Heart Attack in Women : आजकालच्या धकाधकीच्या जीवनात हृदयविकाराचा झटका (Heart Attack) आणि उच्च रक्तदाब, डायबिटीस यांसारख्या आजाराचं प्रमाण वाढतंय. यामधलाच एक आजार म्हणजे हृदयविकाराचा झटका (Heart Attack). हार्ट अटॅक ही सामान्यतः पुरुषांसाठी मोठी समस्या असल्याचं सांगितलं जातं. स्त्रियांपेक्षा पुरुषांमध्ये हार्ट अटॅकचं प्रमाण जास्त आहे. पण, तुम्हाला माहित आहे का की फक्त पुरुषांसाठीच नाही तर महिलांसाठी देखील ही एक धोकादायक स्थिती आहे. स्त्रियांमध्ये हृदयविकाराचा झटका पुरुषांपेक्षा वेगळा असू शकतो. पण याचा अर्थ असा नाही की, स्त्रियांमध्ये हृदयविकाराच्या झटक्याचं प्रमाण कमी आहे. महिलांमध्ये छातीत दुखणे आणि अस्वस्थता यांसारखी लक्षणं हृदयविकाराच्या झटक्यादरम्यान दिसून येतात.
महिलांना छातीत दुखणे आणि छातीत घट्टपणा जाणवणे यांसारखी लक्षणं दिसतात. शरीराच्या वरच्या भागात कडकपणा जाणवतो. याशिवाय छातीत दुखत असल्यास देखील हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. काही संशोधनात असे देखील दिसून आलं आहे की, पुरुषांपेक्षा स्त्रियांना हृदयविकाराच्या झटक्यानंतर रुग्णालयात जास्त काळ राहावे लागते. इतकंच नाही तर, महिलांच्या मृत्यूची शक्यताही पुरुषांपेक्षा जास्त असते.
स्त्रियांमध्ये हृदयविकाराच्या झटक्याची 8 लक्षणे दिसतात
1. जबडा, मान, खांदा, पाठ किंवा पोटात अस्वस्थ वाटणे
2. श्वास घेण्यास अडचण येणे
3. हातांमध्ये वेदना होणे
4. मळमळ किंवा उलट्या होणे
5. घाम येणे
6. चक्कर येणे
7. थकवा
8. अपचन
सुष्मिता सेनला 'हृदयविकाराचा झटका'
अलीकडेच अभिनेत्री सुष्मिता सेनला हृदयविकाराचा झटका आल्याचा खुलासा झाला आहे. ही बातमी कळल्यानंतर अनेकांना धक्का बसला. याचं कारण म्हणजे सुष्मिता सेन फार फिटनेस फ्रीक आहे. ती आपला वर्क आऊट कधीच चुकवत नाही. अशातच इतक्या फिटनेस फ्रीक अभिनेत्रीला हृदयविकाराचा झटका कसा काय येऊ शकतो? असे प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण झाले. पण, हृदयविकाराचा झटका कोणालाही आणि कधीही येऊ शकतो. हृदयविकार जर टाळायचा असेल तर तुमच्या शरीरात बदलणाऱ्या या लक्षणांकडे वेळीच लक्ष द्या आणि डॉक्टरांकडून उपचार घेणं गरजेचं आहे. कारण एक छोटासा निष्काळजीपणाही जीवाला धोका निर्माण करु शकतो.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
महत्वाच्या बातम्या :