Health Tips : कधीकधी आपण अगदी सहज बोलून जातो की "माझं मन अस्वस्थ झालं आहे". अनेकदा आपल्या आजूबाजूला देखील असे बोलणारे लोक आपण पाहिले असतील. पण, ही सामान्य बाब नाहीये. यामधून कळत नकळतपणे आपण आपल्या आरोग्याविषयी बोलत असतो. कोरोनानंतर मानसिक आरोग्याबाबतचे गांभीर्य खूप वाढले आहे. पण तरीही लोकांमध्ये या गोष्टींबाबत जागरूकता फारच कमी आहे. अशा परिस्थितीत तुमचे मन निरोगी ठेवण्यासाठी आणि आजारांपासून दूर राहण्याचे उपाय आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
मानसिक आरोग्य म्हणजे काय?
मानसिक आरोग्यामध्ये तुमच्या भावनिक, मानसिक आणि सामाजिक कल्याणचा समावेश आहे. आपण कसे विचार करतो, अनुभवतो आणि कसे वागतो यावर त्याचा परिणाम होतो. या व्यतिरिक्त, आपण तणाव कसा हाताळतो, इतरांच्या समस्यांशी संबंधित कसे जुळवून घेतो यासाठी देखील मदत करते. बालपण आणि किशोरावस्थेपासून ते वृद्धत्वापर्यंत आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर मानसिक आरोग्य महत्त्वाचे आहे.
मानसिक आरोग्य महत्वाचं का आहे?
आजकाल अनेकांना वाटतं की जिममध्ये जाऊन बॉडी बनवली तर ते फिट असतील, पण तसं नाही. शारीरिक फिटनेसपेक्षा मानसिक आरोग्यही महत्त्वाचं आहे. लोक याविषयी उघडपणे बोलण्यासही टाळाटाळ करतात. अनेकांना याबद्दल बोलायला लाज वाटते. जर कोणाला मानसिक आरोग्याची समस्या असेल तर त्यांनी ती लपवून न ठेवता त्याबद्दल व्यक्त होणं गरजेचं आहे.
मानसिक आरोग्य का बिघडते?
मानसिक आरोग्य बिघडण्यामागे अनेक कारणे असू शकतात, जसे की...
1. बाल शोषण, लैंगिक अत्याचार, हिंसाचार इ.
2. कर्करोग किंवा मधुमेहासारखे दिर्घकालीन आजार
3. मेंदूतील जैविक घटक किंवा रासायनिक असंतुलन
4. अल्कोहोल किंवा ड्रग्सचे अतिसेवन
5. एकाकीपणाची भावना
जर तुम्ही मानसिक आरोग्याशी लढत असाल तर तुम्ही या आजारांना बळी पडू शकता.
1. चिंता सतावणे
2. फोबिया
3. नैराश्याची भावना
4. व्यक्तिमत्व विकार
5. मूड डिसऑर्डर
6. ऑटिझम
7. स्मृतिभ्रंश
यासाठीच तुम्हाला सुद्धा यापैकी कोणती लक्षणं जाणवत असतील तर वेळीच डॉक्टरांशी संपर्क साधा. तसेच, आताच्या काळात अनेकजण मानसिक आरोग्याबाबत सतर्क झाले आहेत. मात्र, समाजाच्या काही भागांत अजूनही याबाबत जागरूकता निर्माण करणं गरजेचं आहे.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
महत्त्वाच्या बातम्या :