Winter Travel: गोवा (Goa) म्हटलं की.. डोळ्यासमोर येतात सुंदर अथांग समुद्रकिनारे...चर्च... नारळाची, आंब्याची, सुपारीची झाडं.. आणि स्थानिक रहिवाश्यांच्या तोंडी गोड गोवन किंवा मालवणी भाषा.. तसं पाहायला गेलं तर आपल्या मित्रमंडळीसोबत अनेकदा गोव्याला जायचा प्लॅन होतो खरा.. पण तो पूर्ण करणंही तितकंच महत्त्वाचं आहे.  जेव्हा जेव्हा मित्र किंवा कुटुंबासोबत फिरण्याचे नाव येते तेव्हा बहुतेक लोक हिल्स स्टेशन किंवा गोव्याला जाण्याचा बेत करतात. पण जर तुम्ही गोव्याला जात असाल, तर इथल्या प्रसिद्ध ठिकाणांसोबत इथे काही सुंदर आणि मनमोहक ठिकाणंही लपली आहेत. जे फार लोकांना माहित नसावी. तिथेही तुम्ही आवर्जून भेट देण्याचा प्लॅन केला पाहिजे. 



निसर्गाने वेढलेल्या गोव्यात अनेक छुपे हिल स्टेशन


जर तुम्ही गोव्याला भेट देण्याचा प्लॅन केला असेल. जसे की पालोलेम बीच, बागा बीच, दूधसागर धबधबा, अगुआडा किल्ला, अंजुना बीच, पणजी आणि चोराव बेट अशी ठिकाणं तुम्हाला माहित असतीलच. पण याशिवाय जर तुम्हाला फिरायचे असेल तर तुम्ही गोव्याच्या आसपासच्या ठिकाणी जाऊ शकता. सुंदर निसर्गाने वेढलेल्या गोव्यात अनेक हिल स्टेशन आहेत. जिथे तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत किंवा कुटुंबातील सदस्यांसोबत गर्दीपासून दूर शांत ठिकाणी फिरायला जाऊ शकता. येथील हिरवळ, मोठमोठे पर्वत, नद्या, धबधबे यांचे सुंदर दृश्य पाहून तुमचे मन प्रसन्न होईल. गोव्याजवळच्या हिल स्टेशन्सबद्दल जाणून घेऊया.


 


चोरला घाट


तुम्ही गोव्यातील चोरला घाटाला भेट देण्यासाठी जाऊ शकता, ते एखाद्या हिल स्टेशनपेक्षा कमी नाही. विशेषतः जर तुम्हाला निसर्गात काही वेळ घालवायला आवडत असेल तर तुम्ही इथे येऊ शकता. येथे तुम्हाला हिरवळ, धबधबे आणि पर्वतांमध्ये मनःशांती मिळेल. चोर्ला घाट हा गोवा, महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सीमेवर आहे. येथे तुम्हाला गिर्यारोहण आणि ट्रेकिंगची संधी मिळू शकते. या ट्रेक दरम्यान, तुम्हाला धबधबा, लसनी टेंब शिखर आणि चोरला घाट व्ह्यू पॉइंट सारख्या सुंदर ठिकाणांना भेट देण्याची संधी मिळेल. मात्र येथे जाण्यापूर्वी हवामानाची योग्य माहिती घेणे महत्त्वाचे आहे.


 


दांडेली


दांडेली हे एक सुंदर शहर आहे जे गोव्यापासून सुमारे 102 किमी अंतरावर आहे. येथे पोहचण्यासाठी 3 तास लागू शकतात. हे समुद्रसपाटीपासून अंदाजे 1551 फूट उंचीवर वसलेले आहे. सफारी टूर, बोटिंग आणि ट्रेकिंग यांसारखे अनेक उपक्रम करण्याची संधी येथे मिळते. येथे चांदेवाडी वॉटर रॅपिड्स, कावळा लेणी, सिंथेरी रॉक्स, उलवी लेणी, गणेशगुडी धरण, सायक्स पॉइंट, मौलांगी नदी, क्रोकोडाइल पार्क, सातखंडा धबधबा, दिग्गी, बॅक वॉटर, सातोडी धबधबा, मगोद फॉल्स, जैन कल्लू गुड्डा, शर्ली फॉल्स, पानसोली इ. कॅम्प, टायगर रिझर्व जंगल सफारी आणि दूधसागर धबधबा सारखी ठिकाणे शोधता येतात.



आंबोली


आंबोली हे गोव्याजवळील एक आकर्षक हिल स्टेशन आहे. गोव्याहून आंबोलीला जाण्यासाठी 3 ते 4 तास लागू शकतात. आपण येथे अनेक ठिकाणे एक्सप्लोर करू शकता. आंबोली धबधबा: घनदाट जंगलाने वेढलेला हा धबधबा सुमारे 300 फूट उंचीवरून पडतो. तुम्ही शिरगावकर पॉइंट, कोलशेत पॉइंट आणि नांगरतास फॉल्स सारख्या ठिकाणांना भेट देऊ शकता.


 


हेही वाचा>>>


Winter Travel: हिवाळा सुरू होण्यापूर्वी ट्रीपला जायचंय? 'या' ठिकाणाचं सौंदर्य पाहून प्रेमात पडाल, Pre-Winter Vacation साठी परफेक्ट!


 


(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )