाच कोरोना पुन्हा एकदा डोकं वर काढतोय. भारतासह जगभरात कोरोना विषाणूबाधित नवे रुग्ण आढळतायत. मुंबईत 53 कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून आतापर्यंत एकाही रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला नाहीये.
Chhagan Bhujbal Oath Ceremony: राज्याच्या राजकारणासाठी एक मोठी बातमी समोर आलेय. राष्ट्रवादी नेते छगन भुजबळ आज सकाळी 10 वाजता मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. मुंबईच्या राजभवनात मंगळवारी सकाळी शपथविधीचा कार्यक्रम पार पडणार आहे. दरम्यान धनंजय मुंडेंच्या अन्न व नागरी पुरवठा खात्याची जबाबदारी आता भुजबळांवर देण्यात येणार असल्याची चर्चा सुरू आहे.. बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणानंतर धनंजय मुंडेंनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला..त्यांच्याकडे अन्न व नागरी पुरवठा खात्याची जबाबदारी होती. आता तेच खातं राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळाना देण्यात येणार असल्याची चर्चा आहे.
- मुख्यपृष्ठ
- बातम्या
- महाराष्ट्र
- Maharashtra Breaking LIVE Updates: सर्वसामान्यांसह शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! मान्सून लवकरच केरळात दाखल होणार