Belly Fat Loss Tips : शरीराची हलचाल जास्त होत नसल्याने पोटाची चरबी वाढते. त्यामुळे चरबी कमी करण्यासाठी अनेक लोक वेगवेगळे डाएट प्लॅन फॉलो करतात. जर तुम्हाला तुमच्या पोटाची चरबी (Belly Fat ) कमी करायची असेल तर या सोप्या टिप्स तुम्ही फॉलो करू शकता. 


1. सूर्यनमस्कार करा  (Surya Namaskar)
दररोज सूर्यनमस्कार केल्याने पोटाची चरबी कमी होऊ शकते. भुजंगासन,नौकासन आणि चक्रासन इत्यादी आसनाचे प्रकार केल्यानं पोटाची चरबी झटपट कमी होऊ शकते. 


2. दररोज व्यायाम करणं, योगाभ्यास, चालणं, धावणे हे सर्व केल्यानं वाढतं वजन झटपट कमी होण्यात मदत होते आणि आपले वजनसुद्धा नियंत्रणात राहते.   


3. शरीरात पाण्याचे प्रमाण वाढवा
पाणी जास्त पिल्याने भूक कमी लागते. ज्यामुळे वजन कमी होते. पाणी जास्त पिल्याने भूक कमी लागते. ज्यामुळे वजन कमी होते. सकाळी उठल्यानंतर लगेच पाणी पिल्याने शरीरातील अॅसिडीटी कमी होते. तसेच सकाळी पाणी प्यायल्याने पचन क्रिया देखील सुधारते. जर तुम्ही डायटिंग करत असाल तर तुम्ही साकाळी रिकाम्या पोटी पाणी पिले पाहिजे. त्यामुळे तुमच्या शरीरातील मेटाबॉलिक रेट वाढेल.


4. पोटाची चरबी कमी करायची असेल तर तुम्हाला तळलेले आणि मसाल्याचे पदार्थ खाणे कमी करावे लागेल. तसेच डाएटमध्ये तुम्हाला फळे आणि हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करावा लागेल. 


5. गरम पाणी प्या- वजन कमी करण्यासाठी सकाळी उठल्यानंतर गरम पाणी प्यायल्याने तुमचे वजन कमी होईल. गरम पाणी प्यायल्याने पचन क्रिया चांगली होते. आयुर्वेदात असेही म्हटले आहे की सकाळी 2 कप कोमट पाणी प्यायल्याने शरीरात उर्जा निर्माण होते. कोमट पाण्यात लिंबू आणि मध मिक्स करून प्यायल्याने बेली फॅट्स कमी होतात.


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.


संबंधित बातम्या


Skin Care Tips: मुलायम आणि चमकदार त्वचा हवीये? वापरा अ‍ॅप्पल फेस पॅक, जाणून घ्या तयार करण्याची सोपी पद्धत


Weight Loss: नाश्ता करताना 'या' चुका टाळा, अन्यथा लठ्ठपणाचे व्हाल शिकार


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha