Skin Care Tips for Winter : हिवाळ्यामध्ये (Winter Season) त्वचेची विशेष काळजी घ्यावी लागते. कारण हिवाळ्यात त्वचा कोरडी होते. सामान्य त्वचा, कोरडी त्वचा आणि सेन्सिटिव्ह त्वचा हे त्वचेचे तीन प्रकार आहेत. थंडीमध्ये जर तुम्ही केमिकल्स असणाऱ्या प्रोडक्टचा वापर केला तर तुम्हाला रॅश येणे (Skin Rashes) आणि त्वचा कोरडी पडणे या समस्या जाणवतील. जर तुम्हाला मुलायमव त्वचा हवी असेल तर तुम्ही हे घरगुती स्क्रब वापरू शकता.
साखरेचा स्क्रब
साखरेचा स्क्रब तयार करण्यासाठी एका वाटीमध्ये एक चमचा साखर घ्या आणि त्यामध्ये थोडे ऑलिव्ह ऑइल टाका. हा स्क्रब हळूवारपणे चेहऱ्याला लावा. त्यानंतर कोमट पाण्याने चेहरा धुवा. या स्क्रबमुळे तुमच्या चेहऱ्यावरील डेड स्किन निघून जाते आणि त्वचा मुलायम होते.
ओटमिल स्क्रब
ओटमिल स्क्रब तयार करण्यासाठी एका वाटीमध्ये दोन चमचे ओटमिल घ्या. त्यामध्ये पाणी घाला आणि हे ओटमिल पाण्यात दहा मिनीटे भिजवा. त्यानंतर भिजवलेल्या ओटमिलची मिक्सरमध्ये बारीक करून त्याची पेस्ट तयार करा. हा स्क्रब आठवड्यातून दोन वेळा चेहऱ्याला लावा.
कॉफी फेस स्क्रब
कॉफी स्क्रबमुळे चेहऱ्यावरील डेड सेल्स निघून जातात. हा स्क्रब तयार करण्यासाठी एका वाटीमध्ये कॉफी आणि ऑलिव्ह ऑइल मिक्स करून घ्या. हे मिश्रण चेहऱ्यावर लावा. 10 मिनीटे चेहऱ्याचा मसाज करा. त्यानंतर चेहरा कोमट पाण्याने धुवा.
हिवाळ्यात थंड हवामानामुळे त्वचा स्वतःच कोरडी होऊ लागते. त्यामुळे जास्त वेळ अंघोळ केली तर त्वचेचे तेल निघून जाते. अशा स्थितीत हिवाळ्यात अंघोळीची वेळ कमी ठेवावी. जेणेकरुन जास्त वेळ पाण्यात राहू नये.
टिप: वरील माहितीची पुष्टी एबीपी माझा करत नाही. कोणतेही उपचार, डाएट आणि औषधे हे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घ्यावेत.
इतर बातम्या :
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha