Mental Health: आजकालची बदलती जीवनशैली, कामाचा ताण, अनेक जबाबदाऱ्यांचं ओझं यासारख्या अनेक गोष्टींमुळे पुरुषांसह महिलांनाही शारिरीक तसेच मानसिक समस्यांना सामोरे जावे लागते. आजकाल स्त्री चूल आणि मूल यात न अडकता स्वत:च्या करिअरकडे लक्ष देत आहे. मात्र ऑफिसमधील वातावरणाचा देखील त्यांना सामना करावा लागतोय. असाच एक प्रकार एका 20 वर्षांच्या तरुणीसोबत घडलाय, या तरुणीला ऑफिसमध्ये तिच्या बॉसने फटकारले. बॉसच्या टोमण्याचा त्या मुलीवर इतका परिणाम झाला की, तिला एक विचित्र मानसिक आजार जडला. नेमका काय आहे आजार? जाणून घेऊया त्या मुलीचे काय झाले आणि हा आजार किती धोकादायक आहे?


तरुणीला ना खाणे, पिणे, हालचाल किंवा बोलताही येत नव्हते. 


चीनी मीडिया आउटलेट हाँगक्सिंग न्यूजच्या वृत्तानुसार, महिलेचे नाव 'ली' असे असून ती हेनान प्रांतातील रहिवासी आहे. एके दिवशी ती अचानक बेशुद्ध पडली. याचा तपास केल्यास असे समोर आले की, एक महिन्यापूर्वी तिच्या बॉसने तिला कठोरपणे फटकारले होते, त्यानंतर ती अडचणीत आली होती. ती नीट अन्न खात नाही, पाणी पीत नाही आणि एकटी शौचालयातही जात नाही. एवढेच नाही तर ती झोपली असेल आणि तिच्या डोक्याखाली उशी काढली तर तिचे डोके हवेत ठेवत असे. असे सांगितले जात आहे की ही तरुणी एका विचित्र आजाराने त्रस्त आहे. 


बॉसने महिनाभरापूर्वी खडेबोल सुनावले होते...


चीनी मीडियाच्या माहितीनुसार, असे दिसून आले की, ली नावाच्या तरुणीच्या तिच्या टीम लीडरने एक महिन्यापूर्वी फटकारले होते, ज्यामुळे ती बऱ्याच काळापासून मानसिक तणावाखाली होती. यानंतर तिची प्रकृती बिघडली आणि नंतर कळले की, ती 'कॅटाटोनिक स्टुपर' या मानसिक आजाराची शिकार झाली होती. यानंतर तिची प्रकृती अधिकच बिघडल्याने कुटुंबीयांनी तिच्या डोक्याखालील उशी काढली तर त्याचे डोके हवेतच ठेवत असे. यासोबतच मुलीला शौचास जाण्याची आठवण करून द्यावी लागत असे. चिनी डॉक्टर जिया देहुआन यांनी सांगितले की तिला कॅटाटोनिक स्टुपर (उदासीनतेचे लक्षण) दिसत आहे. या मुलीला आजूबाजूच्या लोकांशी उघडपणे बोलण्यात अडचण येत होती, त्यामुळे तिला हा आजार झाला आहे.


कॅटाटोनिक स्टुपर म्हणजे काय?


कॅटाटोनिक स्टुपर हा एक सायकोमोटर डिसऑर्डर म्हणजेच एक मानसिक आजार आहे, ज्यामध्ये व्यक्ती हालचाल करू शकत नाही, बोलू शकत नाही किंवा कोणत्याच गोष्टीली प्रतिसाद देऊ शकत नाही. गंभीर मानसिक आजार असलेल्या 10 पैकी 1 व्यक्तीला कधीतरी कॅटाटोनिया असल्याचे मानले जाते. माहितीनुसार, गेल्या वर्षी चीनमधील शांगगुआन न्यूजनुसार, सुमारे 80 टक्के कर्मचाऱ्यांनी कामाच्या ठिकाणी अस्वस्थतेची भावना नोंदवली, तर 60 टक्के लोकांनी चिंतेची लक्षणे आणि सुमारे 40 टक्के लोकांनी नैराश्याची लक्षणं नोंदवली.


हेही वाचा>>>


Women Health: महिलांनो..भावना मनातच दाबून ठेवणं पडेल महागात! अन्यथा 'हे' 4 गंभार आजार होऊ शकतात, मन मोकळं करा


(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )