Women Safety : कोलकाता बलात्कार आणि हत्या प्रकरणाने (Kolkata Rape Case) संपूर्ण देशाला हादरवून सोडले, ज्यानंतर महिलांच्या सुरक्षेवर पुन्हा एकदा प्रश्न निर्माण झाले. अशात शासन व्यवस्थेबरोबरच तुम्हीही जागरुक राहण्याची गरज आहे. तुम्ही काम करत असाल आणि ऑफिस किंवा मीटिंगमधून रात्री उशिरा परत येत असाल तर तुम्हाला आणखी सतर्क राहण्याची गरज आहे. अशा परिस्थितीत तंत्रज्ञान आपल्याला खूप मदत करू शकते. आज, अनेक ॲप्स आणि साधने उपलब्ध आहेत, जी आपत्कालीन परिस्थितीत उपयुक्त ठरू शकतात. आज आम्ही अशा ॲप्सबद्दल बोलणार आहोत, जे प्रत्येक महिलेने आपल्या फोनमध्ये नेहमी ठेवावे.



हे ॲप्स तुमच्या फोनमध्ये ठेवा


Nirbhaya : Be Fearless - हे ॲप 2012 च्या घटनेनंतर लॉन्च करण्यात आले होते. या ॲपमध्ये अनेक फीचर्स आहेत, त्यातील एक म्हणजे 'जिओ फेंस'. या फीचरमध्ये तुम्ही तुमचे नियमित प्रवासाचे क्षेत्र निश्चित करू शकता. आणि तुम्ही यातून कधी बाहेर गेलात तर ग्रुपला मेसेज पाठवला जाईल. निर्भया ॲपमध्ये शेक टू अलर्टची सुविधाही आहे. यामध्ये फोन लॉक राहिला तरी त्याव्दारे निवडक नंबरवर अलर्ट मेसेज पाठवला जातो.


Raksha: Women Safety Alert - हे ॲप जुन्या व्हर्जनच्या अँड्रॉइड फोनमध्येही डाउनलोड केले जाऊ शकते. या ॲपचे वैशिष्टय़ म्हणजे फोन बंद किंवा काही मार्गाने अक्षम झाल्यास शेवटच्या लोकेशनचा तपशील तुमच्या विश्वासू संपर्कांशी शेअर केला जातो.


Woman Safety Shield Protection - या ॲपमध्ये तुम्ही तुमच्या सुरक्षेसोबतच इतरांच्या सुरक्षेचीही काळजी घेऊ शकता. या ॲपची खासियत म्हणजे यात फोटो काढण्याची सुविधाही आहे. या फीचरमध्ये तुम्ही फोटो काढताच तो तुमच्या रजिस्टर्ड ईमेल लिस्टमधील स्थानाशी जुळतो. ॲपमध्ये वॉक विथ मी हे फिचर असे आहे, ज्यामध्ये जीपीएस चालू ठेवून तुम्ही जिथेही जाल, रजिस्टर्ड नंबरवर तुमचे लाइव्ह लोकेशन शेअर केले जाईल. जीपीएस लाईव्ह लोकेशनसाठी अनेक ॲप्स उपलब्ध आहेत.


112 India - हे एक महिला सुरक्षा ॲप आहे. यामध्ये SOS वॉर्निंग फक्त एका टॅपने पाठवली जाऊ शकते. या ॲपच्या मदतीने आपत्कालीन परिस्थितीत नोंदणीकृत क्रमांकावर कॉल करता येतो.


महिला सुरक्षा ॲप


My Safetypin - या ॲपच्या मदतीने आपत्कालीन परिस्थितीत रजिस्टर्ड नंबरवर कॉल करता येतो. याशिवाय लोकेशन शेअर करण्याची सुविधाही यात आहे.


Noonlight - या ॲपमध्ये अलार्म बटणाचे वैशिष्ट्य आहे, जे दाबल्यावर तुमच्या रजिस्टर्ड नंबरवर सूचना पाठवली जाते.


Himmat Plus - हे ॲप महिलांना आपत्कालीन परिस्थितीत मदत करण्यासाठी तयार करण्यात आले आहे. हे ॲप दिल्ली पोलिसांनी सुरू केले आहे.


Safetypin - हे ॲप सार्वजनिक ठिकाणांच्या सुरक्षिततेची माहिती देते. तुम्हाला एखाद्या ठिकाणाचे सेफ्टी रेटिंग तपासायचे असेल तर हे ॲप ते प्रदान करते.
याव्यतिरिक्त, हे तुम्हाला सुरक्षित मार्ग निवडण्यात देखील मदत करते.


PinkShakti - हे ॲप यूपी पोलिसांनी महिलांना आपत्कालीन परिस्थितीत मदत करण्यासाठी डिझाइन केले आहे. हे ॲप महिला सुरक्षेसाठी तसेच जागरूकता आणि सक्षमीकरणासाठी तयार करण्यात आले आहे.


BSafe- या ॲपच्या मदतीने युजर आपत्कालीन परिस्थितीत कुटुंबातील सदस्य आणि मित्रांना माहिती देऊ शकतो. हे ॲप 2015 मध्ये लॉन्च करण्यात आले होते.


 


हेही वाचा>>>


 


Women Safety : महिलांनो..सोशल मीडियावर होतेय छेडछाड, घाबरू नका, बिनधास्त उत्तर द्या, 'या' 5 मार्गांनी स्वतःचे संरक्षण करा


(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )