Sweating In Palm : उन्हाळ्यात व्यायाम करताना किंवा अधिक शारीरिक हालचाली करताना घाम येणं साहजिक आहे. पण, काहीही शारीरिक हालचाल न करताही हाताला किंवा पायांच्या तळव्यांना घाम येत असेल तर मात्र वेळीच सतर्क राहण्याची गरज आहे. हा प्रकार जगभरातील अनेक बाबतीत असं घडतं. विज्ञानाच्या भाषेत या समस्येला हायपरहायड्रोसिस (Hyperhidrosis) म्हणतात. 


सामान्यतः शरीर घामाद्वारे तापमान नियंत्रित करण्याचा प्रयत्न करते, पण हायपरहायड्रोसिसने ग्रस्त असलेले लोक हिवाळ्यातही हातांच्या आणि पायांच्या तळव्यांना घाम येण्याची तक्रार करतात. आज या ठिकाणी आम्‍ही तुम्‍हाला हायपरहाइड्रोसिस आजाराची कारणे कोणती या संदर्भात अधिक माहिती सांगणार आहोत. 


हायपरहाइड्रोसिसची लक्षणं कोणती?


मेयोक्लिनिकच्या अहवालात असं म्हटलं आहे की, जर तुमच्या हाताच्या आणि पायाच्या तळव्यांना नेहमी घाम येत असेल पण तुम्हाला यामागचं कारण समजत नसेल तर ते हायपरहाइड्रोसिसचं लक्षण आहे. तुम्हाला कोणत्याही ऋतूमध्ये किंवा कोणत्याही शारीरिक हालचालींशिवाय घाम येत असेल, तर तुम्ही सतर्क राहण्याची गरज आहे. हायपरहाइड्रोसिसची बहुतेक केसेस तळवा आणि अंडरआर्म्सशी संबंधित आहेत.


अधिक सतर्क राहण्याची गरज केव्हा?


जेव्हा घामाची समस्या असते तेव्हा शरीरात इतर अनेक लक्षणं देखील दिसू लागतात. उदाहरणार्थ, जास्त घाम येत असेल, छातीत दुखत असेल आणि उलट्या होत असतील तर ही परिस्थिती गंभीर असू शकते. अशा वेळी शक्य तितक्या लवकर डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे. 


घाम येण्यासाठी घामाच्या ग्रंथी जबाबदार असतात


घामाचे कार्य म्हणजे शरीराचे तापमान नियंत्रित करणे. सोप्या भाषेत सांगायचं तर आपल्या शरीरातील ग्रंथी घाम सोडतात. शरीरात एक मज्जातंतू असते जी या ग्रंथीला घाम येण्यास सांगते. पण जेव्हा घाम ग्रंथी अतिक्रियाशील होते तेव्हा तिला जास्त घाम येऊ लागतो. या स्थितीला हायपरहाइड्रोसिस म्हणतात. हायपरहाइड्रोसिसचे नेमके कारण अद्याप निश्चित झालेले नाही.


या व्यतिरिक्त, असे होण्यामागे इतर अनेक कारणे असू शकतात. मधुमेह, कमी रक्तातील साखर, विशिष्ट प्रकारचे कर्करोग, हृदयविकाराचा झटका, संसर्ग आणि थायरॉईडच्या समस्यांमध्येही अशा समस्या दिसून येतात. बऱ्याच केसेसमध्ये हा रोग जेनेटिकही दिसून येतो. त्यामुळे तुम्हाला जर अशी लक्षणं दिसत असतील तर वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या.


महत्त्वाच्या बातम्या : 


Heat Wave in India : फेब्रुवारीतच उष्णतेची लाट, 122 वर्षांचा विक्रम मोडला; सरासरी तापमान 29.5 डिग्री