Women Health: जसं की आपल्याला माहितीय की, एखादा आजार पूर्वी विशिष्ट वयातच होत असे. मात्र आजकालची बदलती जीवनशैली आणि बदलत्या काळानुसार लहान मुली, तरुणींमध्ये विविध गंभीर आजारांचा धोकाही वाढलाय. आजकालची परिस्थिती पाहता युरिन इन्फेक्शन हा असा एक आजार आहे, ज्याची प्रकरणे खूप वाढत आहेत. जरी हा संसर्ग सामान्यत: स्त्रियांमध्ये होत असे आणि काही प्रमाणात पुरुषांमध्ये देखील त्याचे लक्षणं दिसत होती, परंतु आता लहान वयातील मुली, तरुणींमध्येही या संसर्गाची प्रकरणे लक्षणीय प्रमाणात वाढत आहेत. याचं नेमकी कारणं आरोग्य तज्ज्ञांकडून जाणून घेऊया..


तरुणींमध्ये युरिन इन्फेक्शन का वाढत आहे?


आजकाल तरुणींमध्ये युरिन इन्फेक्शनची समस्या झपाट्याने वाढत आहे. ही एक सामान्य परंतु गंभीर आरोग्य समस्या आहे, जी संसर्गामुळे पसरते आणि त्यावर वेळीच उपचार न केल्यास इतरही अनेक समस्या उद्भवू शकतात. मात्र, तरुणींमध्ये ही समस्या का वाढतेय, डॉक्टर आकांशा श्रीवास्तव सांगतात की, आजकाल युरिन इन्फेक्शनची प्रकरणे 5 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलींमध्ये आढळतात. शाळेत जाणाऱ्या मुलींमध्ये याचे प्रमाण वाढण्यामागे अनेक कारणे असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.






'या' कारणांमुळे प्रमाण वाढतंय...


आजकाल लघवी आणि लघवीशी संबंधित आजार  खूप वाढले आहेत. हे कोणत्याही ऋतूत कोणालाही होऊ शकत असले तरी स्त्रियांना याचा धोका जास्त असतो. आजकाल तरुण मुलींमध्येही यूटीआयची प्रकरणे वाढू लागली आहेत. जाणून घ्या आरोग्य तज्ज्ञ काय म्हणतात.


पाण्याची कमतरता - शाळेत जाणाऱ्या मुली साधारणपणे शाळेत कमी पाणी पितात, त्यामुळे हा आजार वाढत आहे.


लघवी रोखून ठेवणे - शाळेत जाणाऱ्या मुलींनी लघवी धरून बसल्याची प्रकरणे डॉक्टरांनी पाहिली आहेत, ज्यामुळे लघवीचे संक्रमण होते. लघवी रोखून ठेवल्याने मूत्राशयातील बॅक्टेरिया वाढतात.


गलिच्छ शौचालये वापरणे - अनेक वेळा शाळेतील स्वच्छतागृहे स्वच्छ नसतात, त्या अस्वच्छ आसनांचा वापर करणे देखील युरिन इन्फेक्शनचे कारण असते.


काय काळजी घ्यावी...


डॉक्टर आकांशा सांगतात की, पालकांनी आपल्या मुलींना घरातच चांगल्या सवयी शिकवल्या पाहिजेत. त्यांना पाणी पिण्याचा सल्ला द्या, दररोज योग्य प्रमाणात पाणी प्या. त्यांना शौचालयाचा योग्य वापर कसा करायचा ते शिकवा. तसेच त्यांना संवेदनशील भागांच्या स्वच्छतेबाबत सांगा.


हेही वाचा>>>


Fitness: PM मोदी यांच्या फिटनेसचं 'हे' रहस्य! फार कमी लोकांना माहीत, वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी 'या' गोष्टी लक्षात ठेवा..


(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )