Winter Tips : हिवाळा (Winter Season) ऋतू सुरु झाला आहे. हिवाळ्यात वातावरण थंड असल्यामुळे आळस (Laziness) येणं स्वाभाविक आहे. या ऋतूची सुरुवात होताच आपल्या शरीरातील चैतन्य कुठेतरी नाहीसे होते. हिवाळ्यात तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी आळशीपणाचा सामना करणे फार कठीण आहे. त्यामुळे आपली उत्पादकताही कमी होते. पण थंडीमुळे होणारा आळस कमी होऊ शकतो. हा आळस कसा दूर कराल याच संदर्भात सविस्तर माहिती जाणून घ्या.

  


शारीरिक हालचाल करा


शारीरिक हालचाल न केल्याने, तुमच्या शरीराचे स्नायू ताठ होतात आणि रक्ताभिसरण देखील मंदावते. या कारणामुळे तुमचे शरीर दुखू शकते आणि तुमचा मूडही बिघडू शकतो. यासाठी रोज काही वेळ व्यायाम करा.


अन्नाचं सेवन मर्यादित करा 


आपण अनेकदा हिवाळ्यात जास्त अन्न खातो. त्यामुळे आपल्याला झोप येते. त्यामुळे अति खाणे टाळावे. आळसाचे कारण असण्याबरोबरच मधुमेह, फॅटी लिव्हर, हृदयविकार इत्यादी अनेक आजार देखील होऊ शकतात. हिवाळ्यात जास्त भूक लागणं स्वाभाविक आहे.  पण, त्यावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा. आरोग्यदायी पदार्थांचं सेवन करा.


योग्य डाएट फॉलो करा 


तुमच्या अन्नाचा तुमच्या मूडवर परिणाम होतो. अनेकदा हिवाळ्यात आपण जास्त फॅटी फूड खातो. यामुळे शरीरात अन्न पचायला जास्त वेळ लागतो आणि आळस येतो. तुमच्या आहारात प्रथिने, फायबर, जीवनसत्त्वे, खनिजे आणि कर्बोदके संतुलित प्रमाणात घ्या. यामुळे तुमचे आरोग्य सुधारेल आणि तुम्हाला ऊर्जाही मिळेल.


झोपेची आणि उठण्याची वेळ ठरवा


थंडीपासून संरक्षण करण्यासाठी आपण बेडवर बराच वेळ पडून राहतो. त्यामुळे तुमच्या झोपेचे चक्र बिघडू शकते. ही सवय बदलण्यासाठी तुमच्या झोपेची वेळ ठरवा. उशिरा झोपल्यानेही दिवसभर आळस होतो.


व्हिटॅमिन डीची कमतरता टाळा


हिवाळ्यात टॅनिंग टाळण्यासाठी, आपण सूर्यप्रकाशात जाणं टाळतो. पण, सूर्यप्रकाश हा व्हिटॅमिन डीचा सर्वोत्तम स्त्रोत आहे. व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे आपल्याला आळस येतो. तसेच, जास्त झोप लागते. त्यामुळे रोज काही वेळ सूर्यप्रकाश घ्या. यामुळे तुमचे शरीर उबदार राहते आणि तुम्हाला व्हिटॅमिन डी देखील मिळेल. 


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.


महत्त्वाच्या बातम्या :


Health Tips : सकाळी उठल्याबरोबर तुम्हाला चिंताग्रस्त, थकल्यासारखे वाटत असेल तर याकडे दुर्लक्ष करू नका; हे एक गंभीर आजाराचं लक्षण असू शकतं