World Diabetes Day 2023 : झपाट्याने बदलत्या जीवनशैलीमुळे लोक अनेक समस्यांना बळी पडत आहेत. मधुमेह (Diabetes) ही यापैकी एक समस्या आहे, ज्यामुळे अनेक लोक या आजाराने त्रस्त आहेत. भारतातही काही काळापासून मधुमेहाची प्रकरणे सातत्याने वाढत आहेत. मधुमेह हा असा आजार आहे जो नियमित औषधांनी आणि आपल्या जीवनशैलीत काही बदल केल्याने तो नियंत्रणात आणला जाऊ शकतो.


मधुमेहाच्या रुग्णांना त्यांच्या आहाराची विशेष काळजी घ्यावी लागते. रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या अशा अन्नपदार्थांचा आहारात समावेश करण्याचा सल्ला डॉक्टर रुग्णांना देतात. याशिवाय मधुमेही रुग्ण त्यांच्या दिनक्रमात काही बदल करून स्वत:ला निरोगी ठेवू शकतात. जर तुम्ही देखील या आजाराने त्रस्त असाल तर आज आम्ही तुम्हाला काही सकाळच्या दिनचर्येबद्दल सांगणार आहोत ज्यामुळे तुमची रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहण्यास मदत होईल. सर्वात महत्त्वाचं म्हणजे, मधुमेहाच्या रुग्णांनी आपल्या आहाराची विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. 


झोपण्याची आणि उठण्याची वेळ ठरवा


तुमची झोपण्याची आणि उठण्याची वेळ ठरवा. नेहमीप्रमाणे सुट्टीच्या दिवशी त्याच वेळी उठण्याचा प्रयत्न करा. असे केल्याने तुमची रक्तातील साखरेची पातळी दिवसभर स्थिर राहण्यास मदत होईल.


रक्तातील साखरेची पातळी चाचणी करा 


बेसिक रिडींग मिळविण्यासाठी तुम्ही तुमचा दिवस सुरू करताना सर्वात आधी तुमच्या रक्तातील साखरेची चाचणी करा. हे तुम्हाला रेकॉर्ड ठेवण्यास मदत करेल.


हेल्दी नाश्ता करा


तुमच्या रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी, सकाळचा निरोगी नाश्ता करणे महत्त्वाचे आहे. हे तुम्हाला तुमच्या रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यात आणि दिवसभर उर्जेने परिपूर्ण राहण्यास मदत करू शकते.


हायड्रेटेड राहा


निरोगी राहण्यासाठी शरीरात पुरेसे पाणी असणे अत्यंत आवश्यक आहे. जर तुम्ही मधुमेहाचे रुग्ण असाल तर दिवसभर पुरेसे पाणी प्या. हे तुम्हाला तुमच्या रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यात देखील मदत करते.


व्यायाम करा


जर तुम्ही मधुमेहाचे रुग्ण असाल तर व्यायामाला तुमच्या दिनचर्येचा भाग बनवा. दररोज सकाळी व्यायाम केल्याने रक्तदाबाची पातळी नियंत्रित ठेवता येते. याशिवाय तुम्हाला दिवसभर फ्रेशही वाटेल.


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. 


महत्त्वाच्या बातम्या :


Yoga For Women : महिलांनो, वयाच्या तिशीनंतरही निरोगी राहायचंय? तर, आजपासूनच तुमच्या दिनचर्येत 'या' 5 योगासनांचा समावेश करा