Winter Health Tips : हिवाळ्याच्या दिवसात सर्वात कठीण काम म्हणजे एकतर उठणे आणि जिममध्ये जाऊन व्यायाम करणे. अनेकदा थंडीच्या दिवसात प्रत्येकाला घरी राहावंसं वाटतं. सकाळ असो वा संध्याकाळ प्रत्येकाला जिममध्ये जाण्याचा आळस येऊ लागतो. अशा परिस्थितीत जिममध्ये न गेल्याने आपण आपल्याच शरीराचे नुकसान करून घेत आहोत.  जर तुम्ही रोज व्यायाम केला नाही तर तुम्हाला लठ्ठपणाच्या समस्या जाणवू लागतील. याशिवाय अनेक आजार उद्भवू शकतात. यासाठी आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की तुम्ही घरात राहून कसा तुमचा फिटनेस मेंटेन करू शकता. यासाठी तुम्हाला घरीच काही नियम बनवावे लागतील. चला तर मग जाणून घेऊया घरी राहून तुम्ही कसे तंदुरुस्त दिसू शकता. 


घरच्या घरी या अॅक्टिव्हिटींद्वारे तुम्ही चांगली फिगर बनवू शकता


तुमचा फिटनेस मेंटेन ठेवण्यासाठी तुम्ही सायकलिंग करू शकता. जर तुम्हाला जिममध्ये जाऊन व्यायाम करायला कंटाळा येत असेल तर सायकलिंग हा तुमच्यासाठी चांगला पर्याय आहे. सकाळी काही सामान घेण्यासाठी घराबाहेर पडलात तर सायकलचा वापर करावा. सायकलिंगच्या मदतीने आपल्या शरीरात ऊर्जा तर येतेच पण तंदुरुस्त राहण्यासही खूप मदत होते. जर तुम्ही दिवसातून दोनदा सायकलिंग करत असाल तर ते तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. याशिवाय तुम्ही घरच्या घरी स्ट्रेचिंग किंवा व्यायाम करू शकता. घरच्या घरी सहज व्यायाम केल्याने तुमचे शरीर सक्रिय राहते तसेच रक्ताभिसरणही चांगले होते. 


'या' प्रकारची सवय तुम्हाला फिट ठेवेल


घरात राहूनही तुम्ही स्वतःला फिट ठेवू शकता. तुम्हाला फक्त कोणत्याही कामात व्यस्त राहावं लागेल. जसं की घर स्वतः स्वच्छ करणे. अशा प्रकारे तुम्हाला दिवसभर सक्रिय वाटेल. जर तुम्हाला घरात पाळीव प्राणी पाळण्याची आवड असेल तर त्यांना बाहेर फिरायला घेऊन जा जेणेकरुन तुम्हालाही काही वेळ मोकळ्या हवेत फिरता येईल. चालण्याने शरीर निरोगी राहते. तसेच, हिवाळ्यात जास्त पाणी पिण्याचा प्रयत्न करा. शरीरात पाण्याच्या कमतरतेमुळे शरीरात निर्जलीकरण होऊ शकते आणि तुम्ही आजारी पडू शकता. दिवसभर स्वत:ला व्यस्त ठेवा, शरीर जेवढे चालत राहते, तेवढेच तुम्ही तंदुरुस्त राहता.


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.


महत्त्वाच्या बातम्या :


Health Tips : गुलाबी थंडीत 'या' चहाने तुमच्या दिवसाची सुरुवात करा; प्रतिकारशक्ती वाढविण्याबरोबरच व्हायरलपासूनही संरक्षण मिळेल