Women Health : असं म्हणतात ना.. देवाची लीला अगाध आहे. आजच्या काळात अनेक जोडपी संतान प्राप्तीठी हजारो प्रयत्न करताना दिसतात. दुसरीकडे, कधी कधी देव कोणावर अशा काही आशीर्वादांचा वर्षाव करतो की, आपण कल्पनाही करू शकत नाही. जोधपूरच्या उम्मेद रुग्णालयात असाच एक चमत्कार घडलाय. एका महिलेने एक नाही..दोन नाही..तर चक्क चार मुलांना महिलेने एकाच वेळी जन्म दिलाय. त्यांच्या चार मुलांमध्ये दोन मुले आणि दोन मुली आहेत. डॉक्टरांनी ते दुर्मिळ असल्याचे सांगितले आहे.


 


पहिल्या सोनोग्राफीमध्येच चार मुलांचे वास्तव समोर - डॉक्टर


यावर रुग्णालयातील डॉक्टर अफजल खान यांनी प्रतिक्रिया देत सांगितले, या गर्भवती महिलेच्या पहिल्या सोनोग्राफीमध्येच चार मुलांचे वास्तव समोर आल्याचे सांगितले. त्यामुळे संबंधित महिलेवर उपचार सुरूच होते. गर्भवती महिलेने सोमवारी सकाळी 10.55 वाजता पहिल्या मुलाला, सकाळी 10.56 वाजता दुसऱ्या मुलाला, 10.58 वाजता तिसऱ्या मुलाला आणि 10.59 वाजता चौथ्या मुलाला जन्म दिला. 


 


देवाने इच्छा पूर्ण केली असल्याची वडिलांची प्रतिक्रिया


मूळचे जैसलमेरचे रहिवासी असलेले मुलांचे वडील चंद्र सिंह यांनी पत्नीला चार मुले झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. खरे तर तो खाजगी नोकरी करतो. पण वडिलांचे मन खूप मोठे आहे. देवाने त्यांची इच्छा पूर्ण केली असल्याचे त्यांनी सांगितले. पण देवाने आपल्याला एकाच वेळी चार मुलं दिली आहेत. ते म्हणाले की हा आनंद इतका आहे की तो व्यक्त करणेही कठीण आहे. मुलांच्या आईची नुकतीच शस्त्रक्रिया झाली आहे. तिला सध्या नीट बोलता येत नाहीये. पण तिने दोन मुलगे आणि दोन मुली अशा चार मुलांना जन्म दिल्याने खूप आनंद होत असल्याचे तिने सांगितले. असे सुख भगवंत भाग्यवानांनाच देतात.


 


एकाच वेळी चार मुलांची प्रसूती होणे दुर्मिळ


उम्मेद रुग्णालयाचे अधीक्षक अफजल खान म्हणाले की, एकाच वेळी चार मुलांची प्रसूती होणे दुर्मिळ आहे. हे विशेष प्रकारचे रुग्ण आहेत. जैसलमेरहून आलेल्या एका गर्भवती महिलेवर शस्त्रक्रिया करण्यात आली आणि चार मुलांची प्रसूती झाली. सध्या आई आणि बाळ सर्व निरोगी आहेत.


 


 


(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )


हेही वाचा>>>


Women Health : सध्या उशीरा मूल होण्याचा कल वाढतोय? याचा शरीरावर काय परिणाम होतो? गर्भधारणेसाठी योग्य वय काय? डॉक्टर सांगतात...