मुंबई : अंडे आणि मेयोनिज यांचा हेअर मास्क वापरणे खूप फायदेशीर आहे. कोरडे आणि रुक्ष झालेल्या केसांचे पोषण करण्याचा हा एक चांगला पर्याय आहे. घरच्या घरी एक उत्तम हेअर मास्क कसं तयार करायचं त्याचे फायदे काय आहेत ते पाहा.


मेयोनेझ हेअर मास्कचे फायदे :


हायड्रेशन


मेयोनेझमध्ये तेल असते जे शरीराच्या नैसर्गिक सेबमचे अनुकरण करतात. सेबम केसांच्या शाफ्टला कोट करते, ज्यामुळे केसांना ओलावा मिळून त्यांना मऊ आणि कोमल बनवण्यात मदत करतात.


कोमल आणि चमकदार केस


मेयोनिजमधील तेल केसांना मऊ बनवते. यामुळे हायड्रेशन मिळण्यासोबतच मजबूतीही वाढते. याव्यतिरिक्त, केसांना प्रोटीन मिळून कोरड्या केसांमध्ये चमकदारपणा आणण्यात मदत होते.


केसांच्या वाढीसाठी मदत करते


यामध्ये असणारे अमीनो ऍसिड असतात जे केसांच्या वाढीस मदत करतात, यामुळे केस पातळ होत असतील किंवा केस गळतीक्या समस्येसाठी या अतिशय सुरक्षित आणि चांगला पर्याय आहे.


कोंड्यापासून सुटका 


केसांमध्ये कोंड्याची समस्या असल्यास हा हेअर मास्क वापरून कोंडापासून आराम मिळतो. दोन वेळा हे मास्क वापरल्यावर कोंड्यापासून नक्की सुटका मिळेल त्यासाठी तुम्ही हा हेअर पॅक नक्की ट्राय करा.


उवांवर उपचार


हे वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झालेले नसले तरी, काही जण असा दावा करतात की, मेयोनिज हेअर मास्क उवांचे तात्पुरते औषध आहे.


मेयोनीज हेअर मास्क कसा बनवायचा?


पदार्थ :



  • 1 अंडे

  • चार चमचे मेयोनीज 

  • एक चमचा ऑलिव्ह ऑईल


पद्धत 



  • एका लहान वाटीमध्ये अंडे आणि मेयोनीज एकत्र करुन ते पूर्णपणे फेटून घ्या.

  • त्यानंतर त्यामध्ये ऑलिव्ह तेल पूर्णपणे मिसळा. तुमचा झटपट हेअर  मास्क तयार आहे.

  • तुमच्या कोरड्या केसांना हे मास्क लावा आणि केसाच्या मुळापासून टोकापर्यंत केस पूर्णपणे झाकून ठेवा. केस सुकू देऊ नका.

  • सुमारे 30 मिनिटे ते एका तास हा हेअर मास्क केसांना राहू द्या.

  • यानंतर, नेहमीप्रमाणे पाण्याने आणि शैम्पूने केस स्वच्छ धुवा.


दरम्यान, हा हेअर मास्क वापरण्यापूर्वी तुम्हाला कोणत्याही घटकांची ऍलर्जी नाही हे सुनिश्चित करण्यासाठी पॅच चाचणी करण्याचे लक्षात ठेवा.