Diwali 2024 Fashion: साडी म्हटलं की महिलांचा जीव की प्राण.. प्रत्येक महिलेचे तिच्या साडीसोबत जिव्हाळ्याचे संबंध असतात. प्रत्येक प्रसंगी अनेक महिला साडी नेसणे पसंत करतात, आता तर देशात सणासुदीचे दिवस सुरू आहेत. सध्या दिवाळी सणाला सुरूवातही झाली आहे, अशात जर तुम्हाला प्रश्न पडला असेल, यंदा दिवाळीला असं काय परिधान करू, ज्यामुळे लूक सुंदर आणि पारंपारिक दिसेल. तर आज आम्ही तुम्हीला पैठणी साडीच्या काही सुंदर आणि आकर्षक डिझाइन्स सांगणार आहोत. जे नेसल्यानंतर तुमचं रुप अगदी खुलून दिसेल, आणि सर्वांच्या नजरा तुमच्यावरच खिळतील..


दिवाळीत रॉयल आणि स्टायलिश लूक हवाय?


महिला वर्गाला सर्वांनाच साडी नेसायला आवडते. यंदाच्या दिवाळीत जर तुम्हाला रॉयल आणि स्टायलिश लूकची साडी नेसायची असेल, तर तुम्ही महाराष्ट्रातील खास आकर्षण असलेली पैठणी साडी नेसू शकता. ही साडी सिल्क फॅब्रिकने बनलेली असते आणि त्यावर रेशमी धाग्याने काम केले जाते. पाहुयात पैठणी साडीच्या सुंदर डिझाईन्स, ज्या तुम्ही यावर्षी दिवाळी पूजेदरम्यान नेसू शकता. तसेच, आम्ही तुम्हाला या साड्या स्टायलिश बनवण्याच्या सोप्या टिप्स सांगणार आहोत-


पेस्टल कलरची पैठणी साडी


जर तुम्हाला स्टायलिश आणि मिनिमल लुकचे कपडे नेसायला आवडत असतील तर या प्रकारची स्टायलिश साडी तुमच्या लूकमध्ये आणखी चारचांद लावू शकते. यामध्ये तुम्हाला साडीच्या पदरावर बनवलेल्या वेलीच्या डिझाइन्स पाहायला मिळतील. पाने आणि फांद्या असलेल्या या सुंदर साडीसोबत तुम्ही हलक्या शेडचा सोनेरी ब्लाउज घालू शकता.




फ्लोरल डिझाईन पैठणी साडी


जर तुम्हाला फॅन्सी तसेच सोबर दिसणारे कपडे घालायला आवडत असतील तर तुम्हाला डिझाईनसाठी फ्लोरल पॅटर्नपेक्षा चांगला पर्याय मिळू शकत नाही. अशा सुंदर साडीने तुम्ही तुमच्या कानात सोन्याचे झुमके स्टाईल करू शकता. अशा स्टायलिश दिसणाऱ्या साडीसोबत तुम्ही व्ही-नेक किंवा बॅकलेस ब्लाउज घालू शकता. यामध्ये तुम्हाला लाइट शेड्समध्ये अनेक कलर कॉम्बिनेशन्स पाहायला मिळतील.




फूल वर्क पैठणी साडी


जर तुम्हाला फॅन्सी लूक म्हणजेच भारी लूकची साडी घालायची असेल, तर तुम्ही अशा रिच डिझाईनची साडी घालू शकता. हा प्रकार अतिशय स्टायलिश आणि रॉयल दिसेल. बहु-रंगीत या साडीसोबत तुम्ही तुमच्या केसांमध्ये लाल रंगाची फुले घालू शकता. अशा स्टायलिश साडीसोबत स्लीव्हलेस ब्लाउज उत्तम लुक देण्याचे काम करेल.




हेही वाचा>>>


Diwali 2024 Fashion: दिवाळीत गरोदर महिलांचीही नटण्याची खास तयारी! 'या' अभिनेत्रींकडून घ्या टिप्स, दिसाल परफेक्ट


(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )