Taarak Mehta : स्तंभलेखक, लेखक, नाटककार, पटकथालेखक तारक मेहता (Taarak Mehta) यांची आज जयंती आहे. त्यांचे 'दुनिया ने उंधा चष्मा' हे गुजराती भाषेतील सदर वाचकांच्या पसंतीस उतरले. पुढे या सदराचे पुस्तक आणि नंतर 'तारक मेहता का उल्टा चष्मा' (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) या लोकप्रिय हिंदी मालिकेत रुपांतर झाले. 


'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेमुळे तारक मेहता घराघरांत पोहोचले. त्यांना 2015 साली 'पद्मश्री' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्यांच्या लिखाणात विविधतेतील एकता होती. ते गुजराती नाट्य चळवळीसोबत जोडले गेले. प्रेमाने त्यांना 'तारकभाई' (Taarak Bhai) म्हटले जायचे.


तारक मेहता यांचा जन्म 26 डिसेंबर 1929 रोजी अहमदाबादमध्ये झाला. अहमदाबादमध्ये दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी मुंबई गाठली. मुंबईतील खालसा महाविद्यालयातून त्यांनी गुजराती विषयात बी.ए केलं. त्यानंतर 1958 साली भवन्स महाविद्यालयातून एम.ए पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. 


तारक मेहता यांचे लोकप्रिय साहित्य (Popular literature of Tarak Mehta) : 


तारक मेहता एक उत्कृष्ट साहित्यिक होते. त्यांच्या लोकप्रिय साहित्यात 'दुनियाने उंधा चष्मा' (1965) (Duniya Ne Undha Chasma), 'तारक मेहताना आठ एकांकियो' (1978), 'तारक मेहताना उंधा चष्मा' (1981) (Tarak Mehtana Undha Chashma), 'तारक मेहतानो टपुडो' (1982) (Tarak Mehta No Tapudo), 'तारक मेहतानी टोकळी परदेसना प्रवासे' (1985) यांचा समावेश करता येईल. 


शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी लोकांना हसवणारे तारक मेहता


शेवटच्या श्वासापर्यंत तारक मेहता यांनी लोकांना हसवलं आहे. त्यांनी लेखनीची साथ कधीच सोडली नाही. 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेतील तारक मेहता यांनी जिवंत केलेली अनेक पात्र आजही रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत. त्यांचे 'वन लाइनर'देखील चाहत्यांना खळखळून हसवायचे. 


तारक मेहता यांनी वेगवेगळ्या भाषांतील विनोदी लेखन गुजरातीत आणले आहे. गुजराती नाट्य चळवळीतील त्यांचे योगदान मोलाचे आहे. 1971 पासून 'चित्रलेखा' या मासिकासाठी त्यांनी लेखन सुरू केलं. मालिका लिखानासोबतच त्यांनी 80 पुस्तके लिहिली आहेत. 1960 ते 1986 पर्यंत ते केंद्रीय सुचना आणि प्रसारण मंत्रालयाच्या फिल्म डिव्हिजनमध्ये अधिकारी म्हणून काम करत होते. 


तारक मेहता यांनी गुजराती रंगभूमीदेखील गाजवली आहे. विनोदी लेखन शैलीच्या मदतीने त्यांनी अनेकांची मने जिंकली आहेत. 'नवूं आकाश नवी धरती' आणि 'कोथळामांथी खिलाडी' ही त्यांची गुजराती भाषेतील पुस्तके चांगलीच गाजली आहेत. 'तारक मेहता का उल्टा चष्मा' ही मालिका यशस्वी होण्यात तारक मेहता यांच्या लेखणीचा मोठा हात आहे. 


संबंधित बातम्या


TMKOC : ‘तारक मेहता..’च्या ‘गोकुळधाम सोसायटी’बद्दलच्या या’ खास गोष्टी माहितीयेत का?