LIVE BLOG | पाटणामध्ये ईदचा चंद्र दिसला, देशभरात उद्या ईद
पाटणामध्ये ईदचा चंद्र दिसल्यामुळे लखनौ मरकजी चांद समितीने देशभरात उद्या ईद साजरी केली जाणार असल्याची घोषणा केली.
एबीपी माझा वेब टीम
Last Updated:
04 Jun 2019 10:49 PM
मुंबई : सायन आणि माटुंग्या दरम्यान रेल्वे ट्रॅकजवळ झाडाला आग लागल्यामुळे काही काळ लोकल वाहतूक थांबवली होती, आग विझवल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात, रेल्वे वाहतूक सुरु, मात्र लोकल उशिराने
पाटणामध्ये ईदचा चंद्र दिसला, देशभरात उद्या ईद साजरी होणार, सर्व मुस्लिम बांधवाना चाँद मुबारक
मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, दादर स्टेशनपासून गाड्यांची रांग, कल्याणकडे जाणाऱ्या गाड्या प्रचंड उशिराने, काही एक्स्प्रेसही खोळंबल्या, प्रवाशांची स्थानकांवर गर्दी
बारावीचे निकाल दोषपूर्ण असल्याने अभियांत्रिकी, वैद्यकीय, औषध निर्माण, वास्तूरचना आणि तत्सम शैक्षणिक अभ्यासक्रमांची संधी हुकण्याची भीती निर्माण झाल्याचा आरोप करत मुंबईतील हजारो विद्यार्थी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे मंत्रालयात मुख्यमंत्र्यांच्या भेटीला
महाराष्ट्रातील सर्व महापालिका आणि नगरपालिकांच्या कचरा डेपोत सेंद्रिय खत निर्मिती करावे आणि हे खत 50 टक्के सबसिडीने शेतकऱ्यांना द्यावे, यामुळे शेतकरी आत्महत्या थांबतील, जागतिक पर्यावरण दिन सोहळ्यात पर्यावरण मंत्री रामदास कदम यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
पुणे : डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणी संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांना 17 जूनपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे पुणे सत्र न्यायालयाचे आदेश
राज्यातील राजकीय घडामोडींनंतर चंद्रकांत पाटलांची दिल्लीवारी, नेत्यांचे पक्षप्रवेश, मंत्रिमंडळ विस्तार आणि प्रदेशाध्यक्ष निवडीवर चर्चेची शक्यता
मुंबई: राधाकृष्ण विखे पाटील गिरीश महाजनांच्या भेटीसाठी मंत्रालयात दाखल, महाजनांच्या भेटीपूर्वी मुख्यमंत्र्यांची सुद्धा भेट झाल्याची विखे पाटलांची माहिती
सिंधुदुर्ग : आंबोली, ओरोस, देवगड, कणकवलीत पावसाच्या हलक्या सरी, उकाड्यापासून नागरिकांना काहीसा दिलासा, जिल्यात सर्वत्र ढगाळ वातावरण
आगामी विधानसभा निवडणुका राष्ट्रीय समाज पक्ष स्वतःच्या चिन्हावरच लढणार, आम्ही एनडीएचे घटक पक्ष असलो तरी कमळावर विधानसभा लढण्यास तयार नाही, रासप अध्यक्ष आणि मंत्री महादेव जानकार यांचं स्पष्टीकरण
ठाणे: कॅसल मिल ब्रिजवरून बाईकसह थेट खाली पडल्याने एका माणसाचा मृत्यू
7. महाराष्ट्र कृषी विद्यापीठे अधिनियम आणि महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ अधिनियमात सुधारणा
काँग्रेसचे आमदार आणि विधानसभा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपण आज राजीनामा देणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. आज पक्षाने माझी कोंडी केली आहे. काँग्रेसमध्ये माझी घुसमट होत आहे. आज विधानसभा अध्यक्षकडे राजीनामा देणार आहे.
6. आर्मी जवानांसाठी आर्मी लॉ कॉलेज स्थापन करण्यासाठी राधा कलियानदास दरियानानी चॅरिटेबल ट्रस्ट आणि वेलफेअर एज्युकेशन सोसायटी यांच्यादरम्यानच्या जमिनीच्या बक्षीसपत्राच्या दस्ताचे मुद्रांक शुल्क माफ
5. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ विकासाशी संबंधित सवलत करारनाम्यांना मुद्रांक शुल्कातून आणि गौण खनिजावर आकारण्यात येणाऱ्या स्वामित्वधनातून सूट
4. सहकार विभागाच्या अटल अर्थसहाय्य योजनेसंदर्भात निर्णय
3. नाशिक येथील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या आस्थापनेवरील वैधानिक व शासन मंजूर पदावर कार्यरत अधिकारी-कर्मचाऱ्यांना वैद्यकीय खर्च प्रतिपूर्ती योजना लागू
2. महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या आस्थापनेवरील कर्मचाऱ्यांना 1 जानेवारी 2006 पासून सहाव्या वेतन आयोगाची सुधारित श्रेणी लागू. 1 जानेवारी 2006 ते 31 मार्च 2009 मधील वेतनाची थकबाकी देण्यात येणार
मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय
1. मुंबई महापालिकेच्या मालकीच्या जुन्या इमारती-चाळींच्या पुनर्विकासासाठीच्या त्रिपक्षीय करारनाम्यावर केवळ एक हजार रुपये मुद्रांक शुल्क निश्चित
डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणी अटकेत असलेल्या तिन्ही महिला डॉक्टर्सचा जामीनासाठी मुंबई सत्र न्यायालयात अर्ज, आजच सुनावणी होण्याची शक्यता, दरम्यान पुढील तपासासाठी आरोपींची कस्टडी मुंबई क्राईम ब्रांचला मिळवून देण्यासाठी सरकारी पक्ष हायकोर्टात दाद मागण्याच्या तयारीत
अकोला : मुस्लीम आमच्यासोबत आले नाहीत म्हणून लोकसभा निवडणुकीत पराभव, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य, राजू शेट्टी यांनी विधानसभेला कुणासोबत जावं आधीच ठरवावं : प्रकाश आंबेडकर
मुंबई सत्र न्यायालयातील एनआयए कोर्टात सुरु असलेल्या मालेगाव ब्लास्ट खटल्याची सुनावणी गुरूवारपर्यंत तहकूब, भाजप खासदार प्रज्ञासिंह ठाकूर कोर्टात लावणार हजेरी, प्रत्येक आरोपीला आठवड्यातून एकदा खटल्याला हजेरी लावणं अनिवार्य
बारामती : पूर्ववैमन्यस्यातून धारदार शस्त्राने वृद्धाची हत्या,
बारामती तालुक्यातील मेडद येथील घटना, जगन्नाथ गावडे असं मृत व्यक्तीचं नाव, घटनेनंतर आरोपी फरार, आरोपींना अटक झाल्याशिवाय मृतदेह ताब्यात न घेण्याची नातेवाईकांची भूमिका
LIVE : यादवांचं मतदान बसपाला मिळालं नाही, बसपा अध्यक्ष मायावतींची पत्रकार परिषद सुरु
नवी मुंबई : उरण भागात उड्डाणपूलाखाली अक्षपार्ह संदेश, उड्डाणपुलाच्या खांबावर काढण्यात आलेल्या मजकुरात इसिस, अबू बकर अल बगदादीचा उल्लेख, सुरक्षा यंत्रणा सतर्क
महाराष्ट्रावर पाणीसंकट, राज्यातल्या धरणांमध्ये 7.7 टक्के तर मराठवाड्यातील धरणांमध्ये 0.7 टक्के इतका पाणीसाठा, सांगलीत उद्योग आणि शेतीच्या पाण्यावर उपसाबंदी
सांगली : सांगली जिल्ह्यातील उद्योग व शेतीच्या पाण्यावर उपसाबंदी लागू, केवळ पिण्यासाठीच पाणी उपसा करण्यास परवानगी, जलसंपदा विभागाचा निर्णय, प्रचंड तापमान व उपसा यामुळे कृष्णा पाणलोट क्षेत्रातील धरणातील पाणीसाठा संपत आल्याने निर्णय
परभणीच्या पूर्णा तालुक्यात रात्री झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे अनेक घरांवरील पत्रे उडून गेल्याने जवळपास पंधरा जण जखमी झाले असून यातील तीन जणांची प्रकृती चिंताजनक आहे.
मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरात पुढील 48 तास मान्सून पूर्व पावसाची शक्यता ,स्कायमेटचा अंदाज
पार्श्वभूमी
राज्यातील महत्त्वाच्या बातम्यांचा संक्षिप्त आढावा
1. गुजरातमध्ये भाजप आमदाराची राष्ट्रवादीच्या महिलेला लाथा-बुक्क्यानं मारहाण, प्रकरण शेकण्याआधी महिलेकडून राखी बांधून प्रकरणावर पडदा
2. मुंबई मनपा उपायुक्त निधी चौधरींना महात्मा गांधींसंदर्भातलं ट्विट भोवलं, मंत्रालयाच्या पाणी पुरवठा विभागात बदली, विरोधकांच्या आंदोलनानंतर कारवाई
3.पिंपरीतल्या विश्व हिंदु परिषदेच्या शोभा यात्रेत मुलींच्या हातात तलवारी आणि रायफल्स, फायरिंगचा आवाज आल्याचा स्थानिकांचा दावा, 200 जणांवर गुन्हा
4.गर्भवती महिलेच्या हाकेनंतरही नागपूर शासकीय रुग्णालयातले डॉक्टर झोपेतचं, महिलेला करावी लागली स्वतःच्या हातानं प्रसुती, डॉक्टरांवर कारवाईची मागणी
5.दिल्लीत महिलांना मेट्रो, बस प्रवास मोफत, मुदतीपूर्वी दिल्ली विधानसभा निवडणुका होण्याच्या शक्यतेनं केजरीवालांचा मोठा निर्णय
6.पाकिस्तानचं इंग्लंडला हरवून विश्वचषकात जबरदस्त बाऊन्सबॅक; रूट आणि बटलरची शतकं, तरीही इंग्लंडच्या पदरी १४ धावांनी हार