दुधात गूळ मिसळून पिल्यास शरिराच्या अनेक मुलभूत गरजा पूर्ण होतात. रोगप्रतिकारक शक्ति वाढवणे, रक्त पुरवठा सुरळित होणे, थकवा दूर करणे, असे अनेक फायदे होतात, असं तज्ज्ञांचं मत आहे.
काय आहेत दूधात गूळ मिसळून पिण्याचे फायदे?
- दुधात गूळ मिसळून पिल्यास रक्त स्वच्छ राहण्यास मदत होते. रक्तामध्ये गाठी तयार होणे, रक्त पुरवठ्याचा त्रास होणे, अशा समस्या कमी होतात.
- पचनक्रिया तंदुरुस्त ठेवण्यासाठी आणि कफ टाळण्यासाठी याचा फायदा होतो.
- मासिक पाळीचा त्रास कमी करण्यासाठी याचा फायदा होतो.
- गुडघेदुखीच्या त्रासासाठीही याचा फायदा होतो.
- गरोदर महिलांना थकवा आणि अशक्तपणा जाणवल्यास दुधात गूळ मिसळून पिण्याचा सल्ला दिला जातो.