Friendship day 2023 : मैत्री एक असं नातं आहे, ज्याला एखादी व्यक्ती स्वतःच्या इच्छेनुसार निवडतो. बालपणात नकळत बरीच लोकं मित्र बनून जातात. ज्यामध्ये काही मित्र असेही असतात जे शाळेपासून ते कॉलेजपर्यंत साथ देतात तर काही चांगल्या आणि वाईट काळात देखील आपली मैत्री निभावतात. मात्र असे मित्र फारच कमी असतात जे आयुष्यभर आपली मैत्री जपतात आणि तो मित्र किंवा मैत्रिण आपल्या जीवनातील एक असा हक्काचा व्यक्ती असतो, ज्याच्याशी काही रक्ताचे नाते नसले तरी देखील रक्ताच्या नात्यापेक्षा अधिक घट्ट नाते जोडले गेलेले असते. आपल्या सुख, दु:खात आपण त्यांना सामील करून घेत असतो. मैत्रीमध्ये आपल्याला आपल्या आयुष्यातील सर्वात सुंदर क्षण जगायला मिळतात. मैत्री आपल्याला जगायला शिकवते. मैत्रीमुळे आपली स्वत:शीच एक वेगळी ओळख निर्माण होते. ऑगस्ट महिन्यातील पहिल्या रविवारी जगभरात फ्रेंडशीप डे साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्याची सुरुवात कधी झाली ? यामागे काय इतिहास आहे... पाहूयात..


'फ्रेन्डशीप डे' चा इतिहास


आंतरराष्ट्रीय स्तरावर फ्रेंडशिप डे ची सुरुवात ही 1958 साली झाली असं सांगण्यात येतंय. जॉय हॉल या नावाच्या व्यक्तीचा हॉलमार्क कार्ड्स चा व्यवसाय होता. लोकांनी फ्रेंडशिप डे साजरा करुन आपल्या मैत्रीच्या नात्याला अधिक घट्ट करावं अशी त्याची इच्छा होती. त्यातूनच त्याने फ्रेंडशिप डे साजरा करायला सुरवात केली. 


मैत्री म्हणजे प्रेम, आपुलकी, आनंद, समाधान आणि बरंच काही. मैत्री हे रक्ताच्या नात्याहूनही अधिक घट्ट असते. मैत्रीचे नात्यात जात, धर्म, वंश, वर्ण अशा प्रकारचे अडथळे कधीही येत नाहीत. भारतातील फ्रेंडशिप डे अर्थात मैत्री दिनाचे मूळ हे प्राचीन युगात सापडते. कृष्ण आणि सुदामाच्या मैत्रीचे गुणगाण आजही गायले जाते. भारतीय लोकांमध्ये मैत्रीच्या नात्याला एक खास असं स्थान आहे. म्हणूनच मैत्रीच्या नात्यावर बॉलिवूडमध्ये अनेक चित्रपटं आणि हिट गाणी तयार झालेली आहेत. भारतामध्ये ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात जरी फ्रेंडशिप डे साजरा करण्यात येत असला तरी जागतिक स्तरावर तो 30 जुलैला साजरा करण्यात येतोय. युनायटेड नेशन्सनी 2011 साली आपल्या 65 व्या सेशनमध्ये 30 जुलै हा फ्रेन्डशीप डे म्हणून साजरा करण्याची घोषणा केली होती. अनेकांच्या आयुष्यात मैत्रीचे स्थान हे सर्वोच्च असते. म्हणूनच ते म्हणतात, 'बनें चाहे दुश्मन जमाना हमारा, सलामत रहें दोस्ताना हमारा!' आणि खरीखुरी मैत्री निभावतातही. अशा सर्व जिगरी मित्रांसाठी मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!


इतर महत्वाच्या बातम्या


Friendship Day 2023 : मैत्री दिन 30 जुलै की 6 ऑगस्ट? जाणून घ्या नेमका कधी आहे 'फ्रेंडशिप डे'