What is Solo Dating : प्रत्येकजण आपल्या जोडीदारासोबत डेट वर जातो, पण जे सिंगल (Single) आहेत म्हणजे ज्यांच्याकडे जोडीदारचं (Partner) नाही त्यांनी काय कराव. जे रिलेशनशिपमध्ये (Relationship) नसून सिंगल आहेत, त्यांच्या साठी सोलो डेटिंगचा (Solo Dating) पर्याय आहे. आता तुम्ही विचाराल की, कधी कुणी एकट्याने डेटवर जातं का? उत्तर होय आहे. एकट्या डेटवर जाण्याला मास्टर डेटिंग (Master Dating) किंवा सोलो डेटिंग म्हणतात. सध्या सोशल मीडियावर सोलो डेटिंग (Solo Dating) ट्रेंड करत आहे. अनेक लोक एकट्याने डेटिंगचा आनंद घेतात आणि त्यांचे अनुभव एकमेकांसोबत शेअर करत आहेत. आता हा प्रकार नेमका काय याबाबत सविस्तर वाचा.


सोलो डेटिंगचा ट्रेंड


सोशल मीडियावर सध्या अनेकजण सोलो डेटिंग म्हणजेच मास्टर डेटिंगचे फोटो शेअर करताना दिसतात. हे लोक त्यांच्या मास्टर डेटिंगचा अनुभव सर्वांसोबत शेअर करतात. यातून त्यांना खूप आनंद मिळतो, अशी प्रतिक्रिया अनेकांनी दिली आहे. आता मास्टर किंवा सोलो डेटिंग म्हणजे कायचा आनंद कसा घेत आहेत. जर तुम्हालाही मास्टर डेटिंग किंवा सोलो डेटिंगबद्दल जाणून घ्या.


मास्टर डेटिंग किंवा सोलो डेटिंग म्हणजे काय?


एकीकडे कपल्स डेटिंगचा आनंद घेताना दिसत आहेत, तर दुसरीकडे सिंगल व्यक्ती मास्टर डेटिंगची मजा घेताना दिसत आहेत. एकट्याने वेळ घालवणे याला सोलो डेटिंग मास्टर डेटिंग म्हणतात. या सोलो डेटवर, लोक एकटे बाहेर जातात, स्वतःच्या आवडीच्या वस्तू खरेदी करतात, आवडत्या ठिकाणाला भेट देतात आणि स्वतःचा विचार करतात. ब्रिटन आणि अमेरिकेसह इतर अनेक देशांमध्ये मास्टर डेटिंगचा हा ट्रेंड वाढत आहे.


स्वत:ला नव्याने शोधण्याचा प्रयत्न


मास्टर डेटिंग किंवा सोलो डेटिंग म्हणजे तुमच्या इच्छा, गरजा आणि तुम्हाला आनंद देणार्‍या गोष्टी समजून घेणे. तुम्ही तुमच्यात दडलेली प्रेरणा शोधून स्वत:चा आत्मविश्वास वाढवणे हा देखील यामागचा मूळ हेतू आहे. मास्टर डेटिंगमध्ये विचार करण्याची, काळजी घेण्याची किंवा दुसऱ्यांच्या प्रेमजालात पडण्यापासून सावध राहण्याची गरज नाही. कशाचाही विचार न करता तुम्ही सोलो डेटिंगचा आनंद घेऊ शकता.


सोलो डेटिंग किंवा मास्टर डेटिंगचे फायदे :


स्वावलंबनाचा अनुभव 


सोलो डेटिंग तुम्हाला स्वावलंबी बनण्याचा अनुभव घेण्यास मदत करतो. सोलो डेटिंगमुळे तुमच्या स्वत:च्या नजरेत तुमचं मूल्य वाढण्यास मदत होते. शिवाय, यामुळे तुम्हाला तुमच्या इच्छा आणि गरजा समजून घेण्यास मदत करते. 


आत्मपरिचय होणे


मास्टर डेटिंग करून, तुम्हाला तुमचा नव्याने आत्मपरिचय होते. यामुळे स्वत:ला अधिक समजून घेण्याची, तुमचे विचार, भावना आणि मनःस्थिती समजून घेण्याची संधी मिळते.


नवीन अनुभव


एकट्याने डेटिंग करताना, तुम्ही नवीन ठिकाणे शोधण्यात आणि नवीन उपक्रम करण्याचा आनंद घेऊ शकता. नवनवीन ठिकाणांना भेट देताना तुम्हाला नवा अनुभव आणि नवी ऊर्जा मिळते.


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Immunity : संसर्गजन्य रोगांपासून बचावासाठी 'हे' व्हिटॅमिन आणि पोषकतत्वे आवश्यक, आहारात 'या' गोष्टींचा समावेश करा