International Womens Day 2022 : महिलांना भेटवस्तू आवडतात आणि जर ती विचारपूर्वक भेट असेल, तर त्या खरोखरच त्याचा आदर करतात. आणीबाणीच्या काळात बचत आणि गुंतवणूक करणार्या या महिलाच असतात. त्यामुळेच त्यांना कुटुंबाच्या तारणकर्त्या असं म्हटलं जातं. प्रत्येक स्त्रीला भरजरी दागिने आणि कपडेच आवडतात असं नाही. तर तुम्ही विचारपूर्वक किंवा भविष्यासाठी उपयुक्त अशी भेटवस्तू देखील त्यांना आवडते. म्हणूनच, या जागतिक महिला दिनानिमित्त (International Womens Day 2022) तुमच्या आयुष्यातील स्त्रीसाठी वेगळ्या प्रकारची भेट निवडा. यासाठी काही गिफ्ट ऑप्शन्स खास तुमच्यासाठी...
1. गिफ्ट कार्ड (Gift Cards) :
तुमच्या आयुष्यातील 'ती'ला एखादं छानसं गिफ्ट कार्ड देऊनसुद्धा तुम्ही तिला खुश करू शकता. तुमचा तिच्याप्रती असलेला आदर हा जर शब्दांत व्यक्त केला तर यापेक्षा मौल्यवान वस्तू एखाद्या स्त्री साठी कोणतीच नसू शकते.
2. क्रेडिट कार्ड ( Credit Card) :
तुम्ही तिला एक क्रेडिट कार्ड भेट देऊ शकता जे ती पूर्ण अधिकाराने आणि स्वातंत्र्याने वापरू शकते. तिला जे आवडेल ते आणि जेव्हाही तिला आवडेल तेव्हा ती खरेदी करू शकते.
3. आरोग्य विमा (Health insurance) :
स्त्रिया इतरांच्या आरोग्याची काळजी घेतात पण स्वतःच्या आरोग्याकडे मात्र दुर्लक्ष करतात. वाढत्या वयात, तुमच्या जोडीदाराचे आरोग्य धोक्यात आणणारे विविध आजार असू शकतात आणि उपचारांसाठी लाखोंचा खर्च येऊ शकतो. अशा आपत्कालीन काळात तयार होण्यासाठी, तिला आरोग्य विमा भेट देऊ शकता.
4. क्रिप्टोकरन्सी (Cryptocurrency) :
क्रिप्टोकरन्सी हा दीर्घकालीन गुंतवणुकीचा नवीन ट्रेंड आहे. काही मार्केट रिसर्च करा आणि तिला काही क्रिप्टो नाणी विकत घ्या जी भविष्यात तेजीत येण्याचा अंदाज आहे. जर ती गुंतवणूक करण्यास घाबरत असेल तर तुम्ही स्वतः करा. याचा भविष्यासाठी नक्कीच फायदा होईल.
5. सोने (Gold) :
सोने हा सर्वोत्तम गुंतवणूकीचा पर्याय मानला जातो. सोन्याची किंमत सामान्यतः वेळेनुसार वाढते. त्यामुळे काही वर्षांनी, तुम्ही आज खरेदी केलेल्या सोन्यावर तुम्हाला चांगला नफा मिळेल. तुम्ही तिच्यासाठी सोन्याची नाणी खरेदी करू शकता.
6. मुदत ठेव (Fixed Deposite) :
तुमच्या मुलीचे किंवा पत्नीचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी त्यांच्या नावावर एफडी उघडा. यातून फक्त एक निश्चित रक्कम जतन केली जाणार नाही तर तुम्हाला चांगला व्याज दर देखील मिळेल ज्यामुळे दरवर्षी रक्कम वाढेल.
7. SIP :
एक पद्धतशीर गुंतवणूक योजना (SIP) दीर्घकाळात चांगला परतावा देते असे म्हटले जाते. तुमच्या भागीदाराच्या वतीने, तुमच्या बँकेत एक SIP उघडा. याचा नक्कीच भविष्यात उपयोग होईल.
महत्वाच्या बातम्या :
- Womens Day 2022 : महिला दिन का साजरा केला जातो? यंदाची थीम काय?
- Women's Day 2022 : महिला सक्षमीकरणाचे ताजे उदाहरण म्हणजे 'अहिल्या गॅंग', जाणून घ्या त्यांच्या कार्याविषयी...
- Women's Day 2022 : जागतिक महिला दिनाचा इतिहास आणि महत्त्व जाणून घ्या...
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha