Immunity Booster Drink : चहा हा अनेकांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. हिवाळ्यात चहा पिण्याचा खूप आग्रह असतो. पण तुम्हाला माहिती असेलच की जास्त चहा पिण्याचे फायदे कमी आणि नुकसान अधिक आहेत. हिवाळ्यामध्ये सर्दी-पडसेची समस्याही सामान्य आहे. मात्र, सध्या कोरोनाचा संसर्ग वाढताना पाहायला मिळतोय. अशा वेळी जर तुम्हाला स्वत:ला सुरक्षित ठेवायचे असेल, तर मास्क, सोशल डिस्टन्सिंगसोबतच सकस आहाराकडेही लक्ष द्यावे लागेल. अनेकजण दिवसाची सुरुवात कडक चहा पिऊन करतात, जेणेकरून आपल्या दिवसाची सुरुवातच पूर्ण उर्जेने व्हावी. तुम्ही चहाऐवजी काढ्याने दिवसाची सुरुवात करु शकता. हे काढे संसर्गापासून तुमचं संरक्षण करतील तेही तुमच्या तोंडाची चव कायम ठेवून.


1. हळद, जिरे, ओव्याचा काढा
साहित्य
जिरे - 1/2 टीस्पून, किसलेले आले - 1/2 टीस्पून, ओवा - 1/2 टीस्पून, तुळस - 5, लवंग - 2, हळद - 1/2 टीस्पून, काळी मिरी - एक चिमूटभर लिंबाचा रस - 1/ 2 टीस्पून, पाणी - 3 कप


पद्धत
एका कढईत लिंबू व्यतिरिक्त इतर साहित्य टाकून नंतर झाकून ठेवा आणि काढ्याचे प्रमाण निम्मे होईपर्यंत उकळवा. हा काढा कप किंवा ग्लासमध्ये काढा. त्यानंतर त्यात लिंबाचा रस घाला.


2. भाज्या आणि फळांचा काढा
साहित्य
केळीची पाने - 1 कप, पुदिन्याची पाने - 1/2 कप, पालक - 1 कप, ब्लूबेरी किंवा स्ट्रॉबेरी - 2 टीस्पून, कापलेली काकडी - 1, लिंबाचा रस - 2 टीस्पून, काळे मीठ - चिमूटभर


पद्धत
सर्व साहित्य मिक्सरमध्ये टाकून चांगले बारीक करून घ्या, यात आवश्यकतेनुसार पाणी घाला. अधिक पाणी घालू नका. ग्लासमध्ये हा काढा वरुन काळी मिरी टाकून सर्व्ह करा.


3. आले-तुळशीचा काढा
साहित्य
किसलेले आले - 1 टीस्पून, दालचिनी - 1 तुकडा, लवंग - 2, वेलची - 1, मध - 1 टीस्पून, तुळशीची पाने - मूठभर, काळीमिरी - 1 टीस्पून, पाणी - 4 वाट्या


पद्धत
एका पातेल्यात सर्व साहित्य चार वाट्या पाणी घालून एक उकळी येऊ द्या. नंतर त्यात आले, दालचिनी, हिरवी वेलची, लवंगा, तुळस घालून दोन ते तीन मिनिटे उकळू द्या. जेणेकरुन या सर्व गोष्टींचा अर्क पाण्यात मिसळेल. काढा कपमध्ये काढून त्यात मध मिसळा आणि गरमागरम प्या.


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.


इतर बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha