मुंबई : कोरोना व्हायरसमुळे देश अजूनही बऱ्यापैकी लॉकडाऊनमध्ये आहे. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव होऊ नये अनेकजण आजही घरातच आहेत. अनलॉकमुळं काही कामं सुरु झाली असली तरी अजूनही घरात असणाऱ्या बऱ्याच लोकांमध्ये मानसिक आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहेत. जगभरात कोरोना व्हायरसने हैदोस घातला आहे.  अनेक लोक आपल्या घरातच बंद आहेत. त्यामुळे अनेकांना मानसिक समस्यांचा सामना करावा लागत आहे. तुम्हालाही अचानक राग येतो का?, अचानक खूश होता का?, अचानक राग अनावर होऊन आक्रमक होता? किंवा कोणाला राग आला तर त्याची खिल्ली उडवता का? याव्यतिरिक्त तणाव, कंटाळा, एखादी गोष्ट आठवण्यात त्रास होणं, निर्णय घेण्यास भिती वाटणं, एकाग्रता कमी होणं, अशक्तपणा येणं, चक्कर येणं, श्वास घेण्यास त्रास होणं यांसारख्या समस्यांचा सामना करत असाल तर तुम्हीही मूड स्विंग्सचे शिकार झाला आहात.


Coronavirus Lockdown | लॉकडाऊनमुळे मूड स्विंग्सचा सामना करताय? जाणून घ्या उपाय


घरात आहात तर हे कराच




  • सध्याच्या परिस्थितीत मैदानी खेळ खेळणे कठीण आहे. त्यामुळे तुम्ही घरातच राहून शारीरिक व्यायामाचा शोध घ्यावा किंवा निवड करावी. दररोज एक तास नृत्य, योग किंवा ट्रेडमिल वापरणे यामुळे ताणतणावाचा सामना करणे चांगले, प्रतिकारशक्ती वाढवणे आणि झोपेची उत्तम पद्धत विकसित होण्यास मदत होते.

  • आपला आत्मविश्वास आणि इच्छाशक्ती चांगली ठेवावी यासाठी लोकांनी स्वत:ला प्रोत्साहन दिलं पाहिजे

  • या अनिश्चित काळात लढा देण्यासाठी तरुणांनी कोणत्याही प्रकारच्या अंमली पदार्थाचं सेवन टाळावं.

  • चिंता दूर करण्यासाठी, श्रवणीय संगीत ऐकणे, मित्र आणि कुटुंबियांकडे भावना व्यक्त करणे आणि पॅनिक अटॅकचा सामना करण्यासाठी परिस्थितीतून लक्ष अन्यत्र वळवणे. पॅनिक हल्ल्याचा सामना करत असल्यास, एखाद्याने स्वत:ला स्मरण करुन दिले पाहिजे की हे काही मिनिटांतच निघून जाईल आणि भावनातिरेकाने कोणतीही क्रिया करणे अनुचित ठरेल. गृहिणींनी नित्यक्रमांचे पालन केले पाहिजे ज्यात स्वत:ची काळजी घेणे समाविष्ट आहे.

  • गृहिणींना कामे पूर्ण करण्यात सहभागी होण्यासाठी लहान मुलांपासून कुटुंबातील वडीलधाऱ्यांपर्यंत प्रत्येकाच्या सहभागास प्रोत्साहन दिले पाहिजे. गृहिणींनी केवळ कामात बुडून न जाता कुटुंबासमवेत वेळ घालवला पाहिजे, छंद जोपासतानाच स्वतःची काळजी घ्यावी, पुस्तके वाचली पाहिजेत किंवा नियमित व्यायाम केले पाहिजे.


लॉकडाऊनदरम्यान मानसिक आरोग्याची काळजी कशी घ्यावी?, तज्ज्ञांचं मार्गदर्शन


लॉकडाऊनमध्ये मूड स्विंग्स दूर करण्यासाठी उपाय :


दररोज व्यायाम करा
वेळेत जेवण करा
वेळेत झोपा
स्वतःवर विश्वास ठेवा
जास्त विचार करू नका
कुटुंबासोबत वेळ घालवा
सकारात्मक विचार करा


(टिप : वरील बाबी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. ABP माझा यातून कोणताही दावा करत नाही.)


Coronavirus | एकदा संसर्ग झाल्यानंतर पुन्हा कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो का?


VIDEO | लॉकडाऊनच्या काळात मानसिक स्वास्थ्य कसं सांभाळावं? मानसोपचारतज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी यांचं विश्लेषण