मुंबई : सुंदर दिसणं आणि तंदुरुस्त (Fit and Fine) राहणं कुणाला आवडणार नाही? यासाठी आरोग्याकडे (Health) लक्ष देणं खूप आवश्यक आहे. तरुण आणि तंदुरुस्त दिसावं अशी प्रत्येक महिलेची इच्छा असते. यासाठी पोषक आहाराची आवश्यकता असते. घरातील कामं आणि कुटुंबियांची काळजी घेणं यामध्ये महिला बहुतेक वेळा स्वत:च्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात.  महिलांमध्ये कॅल्शिअम. लोह आणि इतर पोषक तत्वांची कमतरता प्रामुख्याने दिसून येते. कारण, महिला स्वत:च्या आरोग्याकडे जास्त लक्ष देत नाहीत, पण वेळीच ही वाईट सवय सोडा आणि आरोग्याची काळजी घ्या. वाढत्या वयासोबत याचे परिणाम दिसू लागतात. त्यामुळे सकस आणि पोषक आहार घेणं फार गरजेचं आहे.


महिलांचा आहार कसा असावा?


दरवर्षी 1 सप्टेंबर ते 7 सप्टेंबर या काळात जगभरात राष्ट्रीय पोषण सप्ताह (National Nutrition Week 2023) साजरा केला जातो. नागरिकांना पोषक आहाराबाबत जागरुक करणे, हे यामागचं मूळ उद्दिष्ट आहे. राष्ट्रीय पोषण आहार सप्ताह निमित्त आज आम्ही महिलांच्या आहाराबाबत माहिती देणार आहोत. तरुण दिसण्यासाठी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी महिलांनी आहारावर विशेष लक्ष देणं गरजेचं आहे. आहारात खाली दिलेल्या पदार्थांचं सेवन करा आणि वयाच्या चाळीशीतही फिट आणि फाईन दिसा. कसं ते जाणून घ्या.


कॅल्शिअम (Calcium)


महिलांसाठी कॅल्शिअम अतिशय आवश्यक घटक आहे. वाढत्या वयात महिलांमध्ये कॅल्शिअमची कमतरता (Calcium intake for Females) ही समस्या आढळून येते. हाडांचे आरोग्य, रक्तदाब, हदयाचे आरोग्य सुरळीत चालण्यासाठी शरीरात कॅल्शिअमची आवश्यकता असते. यामुळे महिलांनी दररोज आहारात दूध, दही, पनीर, अंडी फळं हे कॅल्शिअमयुक्त पदार्थ खाणं गरजेचं आहे.


लोहाची कमतरता (Iron Deficiency)


शरीरात लोह अतिशय आवश्यक आहे. महिलांमध्ये लोहाची कमतरता (Iron Deficiency in Women) ही खूप सामान्य समस्या आहे. बहुतेक महिला याच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करतात आणि नंतर याचे गंभीर परिणाम भोगावे लागतात. महिलांच्या शरीरात लोहाचे प्रमाण कमी झाले तर, याचा परिणाम मासिक पाळीवरही होतो, त्यामुळे आहारात लोहाचा समावेश करा. यासाठी आहारात भाज्या, डाळींब आणि सुका मेवा यांच्या समावेश करा. 


व्हिटामिन-डी (Vitamin-D)


महिलांसाठी व्हिटामिन-डी (Vitamin-D for Females) हा महत्त्वाचा घटक आहे. हे व्हिटामिन आणि हार्मोन दोन्ही असून याचा परिणाम पचनसंस्था मजबूत करण्यासाठी होतो. व्हिटामिन-डीचा आहारात समावेश करण्यासाठी संत्रे, दूध यांसारख्या पदार्थ रोजच्या आहारात सामील करा.


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Health Tips : अंकुरलेले चणे खाल्ल्यानंतर 'या' पाच गोष्टी खाण्याची चूक करु नका, अन्यथा...