Winter Tips : हिवाळ्यात (Winter) थंडीपासून बचाव करण्यासाठी उबदार कपडे घातले जातात. काही लोक आपल्या खोल्यांमध्ये हिटर वापरतात. दिवसाच्या तुलनेत रात्रीचे तापमान कमी असल्याने थंडी वाढते. काही लोक थंडीपासून बचाव करण्यासाठी रात्री मोजे घालून झोपतात. पण, आरोग्य तज्ञ याला दुजोरा देत नाहीत. रात्री मोजे घालून झोपल्याने आरोग्याला अनेक नुकसान होऊ शकतात.


रात्री मोजे घालून झोपल्याने शरीरातील रक्ताभिसरणावर परिणाम होतो. तुम्हालाही हे जाणून आश्चर्य वाटेल, पण जेव्हा आपल्या शरीरातील रक्ताभिसरणात समस्या निर्माण होते. तेव्हा त्यामुळे अस्वस्थता आणि श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. रात्री मोजे घालून झोपण्याचे नेमके कोणते तोटे असू शकतात या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात. 


जास्त गरम होण्याची समस्या


झोपताना मोजे घातल्यामुळे पायातून हवा जाऊ शकत नाही. त्यामुळे अतिउष्णतेची समस्या उद्भवू शकते. शरीराचे तापमान अचानक वाढू शकते, त्यामुळे अस्वस्थ वाटू शकते.


त्वचेची ऍलर्जी


हिवाळ्यात, लोक सहसा मोजे घालून झोपतात. काही लोक त्याच सॉक्समध्ये झोपतात. अशा वेळी सॉक्समध्ये अडकलेल्या धूळ आणि बॅक्टेरियामुळे तुम्हाला स्किन अॅलर्जी होण्याचा धोका असतो.


हृदयाच्या आरोग्यावर विपरित परिणाम


जर तुम्ही रात्री मोजे घालून झोपलात तर तुमच्या हृदयाच्या आरोग्यावर विपरित परिणाम होऊ शकतो. काही वेळा घट्ट मोजे घातल्याने पायांच्या नसांवर दबाव येतो. यामुळे हृदयाला रक्त पंप करण्यासाठी अधिक मेहनत घ्यावी लागते, ज्यामुळे श्वास घेण्यास त्रास होतो.


'या' गोष्टी लक्षात ठेवा


खरं तर रात्री मोजे घालून झोपू नये. पण तरीही तुम्ही मोजे घालून झोपत असाल तर काही गोष्टी लक्षात ठेवा.



  • रात्री सैल मोजे घालून झोपा.

  • नेहमी स्वच्छ आणि धुतलेले मोजे घालून झोपा.

  • मोजे घालण्यापूर्वी पायांना मसाज करा, यामुळे तुमचे पाय उबदार राहतील.

  • नायलॉनचे मोजे तुम्हाला सूट होत नसतील तर सुती मोजे घाला.

  • घट्ट मोजे घालून मुलांना झोपवू नका.


जर तुम्ही रात्री झोपताना पायात किंवा हातात मोजे घालून झोपत असाल तर हे तोटे लक्षा घेणं गरजेचं आहे. 


महत्त्वाच्या बातम्या :


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. 


Health Tips : 'हायपरथर्मिया' म्हणजे काय? शरीरातील उष्णता मर्यादेपलीकडे वाढण्याचं कारण नेमकं काय? वाचा लक्षणं आणि उपाय