Skin Care Tips with Apple Face Pack :हिवाळ्यामध्ये (Winter Season) त्वचेची विशेष काळजी घ्यावी लागते. कारण हिवाळ्यात त्वचा कोरडी होते. सामान्य त्वचा, कोरडी त्वचा आणि सेन्सिटिव्ह त्वचा हे त्वचेचे तीन प्रकार आहेत. थंडीमध्ये जर तुम्ही केमिकल्स असणाऱ्या प्रोडक्टचा वापर केला तर तुम्हाला रॅश येणे (Skin Rashes)आणि त्वचा कोरडी पडणे या समस्या जाणवतील. जर तुम्हाला मुलायम आणि चमकदार त्वचा हवी असेल तरी तुम्ही या अॅप्पल फेस पॅकचा (Apple Face Pack)वापर करू शकता. जाणून घेऊयात अॅप्पल फेस पॅक तयार करण्याची सोपी पद्धत-
अॅप्पल फेस पॅक तयार करण्याची सोपी पद्धत-
ड्राया स्किनसाठी वेगळ्या प्रकारे अॅप्पल फेस पॅक तयार करा. त्यासाठी सर्वप्रथम एक सफरचंद घ्या. तो सफरचंद मिक्समध्ये बारीक करून घ्या. त्यामध्ये एक चमचा ग्लिसरीन आणि एक चमचा गुलाब पाणी टाका. या सर्व गोष्टी मिक्स करून त्याचा पॅक तयार करा. हा फेस पॅक चेहऱ्याला लावा. त्यानंतर 20 मिनीटांनी चेहरा कोमट पाण्याने धुवा.
हिवाळ्यात त्वचेची घ्या अशी काळजी
रोज सकाळी उठल्यानंतर सर्वप्रथम चेहरा कोमट पाण्याने धुवा. चेहरा धुताना फेसवॉशचा वापर करा. चेहरा धुताना नेहमी कोमट पाण्याचा वापर करा. थंड पाण्याचा वापर चेहरा धुण्यासाठी केल्याने त्वचा कोरडी पडते.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
संबंधित बातम्या
Weight Loss: नाश्ता करताना 'या' चुका टाळा, अन्यथा लठ्ठपणाचे व्हाल शिकार
skin Care Tips : चेहऱ्यावरील पिम्पल्स होतील दूर; 'हे' टोनर ठरेल फायदेशीर, जाणून घ्या तयार करायची सोपी पद्धत
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha