Women Health: दैनंदिन जीवनात आपल्याला जे गृहपयोगी वस्तू, खाद्यपदार्थांची आवश्यकता असते, ते आपण दुकानातून विकत घेतो, किंवा ऑनलाईन मागवतो. काही पदार्थ खराब होऊ नये, म्हणून पॅकबंद केलेले असतात. जे आपण फ्रीजमध्येही ठेवू शकतो, आणि गरजेनुसार त्याचा योग्य वापर करतो. पण याच्याशी संबंधित एक नवे संशोधन करण्यात आले असून त्यात पॅकबंद खाद्यपदार्थांमुळे स्तनाचा कर्करोग होण्याची शक्यता असल्याची बाब समोर आली आहे. जाणून घेऊया..


पॉलिथिनच्या पॅकेटमध्ये सुमारे 200 रसायने आढळून आली


कर्करोग हा एक जीवघेणा आजार आहे. कर्करोगाचे तसे अनेक प्रकार आहेत, त्यापैकी स्तनाचा कर्करोग हा एक गंभीर प्रकारचा कर्करोग आहे. देशात आणि जगभरात स्तनाच्या कर्करोगाचे प्रमाण वाढत आहे. कर्करोगाची अनेक कारणे असू शकतात. स्तनाच्या कर्करोगाबाबत एक संशोधन झाले, पॅकबंद खाद्यपदार्थांमध्ये स्तनाच्या कर्करोगाचे रसायन असल्याचे समोर आले आहे. तपकिरी कागद आणि पॅकेजिंगसाठी वापरल्या जाणाऱ्या पॉलिथिनच्या पॅकेटमध्ये सुमारे 200 रसायने आढळून आली असून, त्यापैकी 76 कॅन्सर निर्माण करणारी रसायने आहेत.


संशोधनातून माहिती समोर


रिसर्च फ्रंटियर्स इन टॉक्सिकॉलॉजीमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार, 200 रसायनं स्तनाच्या कर्करोगाशी निगडीत आहेत. या अभ्यासात घातक कार्सिनोजेन्स फूड कॉन्टॅक्ट मटेरियल आणि प्लास्टिक (FCM) आढळले आहेत. या अभ्यासानुसार, कागद किंवा पॉलिथिनमध्ये पॅक केलेले अन्न शरीरासाठी हानिकारक आहे आणि कर्करोगासाठी प्रभावी आहे. अन्नाच्या पाकिटांमधून रसायने बाहेर पडत आहेत, जी अन्नामध्ये मिसळत आहेत, जी अन्नाद्वारे आपल्या शरीरातही प्रवेश करत आहेत. जेव्हा गरम अन्न पॅक केले जाते, तेव्हा अशी रसायने ताबडतोब पॅकेटमधून बाहेर पडतात, जी घातक आणि कर्करोगजन्य असून पदार्थांमध्ये जातात. हे रासायनिक कण 76 प्रकारचे कॅन्सर निर्माण करणारे असून प्लास्टिकच्या पॅकेटमधून निघत आहेत, यावरून स्पष्टपणे दिसून येते की प्लास्टिकमुळे कॅन्सर होण्याची सर्वाधिक शक्यता आहे.


प्लास्टिक इतके हानिकारक का आहे?


संशोधनानुसार, हॉटेल्स किंवा रस्त्यावरच्या खाद्यपदार्थांमध्ये प्लास्टिकच्या पॅकेजिंगमध्ये खाद्यपदार्थ पॅक केले जात नाहीत, तर घरातील दैनंदिन जीवनातही प्लास्टिकचे पॅकेजिंग सर्रास होत आहे. लोक गरम अन्न प्लास्टिकमध्ये पॅक करतात आणि प्लास्टिकच्या टिफिन बॉक्समध्ये ठेवतात. असे केल्याने प्लास्टिक हळूहळू अन्नात प्रवेश करते.


FCM म्हणजे काय?


एफसीएम हे हानिकारक पदार्थ आहेत, जे अन्नामध्ये थेट किंवा इतर मार्गाने प्रवेश करतात आणि अन्न दूषित करतात. या दूषित पदार्थांमुळे कर्करोग होतो. हे हानिकारक पदार्थ कंटेनर, प्लास्टिकची भांडी, काही काचेची भांडी किंवा कागदी पॅकेजिंगच्या वस्तूंमधून अन्नामध्ये प्रवेश करतात. 


आपले अन्न सुरक्षित कसे ठेवाल?



  • बाहेरून अन्न आणल्यास ते मेटल टिफिन सारख्या डब्ब्यांमध्ये घरात ठेवा.

  • पेपर किंवा पॉलिथिन पॅकेजिंगमध्ये अन्न पॅक करणे टाळा.

  • गरम अन्न लगेच पॅक करू नका.


 


हेही वाचा>>>


Women Health: बाई...! घट्ट कपडे घातल्याने ब्रेस्ट कॅन्सर होतो? काय हा प्रकार? समज-गैरसमज जाणून घ्या...


(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )