Weight Loss Tips : आजकालच्या धकाधकीच्या काळात स्वत:ला शारीरिक आणि मानसिकरित्या फिट ठेवणं गरजेचं आहे. यासाठी प्रत्येकजण वजन कमी करण्याच्या मागे आहेत. वजन कमी करण्यासाठी, बहुतेक लोक व्यायामासाठी दिवसभर वेळ काढतात. पण, वर्कआऊट करण्यासाठी सर्वात बेस्ट वेळी कोणती याबाबतही अनेक लोकांमध्ये संभ्रम आहे. सकाळी धावल्याने वजन लवकर कमी होते किंवा संध्याकाळी धावणे फायदेशीर ठरते? असे अनेक प्रश्न तुमच्यादेखील मनात असतील. तर, व्यायामाची योग्य वेळ तुमच्या वजनावर अनेक प्रकारे कशी परिणाम करते. त्यामुळे तुम्ही कोणत्या वेळी वर्कआऊट करून वजन कमी करू शकता या संदर्भात आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.


कोणत्या वेळी तुम्ही धावून वजन लवकर कमी करू शकता?


व्यायामाची पद्धत तुमचे वजन कमी करण्यावर अवलंबून असते, म्हणूनच वर्कआऊट करण्याची योग्य वेळ जाणून घेणे तुमच्यासाठी खूप महत्वाचे आहे. सकाळी आठ वाजण्यापूर्वी धावण्याचे अनेक फायदे आहेत. सकाळी धावल्यामुळे दिवसभर फ्रेश वाटतं. यासोबतच अशा वेळी धावल्याने हृदयाचे ठोके वाढतात, धावल्याने रात्री चांगली झोप लागते. तर, संध्याकाळी शरीराचे तापमान मोठ्या प्रमाणात वाढते. चरबी कमी करण्यासाठी सकाळ आणि संध्याकाळ दोन्ही वेळा चांगल्या असू शकतात. पण, बहुतेक वर्कआऊट्स करण्यासाठी, सकाळची वेळ सर्वोत्तम मानली जाते. 


व्यायामाच्या वेळेचा वजनावर परिणाम 


तसे, प्रत्येकजण वेळ काढून आपापल्या वेळेनुसार व्यायाम करतो, परंतु खूप कमी लोकांना हे माहित आहे की तुम्ही ज्या पद्धतीने व्यायाम केला आणि वेळ या दोन्हींचा तुमच्या वजनावर परिणाम होतो. बर्‍याच लोकांना सकाळी लवकर उठता येत नाही, म्हणूनच ते संध्याकाळी धावतात, या व्यतिरिक्त, काही लोकांना असे वाटते की सकाळी लवकर उठल्यानंतर वर्कआऊट करणे चांगले आहे. तुम्ही तुमच्या पद्धतीने व्यायाम करत असलात तरी सकाळी व्यायाम करणे उत्तम मानले जाते. यामुळे शरीरात एंडोर्फिन हार्मोन तयार होतो. यामुळे तुम्ही तणावापासून दूर राहता आणि तुमी तब्येतही सुधारते. त्यामुळे धावणं शरीरासाठी चांगलं आहे.


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.


महत्वाच्या बातम्या : 


Health Tips : गुलाबी थंडीत 'या' चहाने तुमच्या दिवसाची सुरुवात करा; प्रतिकारशक्ती वाढविण्याबरोबरच व्हायरलपासूनही संरक्षण मिळेल