Women Health : ते म्हणतात ना... जन्म बाईचा..खूप घाईचा..त्याचप्रमाणे वाढत्या वयानुसार महिलांच्या शारिरीक आणि मानसिक आरोग्यात अनेक बदल होत जातात. कामाचा ताण, विविध जबाबदाऱ्यांचं ओझं, मुलांचे संगोपन या गोष्टींमुळे महिला इतक्या गुंतून जातात की त्या त्यांच्या आरोग्याची काळजी घ्यायला विसरतात. पण महिलांनो.. निरोगी राहण्यासाठी शारीरिक हालचाली करणे खूप महत्वाचे आहे, पण महिला सहसा घरातील कामात इतक्या व्यस्त होतात की, त्यांना व्यायामासाठी वेळ मिळत नाही. जर तुम्ही देखील अशाच व्यस्त लोकांपैकी एक असाल तर आज आम्ही तुम्हाला अशाच काही व्यायामांबद्दल सांगत आहोत जे तुम्ही घरातील काम करतानाही सहज करू शकता. सोशल मीडियावरील व्हायरल पोस्टनुसार आरोग्य तज्ज्ञ रमिता कौर यांनी याबाबत माहिती दिली आहे.



घरगुती काम करताना हे व्यायाम नक्की करा



स्वयंपाकघरात स्वयंपाक करताना तुम्ही पोटऱ्या ताणण्याचा व्यायाम करू शकता. यासाठी टाच उचला आणि पाचही बोटांवर भार टाकून उभे राहा. 30 सेकंद या स्थितीत राहा, नंतर पुन्हा सरळ व्हा. हे किमान 5 ते 6 वेळा पुन्हा करा. यामुळे पायांचे स्नायू सक्रिय राहतात आणि दुखण्यापासून आराम मिळतो.


 


जेव्हाही पाणी प्याल, तेव्हा मालासनात बसून प्यावे. यामुळे पोटाचे स्नायू आकुंचन पावतात आणि अंतर्गत अवयवांना चालना मिळते. बद्धकोष्ठता दूर करण्यासाठी आणि पचन पुनर्संचयित करण्यासाठी हे उपयुक्त ठरू शकते.


 


कामादरम्यान कोणाशी फोनवर बोलत असाल तर वज्रासनात बसून बोला. यामुळे पचनसंस्थेला आधार मिळतो आणि भजन चांगले पचते.


 


जर तुम्ही घरात कोणत्याही गंभीर विषयावर चर्चा करत असाल तर नक्कीच हाकिनी मुद्रेत बसा. यामुळे मनाला शांती मिळते, एकाग्रता वाढते आणि संभाषणादरम्यान लक्ष केंद्रित राहते.


 


जर तुम्हाला कपाटातून काही मिळत नसेल तर या काळात 4 ते 5 वेळा स्क्वॅट्स करा. यामुळे पाठीचे स्नायू मजबूत होतात.


 


जर तुम्ही काही भाज्या कापत असाल किंवा सोलत असाल तर सुखासनाच्या आसनात बसल्याने शांती मिळते आणि पचन सुधारते.


 






 


हेही वाचा>>>


Women Safety : महिलांनो..आता आवाज उठवण्याची वेळ आलीय, हिंसाचाराबद्दल गप्प बसू नका, 'या' नंबरवर कॉल करा, काही मिनिटांत पोलिस पोहोचतील


(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )