Winter Health Tips : बदलत्या हवामानाचा आपल्या आरोग्यावरच नाही तर त्वचेवरही परिणाम होतो. हिवाळ्यात कोरडेपणाची समस्या खूप वाढते. त्याचा प्रभाव ओठ, हात, पाय तसेच गालावर दिसून येतो. त्यामुळे हिवाळ्यात त्वचेची थोडी जास्त काळजी घ्यावी लागते. तसेच, थंडीत दिसणारी आणखी एक समस्या म्हणजे गाल लाल होणे. हिवाळ्यात गाल लाल का होतात? ही कोणत्या प्रकारची त्वचेची समस्या आहे आणि ती कशी बरी होऊ शकते? या संदर्भात अधिक माहिती जाणून घ्या.
थंडीत गाल लाल का होतात?
हिवाळ्यात रक्ताभिसरण थोडे मंद होते. अशा वेळी त्वचेच्या आत असलेल्या रक्तवाहिन्या रक्तपुरवठ्यासाठी रुंद होतात. जेणेकरून चेहऱ्यावर आवश्यक प्रमाणात रक्तप्रवाह होऊ शकेल. जेव्हा खूप थंडी असते तेव्हा आपले शरीर त्वचेला उबदार करण्याचा प्रयत्न करते. यामुळे रक्ताभिसरणही वाढते आणि त्यामुळे गाल लाल होतात. याशिवाय थंड हवा, मॉइश्चरायझेशन आणि पोषणाचा अभाव यामुळेही त्वचा लाल होऊ लागते.
त्वचा लाल होण्यापासून रोखण्याचे उपाय
1. शरीर हायड्रेटेड ठेवा
थंडीच्या दिवसांत उन्हाळ्याच्या तुलनेत पाणी पिण्याचे प्रमाण थोडे कमी होते, त्यामुळे त्वचा हायड्रेटेड राहत नाही आणि हायड्रेशनच्या कमतरतेमुळे त्वचा कोरडी होऊ लागते. यासाठी पुरेसे पाणी प्यावे.
2. कोलेजनयुक्त प्रोडक्ट निवडा
वयानुसार कोलेजन कमी होऊ लागते. कोलेजन त्वचेसाठी ब्लॉक म्हणून काम करते. त्यामुळे त्वचेची लवचिकता टिकून राहते. याशिवाय कोरडेपणाही जातो. जर हिवाळ्यात तुमची त्वचा किंवा गाल लाल झाले आणि नंतर क्रॅक होऊ लागले, तर तुम्ही तुमच्या स्किनकेअर रुटीनमध्ये कोलेजन सप्लिमेंट्स किंवा कोलेजनयुक्त पदार्थांचा समावेश करावा.
3. हायड्रेटिंग सीरम वापरा
Hyaluronic ऍसिडयुक्त सीरम देखील तुम्ही वापरू शकता. लालसरपणा आणि कोरड्या त्वचेसाठी हायड्रेटिंग सीरम हा एक चांगला पर्याय आहे. पण, सीरम वापरण्यापूर्वी तुमच्या त्वचेचा प्रकार जाणून घेणे महत्त्वाचे आहे.
4. हायड्रेटिंग मास्क वापरा
हायड्रेटिंग मास्क देखील या समस्येपासून सुटका करण्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकतात. तुमची त्वचा आतून हायड्रेट ठेवण्यासाठी भरपूर पाणी प्या आणि बाहेरून हायड्रेट ठेवण्यासाठी हायड्रेटिंग मास्क वापरा. आठवड्यातून एकदा तरी त्याचा वापर करा. तुम्हाला काही दिवसांतच फरक जाणवेल.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
महत्त्वाच्या बातम्या :