Women Health: ते म्हणतात ना... महिलांचं जीवन हे धावपळीचं असतं, घड्याळ्याच्या काट्यावर त्यांची कसरत दिसून येते. कधी कौटुंबिक जबाबदाऱ्या, कधी कामाचा ताण, कधी मुलांचे संगोपन अशा विविध गोष्टींमध्ये ती स्वत:ला गुंतवून घेते, मग पाहता पाहता वय वाढत जातं. वाढत्या वयाचा वेग थांबवणे कुणाच्याही हातात नाही. पण, निरोगी सवयींमुळे तुम्ही वृद्धत्वाची गती नक्कीच कमी करू शकता.


 


काही वेळेस 30 वर्षांनंतर महिलांमध्ये वृद्धत्वाची लक्षणे लवकर दिसू लागतात.


वाढत्या वयानुसार शरीरात आणि त्वचेत काही बदल होतात. ज्यातून प्रत्येक मानवाला जावे लागते. वृद्धत्व ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. मात्र, आपण सर्वांनी आपल्या वयापेक्षा तरुण दिसावे आणि त्यासाठी प्रयत्नही करावेत. जिथे एकीकडे काही लोक त्यांच्या वयापेक्षा लहान दिसतात. त्याच वेळी, काही लोक त्यांच्या वयाच्या आधी वृद्ध दिसू लागतात. हे आहार, जीवनशैली, तणाव, हार्मोनल असंतुलन आणि अनेक आरोग्य परिस्थितींमुळे होते. वयाच्या 30 वर्षांनंतर काही वेळा महिलांमध्ये वृद्धत्वाची लक्षणे लवकर दिसू लागतात. अशा परिस्थितीत जर तुम्हाला वृद्धत्वाचा वेग कमी करायचा असेल तर तुमच्या आहारात काही बदल करू शकता.  एका वृत्तसंस्थेने घेतलेल्या मुलाखतीनुसार, आहारतज्ज्ञ मनप्रीत याविषयी माहिती देत ​​आहेत. 



30 वर्षानंतर आहारात करा हा बदल, 


तज्ज्ञांचे म्हणणे आहे की वयाच्या 30 वर्षांनंतर आहारात व्हिटॅमिन डी समृद्ध असलेल्या गोष्टींचा समावेश करा. व्हिटॅमिन डी रोग प्रतिकारशक्ती मजबूत करते, मूड सुधारते आणि त्वचेच्या आरोग्यासाठी देखील चांगले असते.


याशिवाय ओमेगा-3 ने भरपूर आहार घेणे त्वचेसाठी आवश्यक आहे. ओमेगा -3 त्वचेचे निर्जलीकरणापासून म्हणजेच डिहायड्रेशनपासून संरक्षण करते, वृद्धत्वाची चिन्हे कमी करते आणि मुरुम कमी करते.


हे मानसिक आरोग्य आणि मासिक पाळीच्या क्रॅम्पमध्ये देखील सुधारणा करते. नट, बिया आणि निरोगी चरबी ओमेगा -3 मध्ये समृद्ध असतात.


कोलेजन समृद्ध आहार देखील त्वचेच्या आरोग्यासाठी चांगला असतो. हे त्वचेची लवचिकता राखते आणि हाडे आणि सांधे मजबूत करते.


मॅग्नेशियम कोलेजन आणि लवचिकता राखण्यास मदत करते. त्यामुळे वयाच्या 30 वर्षांनंतर तुमच्या आहारात कोलेजनयुक्त पदार्थांचाही समावेश करावा.


वयाच्या 30 नंतर फायबरचे सेवन वाढवा. फळे आणि भाज्यांमध्ये भरपूर फायबर असते. यामुळे शरीरात पोषक तत्वांचे शोषण वाढते आणि त्वचेचे आरोग्य सुधारते.


 


हेही वाचा>>>


Women Health: महिलांनो..तुमच्या 'या' सवयी आताच सोडा! ब्रेस्ट कॅन्सरचा धोका वाढतोय, डॉक्टरांनी सांगितले...


 


(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )