Women Health: आजकालची बदलती जीवनशैली, कामाचा प्रचंड ताण आणि अनेक जबाबदाऱ्या एकाच वेळी पार पाडण्याच्या कसरतीत महिला त्यांच्या आरोग्याकडे हमखास दुर्लक्ष करताना दिसतात. याचा परिणाम त्यांना विविध गंभीर आजारांना सामोरे जावे लागते. महिलांच्या आरोग्याबाबत एक धक्कादायक अहवाल समोर आला आहे. तो म्हणजे  महिलांमध्ये कर्करोगाचे प्रमाण झपाट्याने वाढतंय. मात्र यात चांगली बातमी अशी आहे की, पुरुषांमध्ये कर्करोगाचे प्रमाण कमी दिसून येत आहे. कर्करोगामुळे होणाऱ्या मृत्यूंमध्येही घट झाली आहे. परंतु महिलांमध्ये कॅन्सरचे प्रमाण अधिक वेगाने वाढत आहे.


कर्करोगाचा ट्रेंड अचानक बदलू लागलाय!


अमेरिकन कॅन्सर सोसायटीच्या अभ्यासानुसार, कर्करोगाचा ट्रेंड अचानक बदलू लागला आहे. 1991-2022 या काळात कर्करोगामुळे होणाऱ्या मृत्यूंमध्ये 34 टक्क्यांनी घट झाल्याचे सर्वेक्षणातून समोर आले आहे. मात्र, तरुणी कॅन्सरसारख्या गंभीर आजाराच्या बळी ठरत आहेत. शेवटी याचं कारण काय?


महिलांमध्ये कर्करोगाचे प्रमाण वाढले..


अमेरिकन कॅन्सर सोसायटीने जारी केलेल्या अहवालानुसार पुरुषांच्या तुलनेत महिलांना कर्करोग होण्याचा धोका वाढला आहे. पुरुषांमध्ये कर्करोगाचे प्रमाण कमी झाले असले तरी महिलांमध्ये ते झपाट्याने वाढत आहेत. विशेषत: 50-64 वर्षे वयोगटातील महिलांमध्ये कर्करोगाचे प्रमाण पुरुषांपेक्षा जास्त असल्याचे आढळून आले आहे. पुरुषांशी तुलना केल्यास, 50 वर्षांखालील महिलांमध्ये कर्करोगाचे प्रमाण 82 टक्क्यांनी वाढले आहे.


कर्करोगामुळे होणारे मृत्यू कमी होतायत?


या अहवालात एक चांगली बातमीही समोर येत आहे. कर्करोगामुळे होणाऱ्या मृत्यूंमध्ये 34 टक्के घट झाली आहे. आकडेवारीनुसार, गेल्या 2 दशकांमध्ये म्हणजेच 20 वर्षांमध्ये कर्करोगामुळे 4.5 दशलक्ष म्हणजेच 45 लाख मृत्यू कमी झाले आहेत. आता प्रश्न असा आहे की हे कसे शक्य झाले? अहवालानुसार, धूम्रपान कमी करणे, चांगले उपचार आणि कॅन्सर लवकर ओळखणे यामुळे त्यावर मात करणे सोपे झाले.


महिलांमध्ये केसेस का वाढत आहेत?


महिलांमध्ये कॅन्सरचे प्रमाण अचानक का वाढत आहे याबद्दल बोललो तर? काही तज्ज्ञांच्या मते, खराब जीवनशैली आणि वातावरणातील बदलांमुळे महिलांमध्ये कर्करोगाचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. याशिवाय पुरुषांच्या तुलनेत महिलांना लठ्ठपणाचा धोका जास्त असतो, त्यामुळे कर्करोगाचे प्रमाणही वाढू लागले आहे. तरुण स्त्रियांमध्ये एंडोमेट्रियल कर्करोग दिसून आला आहे, ज्याचा थेट संबंध लठ्ठपणाशी आहे.


हेही वाचा>>>


Women Health: महिलांनो सावध व्हा.. पोटाची चरबी ठरतेय अत्यंत धोकादायक? विविध गंभीर आजारांना आमंत्रण? सद्गुरूंनी सांगितले कारण आणि उपाय


(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )