World Chocolate Day 2023 : आज जागतिक चॉकलेट दिन (World Chocolate Day 2023). चॉकलेट म्हटलं की लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच खायला आवडतं. वाढदिवस असो किंवा कोणताही शुभ प्रसंग चॉकलेटशिवाय हे दिवस अपुरेच वाटतात. मैत्रीचा हात पुढे करण्यापासून ते प्रेम व्यक्त करण्यापर्यंत चॉकलेट हा सर्वांना सोपा मार्ग वाटतो. जागतिक चॉकलेट दिन दरवर्षी 7 जुलै रोजी साजरा केला जातो. याच निमित्ताने चॉकलेट दिनाची सुरुवात नेमकी कशी झाली आणि मित्र-मैत्रीणींना शुभेच्छा देण्यासाठी कोणते संदेश वापराल याविषयी जाणून घ्या. 


आजकाल, चॉकलेट हे अनेक सेलिब्रेशनचा ट्रेंड झाला आहे. वाढदिवस, एनिवर्सरी, दिवाळी, रक्षाबंधन, ख्रिसमस यांसारख्या शुभ प्रसंगी सेलिब्रेशनचा एक पर्याय म्हणून गिफ्टच्या माध्यमातून लोक सहज एकमेकांना चॉकलेट देतात. आणि चॉकलेटच्या गोडव्याने सणाचा आनंद द्विगुणित करतात. आजकाल अनेक लहान-मोठ्या पॅकमध्ये उपलब्ध असलेली ही चॉकलेट्स लहान मुलांना अधिक आकर्षित करतात आणि त्यांना ती खूप आवडतात.


चॉकलेट डेची सुरुवात कशी झाली?


चॉकलेटच्या इतिहासाबद्दल सांगायचे तर, सर्वात पहिलं चॉकलेट 2000 वर्षांपूर्वी अमेरिकेच्या रेन फॉरेस्टमध्ये सापडलं होतं. खरंतर, कोकोच्या झाडाच्या फळात बिया असतात, ज्याचा वापर करून चॉकलेट बनवले जाते. सुरुवातीला चॉकलेट फक्त मेक्सिको आणि मध्य अमेरिकेत बनवले जात होते. त्यानंतर 1528 मध्ये स्पेनने मेक्सिकोवर कब्जा केला. यावेळी स्पेनचा राजा मोठ्या प्रमाणात कोकोच्या बिया आणि चॉकलेट बनवण्याची यंत्रसामग्री घेऊन गेला. त्यानंतर लवकरच, चॉकलेट हे स्पॅनिश लोकांचं आवडतं ठरलं.


मात्र, सुरुवातीला चॉकलेट चवीला कडू होते. नंतर चॉकलेटची चव वाढवण्यासाठी त्यामध्ये मध, व्हॅनिला, साखर आणि इतर अनेक गोष्टींचा वापर करण्यात आला. 1828 मध्ये, कॉनराड जोहान्स व्हॅन हॉटन नावाच्या डच रसायनशास्त्रज्ञाने चॉकलेट बनविण्याचे मशीन तयार केले, ज्याला कोको प्रेस असे नाव देण्यात आले. त्यानंतर 1848 मध्ये ब्रिटिश चॉकलेट कंपनी जे. जे. एर फ्राय अँड सन्सने पहिल्यांदा कोकोमध्ये बटर, दूध आणि साखर मिसळून ते घट्ट करण्यासाठी काम केले आणि पहिल्यांदा सॉलिड चॉकलेट बनवले.


तुमच्या मित्र-मैत्रीणींना आजच्या दिवशी 'या' शुभेच्छा द्या


1. नातं चॉकलेटसारखं असावं, 
कितीही भांडण झालं तरी
नात्यात कायम गोडवा ठेवणारं असावं 
हॅपी चॉकलेट डे!


2. “हृदय तुझे,


एका गोड चॉकलेट सारखे नाजूक,


त्यात तू एका ड्राय फ्रुटचा तडका


तूच आहेस माझ्या हृदयाचा तुकडा”


Happy Chocolate Day 2023!


3. गोड व्यक्तीसारखी नेहमी जवळ रहा
आयुष्याचे मधुर गीत गात रहा
नात्यातील गोडवा टिकून राहण्यासाठी
चॉकलेट डे च्या शुभेच्छा स्वीकार करा


हॅपी चॉकलेट डे!


महत्वाच्या बातम्या : 


Ghee Beauty Benefits : तूप खाऊन येईल रुप... ग्लोईंग त्वचा आणि डार्क सर्कलपासून सुटका हवीय, तुपाचा असा करा वापर