Women Health: ते म्हणतात ना, जन्म बाईचा खूप घाईचा... महिलांना वाढत्या वयानुसार विविध शारिरीक आणि मानसिक आरोग्यांना सामोरे जावे लागते. अशात जर ती गरोदर असेल तर आणखीनच काळजी घ्यावी लागते. कारण जर गर्भवती महिलेला थायरॉईड असेल तर आई आणि गर्भातील बाळ दोघांनाही आरोग्याच्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. गर्भधारणेदरम्यान थायरॉईड हार्मोन्स पातळी वाढणे किंवा कमी होणे धोकादायक असू शकते. यावर नियंत्रण ठेवले नाही तर गर्भपातही होऊ शकतो. हे टाळण्यासाठी गरोदर महिलेने वेळोवेळी तपासून डॉक्टरांच्या सल्ल्याने नियंत्रणात ठेवावे. गर्भवती महिलेला थायरॉईड असल्यास त्याचे काय होते? किंवा गर्भधारणेदरम्यान थायरॉईड किती धोकादायक आहे? त्याबद्दल जाणून घ्या..


गर्भधारणेदरम्यान थायरॉईड असणे किती धोकादायक?


एका वृत्तवाहिनेने घेतलेल्या मुलाखतीनुसार, स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ.सीमा उपाध्याय सांगतात की, गरोदरपणात थायरॉईडची समस्या ही गर्भवती महिलेसाठी विशेष चिंतेची बाब असू शकते. हायपरथायरॉईडीझम म्हणजेच थायरॉईड संप्रेरकाचे जास्त उत्पादन गर्भधारणेदरम्यान स्त्रियांमध्ये दिसून येते. हायपोथायरॉईडीझमची समस्या देखील आहे, म्हणजे थायरॉईड संप्रेरक कमी उत्पादन. हे दोन्ही धोकादायक ठरू शकतात.


गर्भपाताचा धोका : गर्भधारणेच्या पहिल्या तिमाहीत हायपरथायरॉईडीझम आढळला नाही तर गर्भपात होण्याचा धोका वाढू शकतो.


प्री-एक्लॅम्पसिया : गर्भधारणेदरम्यान उच्च रक्तदाब आणि थायरॉईडसह मूत्रातील प्रथिनांचे प्रमाण वाढणे हे आई आणि बाळ दोघांसाठी धोकादायक ठरू शकते.


अविकसित गर्भ : हायपरथायरॉईडीझम (थायरॉईड संप्रेरक कमी उत्पादन) मुळे गर्भाची वाढ खुंटू शकते.


गर्भधारणेदरम्यान ही लक्षणे दिसल्यास काळजी घ्या



  • थायरॉईडच्या समस्येमुळे, वजन वाढणे किंवा कमी होणे सहसा होते.

  • सतत थकवा

  • हृदयाचा ठोका मध्ये असामान्यता

  • खूप थंड वाटणे

  • भरपूर घाम येणे

  • अस्वस्थता आणि चिंता

  • झोपेचा अभाव

  • त्वचा कोरडेपणा

  • केस गळण्यासारखी लक्षणे दिसतात.


हेही वाचा>>>


Women Health: महिलांनो सावध व्हा.. पोटाची चरबी ठरतेय अत्यंत धोकादायक? विविध गंभीर आजारांना आमंत्रण? सद्गुरूंनी सांगितले कारण आणि उपाय


(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )