Indian Ordered 2 Biryanis In Second in 2022 : आपण जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात गेलो तरी भारतीय खाद्यपदार्थांची (Indian Food) ती चव आणि विविधता आपल्याला क्वचितच मिळेल. विविध देशाच्या विविध भागात एकापेक्षा एक चवीचे खाद्यपदार्थ आहेत, जे आवडीने खाल्लेही जातात. असे असले तरी, भारतीय आपल्या ताटात सध्या परदेशी पदार्थांचा समावेश करत असले तरी, आजही त्यांची जीभ फक्त देशी चवीकडेच वळत असल्याचं एका आकडेवारीतून स्पष्ट झालंय. भारतीय लोक खाण्यापिण्याच्या बाबतीत खूपच खवय्ये आहेत. आरोग्यासोबतच त्यांना चवीबाबतही तडजोड नको हवी असते. अशात, 2022 मध्ये त्यांच्या जीभेवर अजूनही अशी कोणत्या पदार्थांची चव होती? तर इथे कोणताही पिझ्झा-बर्गर नाही, तर भारतीय लोक संपूर्ण वर्ष (Year Ender 2022) स्वादिष्ट बिर्याणीवर (Biryani) ताव मारल्याचे दिसून आले आहे.
2022 वर्षातील लोकांचा आवडता खाद्यपदार्थ 'बिर्याणी'
फूड डिलिव्हरी अॅप स्विगीने 2022 मध्ये लोकांनी ऑनलाइन काय ऑर्डर केले? याचा डेटा जारी केला आहे. 'How India Swiggy'D 2022' या वार्षिक ट्रेंडमध्ये, वर्षातील सर्वाधिक ऑर्डर केलेली डिश 'बिर्याणी' आहे. या अहवालानुसार, कितीही पदार्थ बनवले जात असले तरी 2022 मध्ये फक्त बिर्याणीने आपली ताकद दाखवून दिली आहे. ही डिश प्रत्येक मिनिटाला 137 वेळा ऑर्डर केली गेली आहे, म्हणजे प्रति सेकंद 2 बिर्याणी. या वर्षी सर्वाधिक ऑर्डर केलेल्या टॉप 5 डिशमध्ये 'चिकन बिर्याणी' अव्वल आहे.
समोसेही भारतीयांचे सर्वाधिक आवडते...!
सर्वात जास्त ऑर्डर केलेल्या पदार्थांच्या यादीत भारतीयांनी मसाला डोसाला प्राधान्य दिले आणि या पदार्थाला सर्वाधिक ऑर्डर मिळाल्या. तर, चिकन फ्राईड राईस आणि पनीर बटर मसाला तिसऱ्या क्रमांकावर होता. चौथ्या क्रमांकावर बटर नान लोकांनी सर्वाधिक ऑर्डर केल्या होत्या. दुसरीकडे पाचव्या क्रमांकावर व्हेज फ्राईड राइस होता, जो लोकांनी सर्वाधिक ऑर्डर केला. आता स्नॅक्सबद्दल बोलायचे झाले तर लाडक्या समोशाने शतकानुशतके आपले वर्चस्व स्थापन केले आहे. स्विगीला एका वर्षात 40 लाख समोश्यांची ऑर्डर मिळाली, तर लोकांनी 22 लाख पॉपकॉर्नची ऑर्डरही दिली. पावभाजी, फ्रेंच फ्राईज, गार्लिक ब्रेडस्टिक्सचाही आवडीच्या स्नॅक्समध्ये समावेश होता.
इतर महत्वाच्या बातम्या
Year Ender 2022 : या वर्षात सर्वाधिक सर्च झालेले 'हे' आहेत आजार; नावं ऐकून तुम्हीही थक्क व्हाल